IPO News: जर तुम्ही एलजी इलेक्ट्रॉनिक्स इंडियाच्या आयपीओमध्ये गुंतवणूक करू शकला नसाल, तर निराश होण्याची गरज नाही. पुढील आठवड्यात आणखी एक मेनबोर्ड आयपीओ (Mainboard IPO) उघडत आहे. हा आयपीओ ग्रे मार्केटमध्ये (Grey Market) एलजी इंडियाप्रमाणेच प्रदर्शन करत आहे. आपण ओर्क्ला इंडिया आयपीओ (Orkla India IPO) बद्दल बोलत आहोत. किरकोळ गुंतवणूकदारांसाठी हा आयपीओ २९ ऑक्टोबर ते ३१ ऑक्टोबर दरम्यान खुला राहील.
आयपीओचा आकार किती आहे?
ओर्क्ला इंडिया आयपीओचा आकार १६६७.५४ कोटी रुपये आहे. कंपनी आयपीओद्वारे २.२८ कोटी शेअर्स ऑफर फॉर सेलमार्फत जारी करेल. कंपनीचे सध्याचे गुंतवणूकदार त्यांचा हिस्सा कमी करतील. ओर्क्ला इंडिया आयपीओमध्ये नवीन शेअर्स जारी केले जाणार नाहीत. याचा अर्थ असा की, इश्यूमधून जमा झालेल्या पैशांचा वापर कंपनीच्या कामासाठी होणार नाही.
जीएमपी ₹१४५ वर
इन्व्हेस्टर्स गेनच्या अहवालानुसार, आज कंपनीचा आयपीओ ग्रे मार्केटमध्ये ₹१४५ च्या प्रीमियमवर ट्रेड करत आहे. जे १९.८६ टक्के लिस्टिंग गेन दर्शवते. जर ग्रे मार्केटची सध्याची स्थिती कायम राहिली, तर ओर्क्ला इंडिया आयपीओ शेअर बाजारात ₹८७५ वर लिस्ट होऊ शकतो.
प्राइस बँड काय आहे?
ओर्क्ला इंडिया आयपीओचा प्राइस बँड कंपनीनं ₹६९५ ते ₹७३० प्रति शेअर निश्चित केला आहे. कंपनीनं २० शेअर्सचा एक लॉट बनवला आहे. ज्यामुळे गुंतवणूकदारांना कमीत कमी ₹१४,६०० ची गुंतवणूक करावी लागेल. कंपनीनं आपल्या कर्मचाऱ्यांना एका शेअरवर ₹६९ ची सूट दिली आहे.
आयपीओचा किती हिस्सा कोणासाठी?
पात्र संस्थात्मक खरेदीदारांसाठी जास्तीत जास्त ५० टक्के हिस्सा आरक्षित राहील. तर, किरकोळ गुंतवणूकदारांसाठी कमीतकमी ३५ टक्के आणि एनआयआयसाठी कमीतकमी १५ टक्के हिस्सा आरक्षित राहील.
(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)
