Lokmat Money >शेअर बाजार > शूज, कपडे, टीव्ही, किराणा... अमेरिकेत अचानक खरेदीसाठी का उडाली झुंबड? नागरिकांना कशाची भिती?

शूज, कपडे, टीव्ही, किराणा... अमेरिकेत अचानक खरेदीसाठी का उडाली झुंबड? नागरिकांना कशाची भिती?

Donald Trump Tariff Policy: आजकाल अमेरिकेत टीव्ही, फ्रीज, लॅपटॉपपासून मीठ-मिरचीपर्यंत सर्व काही खरेदी करण्याची स्पर्धा लागली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2025 16:52 IST2025-04-06T16:51:48+5:302025-04-06T16:52:46+5:30

Donald Trump Tariff Policy: आजकाल अमेरिकेत टीव्ही, फ्रीज, लॅपटॉपपासून मीठ-मिरचीपर्यंत सर्व काही खरेदी करण्याची स्पर्धा लागली आहे.

people in america are shopping heavily due to the fear of possible increase in prices of things due to tariffs | शूज, कपडे, टीव्ही, किराणा... अमेरिकेत अचानक खरेदीसाठी का उडाली झुंबड? नागरिकांना कशाची भिती?

शूज, कपडे, टीव्ही, किराणा... अमेरिकेत अचानक खरेदीसाठी का उडाली झुंबड? नागरिकांना कशाची भिती?

Donald Trump Tariff Policy : अमेरिका जगातील सर्वात मोठी महाशक्ती आहे. त्यामुळेच अमेरिकेचं नागरिकत्व मिळवण्यासाठी लोकांच्या रांगा लागतात. पण, सध्या अमेरिकेत वेगळ्याच कारणासाठी चढाओढ सुरू आहे. लोक मॉल आणि दुकानांमध्ये खरेदीसाठी गर्दी करत आहेत. कपडे, किराणा सामान फर्निचरपासून उपकरणे आणि दारूपर्यंत मोठ्या प्रमाणात खरेदी केली जात आहे. पण, अमेरिकेत खरेदीसाठी अचानक झुंबड का उडाली असा प्रश्न अनेकांना पडला आहे. वास्तविक, डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयामुळे लोकांच्या मनात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणामुळे घाबरलेल्या लोकांच्या मनात महागाईची भीती निर्माण झाली आहे, त्यामुळे लोक किमती वाढण्यापूर्वी वस्तू खरेदी करुन साठवण्यास भर देत आहेत. टॅरिफमुळे दैनंदिन वस्तूंच्या किमती वाढण्याची अपेक्षा आहे, असेही अर्थतज्ज्ञांचे मत आहे. अमेरिकेची अर्थव्यवस्था मंदीत जाण्याची भीती काही अर्थतज्ज्ञ आहेत.

ऑटोमोबाईल क्षेत्रात प्रचंड तेजी 
महागाईच्या भितीने अमेरिकन लोक फक्त गरजेच्या वस्तूच नाही तर वाहनेही खरेदी करत आहेत. याचाच परिणाम मार्चमध्ये ऑटोमोबाईल क्षेत्रात प्रचंड तेजी आली. या महिन्यात वाहन विक्री ११.३ टक्क्यांनी वाढली. कारण ट्रम्प यांनी परदेशी वाहने आणि ऑटो पार्ट्सवर २५ टक्के दर लागू करण्याची घोषणा करताच. डीलरशिपवर लोकांची गर्दी झाली. हा दर ३ एप्रिलपासून लागू झाला आहे.

वाचा - ट्रॅम्प यांच्या निर्णयामुळे नोकऱ्याही धोक्यात! आतापर्यंत २.८ लाख कर्मचाऱ्यांनी गमावले उत्पन्नाचे साधन

आयातीवर किमान १० टक्के आयात शुल्क
काही गोष्टी खरेदी करून ठेवणे शहाणपणाचे असले तरी अधिक साठा करताना कर्जापासून दूर राहणेही महत्त्वाचे आहे, असे तज्ज्ञांचे मत आहे. अमेरिकेने सर्व देशांमधून आयातीवर १० टक्के बेसलाइन टॅरिफ लागू केले आहे. याशिवाय अमेरिकेने आपल्या ६० हून अधिक व्यापार भागीदारांवर परस्पर शुल्क लादण्याची घोषणा केली आहे, जी ९ एप्रिलपासून लागू होणार आहे.
 

Web Title: people in america are shopping heavily due to the fear of possible increase in prices of things due to tariffs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.