Lokmat Money >शेअर बाजार > तिमाहीचे निकाल ठरवणार बाजाराची दिशा; कंपन्यांच्या निकालांवर बाजाराचे भवितव्य अवलंबून

तिमाहीचे निकाल ठरवणार बाजाराची दिशा; कंपन्यांच्या निकालांवर बाजाराचे भवितव्य अवलंबून

विदेशी गुंतवणूकदार संस्था बाजारात खरेदीसाठी कधी सक्रिय होणार याकडे लक्ष

By प्रसाद गो.जोशी | Updated: January 6, 2025 13:39 IST2025-01-06T13:38:40+5:302025-01-06T13:39:22+5:30

विदेशी गुंतवणूकदार संस्था बाजारात खरेदीसाठी कधी सक्रिय होणार याकडे लक्ष

Quarterly results will determine the direction of the market The future of the market depends on the results of the companies | तिमाहीचे निकाल ठरवणार बाजाराची दिशा; कंपन्यांच्या निकालांवर बाजाराचे भवितव्य अवलंबून

तिमाहीचे निकाल ठरवणार बाजाराची दिशा; कंपन्यांच्या निकालांवर बाजाराचे भवितव्य अवलंबून

प्रसाद गो. जोशी

आगामी सप्ताहामध्ये देशांतर्गत कोणतीही महत्त्वाची घडामोड नसल्याने केवळ विविध कंपन्यांच्या निकालांवर बाजाराचे भवितव्य अवलंबून आहे. याशिवाय जगभरातील शेअर बाजारांमध्ये होणाऱ्या घडामोडींवर बाजाराची नजर असणार आहे. त्याशिवाय परकीय वित्तसंस्थांची भूमिका काय राहणार यावरही बाजाराची वाटचाल अवलंबून असणार आहे.

या सप्ताहामध्ये कंपन्यांच्या तिमाही निकालांना प्रारंभ होणार आहे. कंपन्यांचे निकाल कसे लागणार याकडे बाजाराचे लक्ष राहणार आहे. याशिवाय जगभरातील शेअर बाजारांमधील वातावरण कसे राहणार आहे, याकडे गुंतवणूकदारांची नजर राहणार असून, तेथील वातावरण बघून भारतामधील गुंतवणूकदारांची काय भूमिका राहणार याकडे सर्वांचे लक्ष राहणार आहे. भारतीय कंपन्यांचे तिसऱ्या तिमाहीचे निकाल बाजाराच्या अपेक्षेप्रमाणे आल्यास बाजारामध्ये वाढ होऊ शकते. ण्याची शक्यता आहे. नवीन वर्षात परकीय संस्थांकडून विक्री झाल्याचे दिसून आले. या संस्था काय भूमिका घेतात याकडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागून राहणार आहे. 

या संस्था खरेदीसाठी कधी सक्रिय होणार याकडे लक्ष लागले आहे. आगामी अर्थसंकल्प व अमेरिकेमध्ये सुरू होणारी डोनाल्ड ट्रम्प यांची राजवट याचा परिणामही बाजारावर होणार असून, त्यामुळे गुंतवणूकदार सावध भूमिका घेण्याची शक्यता दिसून येत आहे. 

परकीय वित्तसंस्थांची विक्री

  • सातत्याने विक्री करीत असलेल्या परकीय वित्तसंस्थांनी नवीन वर्षातही विक्रीचे धोरण कायम ठेवले आहे. या वर्षाच्या पहिल्या तीन दिवसांमध्ये या संस्थांनी ४२८२ कोटी बाजारातून काढून घेतले आहेत.
  • डिसेंबर महिन्यात परकीय वित्तसंस्थांची भूमिका अस्थिर राहिली. डिसेंबरमध्ये १५,४४६ कोटी रुपयांची खरेदी केली आहे. या संस्थांनी बदललेली भूमिका बाजाराला बळ देण्याची अपेक्षा होती.


सलग तिसऱ्या वर्षी दिला चांगला परतावा

  • सन २०२४ शेअर बाजाराला चांगले गेले आहे. या वर्षामध्ये जवळपास सर्वच निर्देशांकांनी नवीन उच्चांक गाठले आहेत. तसेच सलग तिसऱ्या वर्षी बाजाराने ८ ते ९ टक्के परतावा दिला आहे. 
  • या वर्षामध्ये सेन्सेक्सने ८.१८ टक्के परतावा दिला आहे. निफ्टीने ८.७६ टक्के परतावा दिला आहे. सलग तिसऱ्या वर्षी या दोन्ही निर्देशांकांनी टक्क्यांच्या पेक्षा जास्त परतावा दिलेला आहे, हे विशेष.

Web Title: Quarterly results will determine the direction of the market The future of the market depends on the results of the companies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.