Upcoming IPO : आयपीओच्या माध्यमातून कमाई करण्याची संधी गमावली असेल तर निराश होऊ नका. या आठवड्यात आयपीओ बाजारात जोरदार हालचाली दिसणार आहेत. पुढील आठवड्यात ५ मेन बोर्ड आणि ६ एसएमईचे आयपीओ बाजारात दाखल होतील. या ११ कंपन्या आयपीओमधून सुमारे १८,५०० कोटी रुपये उभारण्याची योजना आखत आहेत.
या कंपन्यांचं आयपीओ येणार
या आठवड्यात विशाल मेगा मार्ट (Vishal Mega Mart), टीपीजी कॅपिटलसमर्थित साई लाइफ सायन्सेस (Sai Life Sciences), फिनटेक कंपनी वन मोबिक्विक सिस्टीम्स (One Mobikwik Systems), इन्व्हेंटुरस नॉलेज सोल्युशन्स लिमिटेड (Inventurus Knowledge Solutions) आणि ब्लॅकस्टोनच्या मालकीची डायमंड ग्रेडिंग कंपनी इंटरनॅशनल जेमोलॉजिकल इन्स्टिट्यूट (इंडिया) (International Gemmological Institute (India) यांचा समावेश आहे.
६ SME आयपीओही येणार
मेनबोर्ड ५ आयपीओसह, एसएमई या आठवड्यात आपला पहिला पब्लिक इश्यू जारी करण्याच्या तयारीत आहेत. एकत्रितपणे १५० कोटींहून अधिक रक्कम उभारण्याचं त्यांचं उद्दिष्ट आहे. हे आयपीओ विविध क्षेत्रं आणि निरनिराळ्या साईजचे असतील. त्यात नवीन इश्यू आणि ऑफर फॉर सेलचाही समावेश असेल.
विद्यमान भागधारकांना बाहेर पडण्याचा मार्ग देण्यासाठी तसंच विस्तार योजनांसाठी फंड गोळा करण्यासाठी, कर्जाची परतफेड करण्यासाठी आणि कार्यशील भांडवलाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी कंपन्या आयपीओचा वापर करत आहेत.
७८ कंपन्यांनी उभारले १.४ लाख कोटी
२०२४ मध्ये आतापर्यंत ह्युंदाई मोटर इंडिया, स्विगी, एनटीपीसी ग्रीन एनर्जी, बजाज हाऊसिंग फायनान्स आणि ओला इलेक्ट्रिक मोबिलिटीसह ७८ मेन-बोर्ड कंपन्यांनी एकत्रितपणे आयपीओच्या माध्यमातून सुमारे एकत्रित १.४ लाख कोटी रुपये उभे केले आहेत. २०२३ मध्ये ५७ कंपन्यांनी या मार्गानं उभारलेल्या ४९,४३६ कोटी रुपयांपेक्षा हे प्रमाण अधिक आहे.
केव्हा खुले होणार आयपीओ
विशाल मेगा मार्ट, साई लाइफ सायन्सेस आणि मोबिक्विकचा आयपीओ ११ डिसेंबर रोजी गुंतवणूकीसाठी खुला होतील आणि १३ डिसेंबर रोजी बंद होतील. इन्व्हेंटुरस नॉलेज सोल्यूशन्स आणि इंटरनॅशनल जेमोलॉजिकल इन्स्टिट्यूटचा आयपीओ अनुक्रमे १२ आणि १३ डिसेंबर रोजी उघडतील.
(नोट: यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)