Lokmat Money >शेअर बाजार > २१ व्यांदा डिविडेंड देणार Tata ची 'ही' कंपनी; एका शेअरवर ७५ रुपयांचा फायदा, रेकॉर्ड डेट कधी?

२१ व्यांदा डिविडेंड देणार Tata ची 'ही' कंपनी; एका शेअरवर ७५ रुपयांचा फायदा, रेकॉर्ड डेट कधी?

Tata Group Stock: कंपनी २१ व्यांदा गुंतवणूकदारांना लाभांश देणार आहे. पात्र गुंतवणूकदारांना प्रति शेअर ७५ रुपये लाभांश देण्यात येणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2025 11:30 IST2025-06-07T11:28:45+5:302025-06-07T11:30:03+5:30

Tata Group Stock: कंपनी २१ व्यांदा गुंतवणूकदारांना लाभांश देणार आहे. पात्र गुंतवणूकदारांना प्रति शेअर ७५ रुपये लाभांश देण्यात येणार आहे.

tata elxsi will pay dividend for the 21st time profit of Rs 75 per share when is the record date stock market return | २१ व्यांदा डिविडेंड देणार Tata ची 'ही' कंपनी; एका शेअरवर ७५ रुपयांचा फायदा, रेकॉर्ड डेट कधी?

२१ व्यांदा डिविडेंड देणार Tata ची 'ही' कंपनी; एका शेअरवर ७५ रुपयांचा फायदा, रेकॉर्ड डेट कधी?

Tata Group Stock: टाटा एलेक्सी लिमिटेडनं लाभांश देण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनी २१ व्यांदा गुंतवणूकदारांना लाभांश देणार आहे. पात्र गुंतवणूकदारांना प्रति शेअर ७५ रुपये लाभांश देण्यात येणार आहे. ज्याची रेकॉर्ड डेट पुढील आठवड्यात आहे. चला जाणून घेऊया या कंपनीबद्दल.

केव्हा आहे रेकॉर्ड डेट?

टाटा समूहाच्या या कंपनीनं प्रति शेअर ७५ रुपये लाभांश जाहीर केला आहे. कंपनीनं या लाभांशासाठी ११ जून २०२५ ही रेकॉर्ड डेट निश्चित केली आहे. म्हणजेच ज्या गुंतवणूकदारांकडे या दिवशी कंपनीचे शेअर्स असतील, त्यांना प्रत्येक शेअरवर ७५ रुपये लाभांश मिळेल. यापूर्वी कंपनीनं २५ जून २०२४ रोजी एक्स-डिव्हिडंड ट्रेड केला होता. तेव्हा कंपनीने एका शेअरवर ७० रुपये लाभांश दिला.

हेही वाचा - PNB नं होम आणि ऑटो लोनच्या EMI वर केली मोठी घोषणा, RBI च्या निर्णयाचा परिणाम

टाटा एलेक्सी लिमिटेड गुंतवणूकदारांना नियमित अंतरानं लाभांश देत आहे. कंपनीनं २००१ मध्ये गुंतवणूकदारांना प्रथम लाभांश दिला. तेव्हा कंपनीनं प्रति शेअर अडीच रुपये लाभांश दिला. त्यानंतर कंपनीने २००७ मध्ये गुंतवणूकदारांना लाभांश दिला. त्यानंतर एका शेअरवर ७ रुपये लाभांश देण्यात आला.

टाटा समूहाच्या या कंपनीनं गुंतवणूकदारांना बोनस शेअर्सही दिलेत. कंपनीने २०१७ मध्ये गुंतवणूकदारांना बोनस शेअर्स भेट दिले होते. त्यानंतर शेअरेबल गुंतवणूकदारांना शेअरवर बोनसचं वाटप करण्यात आलंय.

शेअर बाजाराची कामगिरी कशी आहे?

शुक्रवारी कंपनीचा शेअर ०.३२ टक्क्यांनी घसरून ६४६९.४५ रुपयांवर बंद झाला. गेल्या ३ महिन्यांत कंपनीच्या शेअरची किंमत १४ टक्क्यांनी वाढली आहे. मात्र, असं असूनही टाटा समूहाचा हा शेअर १ वर्षात ६.६१ टक्क्यांनी घसरला आहे. टाटा एलेक्सी लिमिटेडचा ५२ आठवड्यांचा उच्चांक ९०८२.९० रुपये आणि ५२ आठवड्यांचा नीचांकी स्तर ४६०१.०५ रुपये आहे. कंपनीचे मार्केट कॅप ४०,२९४ कोटी रुपये आहे.

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title: tata elxsi will pay dividend for the 21st time profit of Rs 75 per share when is the record date stock market return

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.