LIC Raises stake in Adani Group: सरकारी विमा कंपनी लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन (LIC) ने दोन महत्त्वाच्या कंपन्यांमध्ये आपली हिस्सेदारी वाढवली आहे. अदानीनी ग्रुपच्या ACC आणि सरकारी उपक्रम असलेल्या NBCC (India) मध्ये LIC ने मोठ्या प्रमाणात शेअर्सची खरेदी केली आहे.
ACC मध्ये LIC ची हिस्सेदारी 10% च्या वर
LIC ने ACC कंपनीचे 37,82,029 शेअर्स विकत घेतले आहेत, जे कंपनीतील 2.014% हिस्सेदारीच्या बरोबरीचे आहेत. या खरेदीनंतर LIC कडे आता एकूण 1,98,97,064 ACC शेअर्स आहेत, म्हणजेच कंपनीतील 10.596% हिस्सेदारी आहे. हे शेअर्स LIC ने 20 मे ते 25 नोव्हेंबर या कालावधीत खरेदी केले. यापूर्वी LIC कडे 1,61,15,035 शेअर्स होते, जे 8.582% होते.
NBCC (India) मध्ये LIC ची हिस्सेदारी वाढली
LIC ने NBCC चे 30,24,672 शेअर्स खरेदी केले असून, हे कंपनीतील 2.071% हिस्सेदारीच्या बरोबर आहे. या खरेदीनंतर LIC कडे NBCC चे एकूण 12,08,91,590 शेअर्स आहेत, जे 4.477% आहे.
शेअर मार्केटमध्ये ACC आणि NBCC चे प्रदर्शन कसे?
ACC शेअरची कामगिरी
1 वर्षात: 15% घसरण
6 महिन्यांत: 3% घट
5 वर्षांत: सुमारे 9% परतावा
आज (शुक्रवार): 0.60% घसरण
ACC वर गेल्या काही महिन्यांपासून दबाव असून, अदानी ग्रुपमधील उतार-चढावांचा प्रभाव दिसून येतो.
NBCC India शेअरची कामगिरी
1 वर्षात: 20% वाढ
6 महिन्यांत: 2% परतावा
5 वर्षांत: तब्बल 581% प्रचंड नफा
NBCC चा दीर्घकालीन परफॉर्मन्स अत्यंत मजबूत राहिला असून, पोजिशनल गुंतवणूकदारांसाठी हा शेअर मल्टीबॅगर ठरला आहे.
(टीप- शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी आर्थिक सल्लागाराची मदत घ्या.)
