Rekha Jhunjhunwala Backed IPO: रेखा झुनझुनवाला यांची गुंतवणूक असलेली कंपनी आयकेएस हेल्थ म्हणजेच इन्व्हेंटुरस नॉलेज सोल्युशन्स लिमिटेडचा (Inventurus Knowledge Solutions Ltd) आयपीओ येत आहे. कंपनीने आयपीओसाठी प्राइस बँड निश्चित केला आहे. ग्रे मार्केटमध्ये कंपनीचं स्थान अतिशय मजबूत आहे. आयपीओ १२ डिसेंबर ते १६ डिसेंबर या कालावधीत खुला राहणार आहे.
आयपीओसाठी कंपनीनं प्रति शेअर १,२६५ ते १,३२९ रुपये प्राइस बँड निश्चित करण्यात आलीये. कंपनीच्या वतीनं एका लॉटमध्ये ११ शेअर्स ठेवण्यात आलेत. त्यामुळे किरकोळ गुंतवणूकदारांना किमान १४ हजार ६१९ रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. कंपनीच्या आयपीओची साईज २४९७.९२ कोटी रुपये आहे. आयपीओच्या माध्यमातून कंपनी ऑफर फॉर सेल अंतर्गत १.८८ कोटी शेअर्स जारी करणार आहे. या शेअर्सची फेस व्हॅल्यू १ रुपये आहे. शेअर्सचं वाटप १७ डिसेंबरला होणार असून हे शेअर्स १९ डिसेंबरला लिस्ट होतील.
ग्रे मार्केटमध्ये स्थिती काय?
इन्व्हेस्टर्स गेनच्या रिपोर्टनुसार, ग्रे मार्केटमध्ये कंपनीचा आयपीओ २२५ रुपयांच्या प्रीमियमवर व्यवहार करत आहे. म्हणजे १६ टक्क्यांहून अधिक वाढ दिसून येत आहे. गेल्या २ दिवसांपासून कंपनीच्या जीएमपीमध्ये कोणताही बदल झालेला नाही.
आयपीओच्या किमान ७५ टक्के भाग क्वालिफाईड इन्स्टिट्युशनल बायर्ससाठी राखीव ठेवण्यात येणार आहे. किरकोळ गुंतवणूकदारांसाठी जास्तीत जास्त १० टक्के आणि नॉन इन्स्टिट्युशनल इनव्हेस्टर्ससाठी जास्तीत जास्त १५ टक्के राखीव ठेवण्यात येणार आहे. कंपनीनं आपल्या कर्मचाऱ्यांसाठी ६५ हजार शेअर्स राखीव ठेवले आहेत.
गेल्या आर्थिक वर्षात कंपनीला १८५७.९४ कोटी रुपयांचा महसूल मिळाला होता. तर कर भरल्यानंतर कंपनीला कर भरल्यानंतर ३७०.४९ कोटी रुपयांचा नफा झालाय.
(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)