Flipkart IPO News: वॉलमार्टच्या मालकीची ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टनं आयपीओपूर्वी मोठी घोषणा केली आहे. बायबॅक योजनेचा एक भाग म्हणून कंपनी ५ कोटी डॉलर्सचे कर्मचारी शेअर्स खरेदी करण्याची योजना आखत आहे. याचा फायदा ७५०० हून अधिक ई-कॉमर्स कर्मचाऱ्यांना होणार आहे.
काय आहे पूर्ण प्लान?
सीईओ कल्याण कृष्णमूर्ती यांनी कर्मचाऱ्यांना पाठवलेल्या अंतर्गत ईमेलनुसार, ६ जुलै २०२२ ते ५ जुलै २०२५ या कालावधीत कंपनीत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या वेस्टेड कर्मचारी स्टॉक ओनरशिप प्लानच्या (ईएसओपी) ५% पर्यंत विक्री करण्याचा पर्याय असेल. वर्षाच्या अखेरपर्यंत प्रमुख उद्दिष्टं पूर्ण झाल्यास २०२६ च्या सुरुवातीला ५ टक्के ईएसओपी लिक्विडिटीची आणखी एक संधी मिळू शकते, असंही कल्याण यांनी सांगितले. कंपनीचं सध्याचं मूल्यांकन ३६ अब्ज डॉलरच्या आसपास असल्याचा अंदाज आहे. कंपनीचे एकूण २२ हजार कर्मचारी आहेत.
८ व्या वेतन आयोगाच्या शिफारसी केव्हापर्यंत लागू होणार, केंद्रीय कर्मचाऱ्यांना माहीत करुन घेणं गरजेचं
फ्लिपकार्टमध्ये वॉलमार्टचा हिस्सा
वॉलमार्टनं २०१८ मध्ये भारतीय ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टमधील ७७ टक्के हिस्सा १६ अब्ज डॉलरमध्ये खरेदी केला होता. आता कंपनी आयपीओ आणण्याचा विचार करत आहे. पुढील वर्षाच्या पहिल्या सहामाहीत कंपनीचा आयपीओ लाँच होईल, असा अंदाज आहे.
मीशोचा आयपीओ येणार
अलीकडेच फ्लिपकार्टची प्रतिस्पर्धी कंपनी मीशोनं आपला आयपीओ गोपनीय मार्गानं आणण्यासाठी बाजार नियामक सेबीकडे मसुदा कागदपत्रं सादर केली आहेत. २५ जून रोजी मेशोच्या भागधारकांच्या सर्वसाधारण सभेत आयपीओ लाँच करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. आयपीओच्या माध्यमातून किमान ४,२५० कोटी रुपये उभे करण्याची कंपनीची योजना आहे.