३१ एप्रिल २०२५ रोजी आयसीएल फिनकॉर्प सिक्युअर्ड रिडीमेबल नॉन-कन्व्हर्टेबल डिबेंचर्सचा (एनसीडी) नवा सार्वजनिक इश्यू लाँच झाला आहे. या नव्या इश्यूचा आपल्याला अभिमान वाटत असल्याचं कंपनीनं म्हटलं. १२.६२% पर्यंतचा प्रभावी परतावा (Effective Yield) देऊ शकणारा हा इश्यू, सोयीस्कर आणि लवचिक मुदतीची गुंतवणूक शोधणाऱ्यांसाठी आकर्षक आणि सुरक्षित पर्याय ठरू शकतो.
आमच्या मागील एनसीडी इश्यूजना उल्लेखनीय प्रतिसाद मिळाला होता आणि ते ओव्हरसबस्क्राइब केले गेले होते. आमच्या मौल्यवान गुंतवणूकदारांनी आमच्यावर दाखवलेल्या विश्वासामुळे आम्हाला खरोखरच सन्मानित वाटत आहे. हे सततचं मिळणारं पाठबळ आम्हाला आमच्या ग्राहकांच्या बदलत्या गरजांनुसार अधिक मजबूत आर्थिक उपाय प्रदान करण्यास प्रेरित करत आहे.
हा एनसीडी इश्यू १३ ऑगस्ट २०२५ पर्यंत खुला राहील आणि त्याला क्रिसिल बीबीबी-/स्टेबल रेटिंग देण्यात आलं आहे. प्रत्येक एनसीडीची फेस व्हॅल्यू ₹१,००० आहे आणि हा इश्यू १० पर्यायांसह (१० आयएसआयएन) १० योजना ऑफर करतो, ज्यांचे व्याजदर १०.५०% ते १२.००% पर्यंत आहेत. अर्जाची किमान रक्कम ₹१०,००० आहे.
या इश्यूमधून मिळणारं उत्पन्न आयसीएल फिनकॉर्पच्या वाढीच्या उपक्रमांसाठी आणि भारतातील आमच्या ग्राहकांना आणि भागधारकांना दिल्या जाणाऱ्या सेवांची गुणवत्ता आणखी वाढवण्यासाठी धोरणात्मकरित्या वापरलं जाईल. हे पाऊल विश्वासार्ह, नाविन्यपूर्ण आणि ग्राहककेंद्री आर्थिक उपाय प्रदान करण्याची आमची बांधिलकी दर्शवते.
आयसीएल फिनकॉर्प गेल्या ३४ वर्षांपासून अविरत कार्यरत आहे. आयसीएल फिनकॉर्पचे सीएमडी अॅड. के.जी. अनिल कुमार यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली एक विश्वासार्ह आर्थिक भागीदार म्हणून ते काम करतंय. केरळ, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगण, कर्नाटक, ओरिसा, महाराष्ट्र आणि गुजरात या ८ राज्यांमध्ये कंपनी कार्यरत आहे. आम्ही संपूर्ण भारतात आपला ठसा उमटवण्याच्या दिशेनं वाटचाल करत आहोत. तामिळनाडूमध्ये ९३ वर्षांचा इतिहास असलेल्या आणि बीएसईवर लिस्टेड असलेल्या सेलम इरोड इन्व्हेस्टमेंट्स या एनबीएफसीच्या अधिग्रहणामुळे वित्तीय क्षेत्रातील आमचं स्थान आणखी मजबूत झालंय. याशिवाय, आयसीएल फिनकॉर्पनं १९९५ मध्ये स्थापन झालेल्या आणि विश्वास, पारदर्शकता आणि ग्राहककेंद्री वित्तीय सेवांच्या वारशासाठी ओळखल्या जाणाऱ्या कोलकाता स्थित एनबीएफसी, लानेसेडा वाणिज्य प्रायव्हेट लिमिटेडचं (Laneseda Vanijya Pvt. Ltd) अधिग्रहण केलं आहे.
आयसीएल फिनकॉर्प गोल्ड लोन, हायर पर्चेज लोन आणि बिझनेस लोनसह सेवांचा एक व्यापक पोर्टफोलिओ प्रदान करते. आयसीएल समूहानं ट्रॅव्हल, फॅशन, डायग्नोस्टिक आणि चॅरिटेबल इनिशिएटिव्ह्ससारख्या क्षेत्रांमध्ये ही विविधता आणली आहे. आयसीएल फिनकॉर्पचे सीएमडी अॅड. के. जी. अनिल कुमार आणि पूर्ण वेळ संचालिक आणि सीईओ उमा अनिल कुमार यांच्या संयुक्त नेतृत्वाखाली रिझर्व्ह बँकेच्या नियमाचं पालन करून काम करत असतानाच ग्राहकांचा विश्वासही संपादन केला आहे.
या नवीन एनसीडी इश्यूचं अनावरण करताना, आम्ही तुम्हाला आर्थिक वाढ, सुरक्षितता आणि दीर्घकालीन मूल्याच्या दिशेनं आमच्या प्रवासात सहभागी होण्याचं आवाहन करत आहोत.
(Disclaimer - हा स्पॉन्सर्ड लेख असून त्यातील माहिती, मते आणि अंदाज याचा 'लोकमत'शी कुठलाही संबंध नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)