Lokmat Money >शेअर बाजार > पैसे तयार ठेवा, लवकरच येतोय Phone-Pe चा IPO; पाहा संपूर्ण डिटेल्स

पैसे तयार ठेवा, लवकरच येतोय Phone-Pe चा IPO; पाहा संपूर्ण डिटेल्स

PhonePe IPO News: आणखी एक फिनटेक कंपनी आयपीओ बाजारात उतरणार आहे. फोन पे नं देशातील शेअर बाजारात लिस्टिंगची तयारी सुरू केलीये.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2025 11:02 IST2025-02-21T10:59:40+5:302025-02-21T11:02:04+5:30

PhonePe IPO News: आणखी एक फिनटेक कंपनी आयपीओ बाजारात उतरणार आहे. फोन पे नं देशातील शेअर बाजारात लिस्टिंगची तयारी सुरू केलीये.

Keep your money ready Phone Pe IPO listing soon See full details share market investment | पैसे तयार ठेवा, लवकरच येतोय Phone-Pe चा IPO; पाहा संपूर्ण डिटेल्स

पैसे तयार ठेवा, लवकरच येतोय Phone-Pe चा IPO; पाहा संपूर्ण डिटेल्स

PhonePe IPO News: आणखी एक फिनटेक कंपनी आयपीओ बाजारात उतरणार आहे. फोनपे असं या कंपनीचं नाव आहे. कंपनीनं देशातील शेअर बाजारात लिस्टिंगची तयारी सुरू केलीये. गुरुवारी कंपनीनं यासंदर्भातील माहिती दिली. गेल्या पाच वर्षांत शेअर बाजारात एन्ट्री करणारी ही तिसरी फिनटेक कंपनी ठरणार आहे. यापूर्वी पेटीएमनं २०२१ मध्ये आणि मोबिक्विकनं २०२४ मध्ये शेअर बाजारात एन्ट्री केली होती.

फोन-पे नं काय म्हटलं?

कंपनी आपल्या संभाव्य आयपीओसंदर्भात प्राथमिक पावलं उचलत असून भारतीय शेअर बाजारात लिस्ट होण्याची योजना आहे, असं फोनपेनं एका निवेदनात म्हटलंय. यंदा कंपनीचा दहावा वर्धापनदिन असल्यानं कंपनीसाठी ही महत्त्वाची संधी असल्याचंही त्यांनी नमूद केलंय.

कंपनी २०२२ मध्ये भारतात आली

फोनपे डिसेंबर २०२२ मध्ये सिंगापूरहून भारतात आली होती. त्यासाठी त्यांना सरकारला सुमारे आठ हजार कोटी रुपयांचा कर भरावा लागला होता. २०२३ मध्ये शेवटच्या फंडिंग राउंडदरम्यान कंपनीचं मूल्य १२ अब्ज डॉलर्स होतं. आर्थिक वर्ष २०२४ मध्ये कंपनीचं कामकाजातून मिळणारे उत्पन्न ७३.८ टक्क्यांनी वाढून ५,०६४ कोटी रुपयांवर पोहोचलं. आर्थिक वर्ष २०२३ मध्ये ते २,९१४ कोटी रुपये होतं. तर आर्थिक वर्ष २०२४ मध्ये कंपनीचा निव्वळ तोटा आर्थिक वर्ष २०२३ मधील २७९५ कोटी रुपयांवरून १,९९६ कोटी रुपयांवर आला.

अकाऊंट अॅग्रीगेशन व्यवसायातून बाहेर

कंपनी अकाऊंट अॅग्रीगेशन व्यवसायातून बाहेर पडल्याचं नुकतंच फोन पे नं म्हटलं होतं. अपेक्षेप्रमाणे सेवा देण्यासाठी योग्य सोबती जोडू शकत नसल्यानं कंपनीनं हा निर्णय घेतल्याचं म्हटलं. एए परवान्यामुळे कंपनीला युजर्सची आर्थिक माहिती त्यांच्या संमतीनं मिळविण्याची आणि कर्ज, क्रेडिट कार्ड इत्यादी सारख्या वित्तीय सेवा देण्यासाठी बँकिंग आणि वित्तीय संस्थांशी सामायिक करण्याची परवानगी देण्यात आली. वॉलमार्ट समूहाच्या कंपनीला जून २०२३ मध्ये एए परवाना मिळाला.

(टीप : यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेमं आवश्यक आहे.)

Web Title: Keep your money ready Phone Pe IPO listing soon See full details share market investment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.