Inventurus Knowledge Solutions Ltd Stock Price: रेखा झुनझुनवालांचीगुंतवणूक कंपनी असलेल्या इन्व्हेंटुरस नॉलेज सोल्युशन्स लिमिटेडच्या (Inventurus Knowledge Solutions Ltd) शेअर्समध्ये आज जवळपास ४ टक्क्यांनी वाढ झाली. झुनझुनवालांनी गुंतवणूक केलेल्या या शेअरच्या कामगिरीबद्दल तज्ज्ञही उत्साही आहेत. त्यांनी या शेअरसाठी ₹२,००० ची टार्गेट प्राईज निश्चित केली आहे.
आज बीएसई वर रेखा झुनझुनवालाचा शेअर १५९६ रुपयांवर उघडला. दिवसभरात कंपनीचे शेअर्स ३.६५ टक्क्यांनी वाढून १६२९ रुपयांच्या इंट्राडे उच्चांकावर पोहोचले.
खरेदी करण्याची शिफारस
CNBC TV18 च्या रिपोर्टनुसार, ब्रोकरेजनं ₹२,००० ची टार्गेट प्राईज निश्चित केली आहे. ब्रोकरेज नोमुराचं या शेअरला BUY रेटिंग दिलंय. ही किंमत त्याच्या शुक्रवारच्या पातळीपेक्षा २८% नं अधिक आहे. ब्रोकरेजचा असा विश्वास आहे की यूएस हेल्थकेअर आउटसोर्सिंग मार्केट कॅलेंडर वर्ष २०२३ आणि २०१८ दरम्यान १२% च्या CAGR ने वाढू शकते.
झुनझुनवाला यांच्याकडे १६% हिस्सा
झुनझुनवाला कुटुंबाकडे कंपनीच्या १६.३७ टक्के हिस्सा आहे. निष्ठा, आर्यवीर आणि आर्यमन यांच्याकडे कंपनीच्या १६.३७ टक्के हिस्सा आहे. रेखा झुनझुनवाला यांच्याकडे ०.२३ टक्के हिस्सा आहे.
१७% ची घसरण
२०२५ मध्ये कंपनीच्या शेअरची किंमत १७% घसरली आहे, तर या काळात सेन्सेक्स ८.८२% वाढला आहे. कंपनीचा ५२ आठवड्यांचा उच्चांक ₹२,१९० आहे आणि ५२ आठवड्यांचा नीचांक ₹१,२२६.१५ आहे. तिचं मार्केट कॅप ₹२७,४३४ कोटी आहे.
(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)
