Multibagger Penny Stock: शेअर बाजारातील गुंतवणूक जोखीमीची असली तरी, काही शेअर्स असे असतात, जे अल्पावधीत गुंतवणूकदारांना बंपर नफा देतात. असाच एक छोटा पण जबरदस्त कोलॅब प्लॅटफॉर्म्स (Colab Platforms) चा शेअर आहे. या शेअरमध्ये पैसा लावणारे गुंतवणूकदार केवळ पाच वर्षांत करोडपती झाले आहेत.
30 दिवस सलग अपर सर्किट!
Colab Platforms च्या शेअरमध्ये मागील 30 सलग ट्रेडिंग दिवसांपासून अपर सर्किट लागतोय. आठवड्याच्या शेवटच्या दिवशी (शुक्रवारी)ही या शेअरने 2% वाढ नोंदवून ₹189.10 चा भाव गाठला. हा स्टॉक सततच्या वाढीमुळे चर्चेत आहे आणि गुंतवणूकदारांना मोठा परतावा देत आहे. ही कंपनी डेटा विश्लेषण, अॅथलीट करिअर प्लॅनिंग आणि स्पोर्ट्स ब्रँडिंग या क्षेत्रात काम करते.
₹1 वरून ₹189 पर्यंतचा प्रवास
पाच वर्षांपूर्वी या शेअरचा दर फक्त ₹1.09 होता, आज तो ₹189.10 पर्यंत झेपावला आहे. म्हणजेच, गेल्या पाच दिवसात यात 17,248% परतावा दिला आहे.
1 लाखाची गुंतवणूक = ₹1.7 कोटींचा नफा
जर एखाद्या गुंतवणूकदाराने 5 वर्षांपूर्वी ₹1 दराने ₹1 लाखाची गुंतवणूक केली असती आणि ती अजूनही होल्ड ठेवली असती, तर आज त्याची रक्कम ₹1.70 कोटींहून अधिक झाली असती.
फक्त एका वर्षात 2935% वाढ
Colab Platforms या स्मॉल-कॅप कंपनीचे मार्केट कॅपिटल ₹3,858 कोटींवर पोहोचले आहे. या शेअरने नुकताच 52-वीक हाय ₹189.10 गाठला आहे. विशेष म्हणजे, गेल्या 12 महिन्यांत 2935% वाढ तर केवळ 6 महिन्यांत 168% परतावा दिला आहे. रिपोर्ट्सनुसार, कंपनीने सेमिकंडक्टर मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रात प्रवेश केला आहे आणि हाच व्यवसाय विस्तार या झपाट्याने झालेल्या वाढीमागील मोठा घटक मानला जातो.
टीप: शेअर बाजारातील गुंतवणूक जोखमीची असते. कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या वित्तीय सल्लागारांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
