Lokmat Money >शेअर बाजार > अमेरिकन व्हिसा शुल्काची चिंता, तर जीएसटीचा दिलासा; शेअर बाजाराची प्रतिक्रिया काय असेल?

अमेरिकन व्हिसा शुल्काची चिंता, तर जीएसटीचा दिलासा; शेअर बाजाराची प्रतिक्रिया काय असेल?

अमेरिकेने आपल्या एच १बी व्हिसाच्या शुल्कामध्ये केलेली जबरदस्त वाढ आणि जीएसटीचे कमी झालेले दर यापैकी कोणती बाब वरचढ ठरणार यावर शेअर बाजाराची चाल अवलंबून आहे.

By प्रसाद गो.जोशी | Updated: September 22, 2025 11:57 IST2025-09-22T11:47:34+5:302025-09-22T11:57:01+5:30

अमेरिकेने आपल्या एच १बी व्हिसाच्या शुल्कामध्ये केलेली जबरदस्त वाढ आणि जीएसटीचे कमी झालेले दर यापैकी कोणती बाब वरचढ ठरणार यावर शेअर बाजाराची चाल अवलंबून आहे.

Concerns over US visa fees relief from GST how will share market react | अमेरिकन व्हिसा शुल्काची चिंता, तर जीएसटीचा दिलासा; शेअर बाजाराची प्रतिक्रिया काय असेल?

अमेरिकन व्हिसा शुल्काची चिंता, तर जीएसटीचा दिलासा; शेअर बाजाराची प्रतिक्रिया काय असेल?

प्रसाद गो. जोशी

अमेरिकेने आपल्या एच १बी व्हिसाच्या शुल्कामध्ये केलेली जबरदस्त वाढ आणि जीएसटीचे कमी झालेले दर यापैकी कोणती बाब वरचढ ठरणार यावर शेअर बाजाराची चाल अवलंबून आहे. याशिवाय भारत-अमेरिका व्यापार कराराबाबतची चर्चा, इंधनाचे दर याकडेही बाजाराचे लक्ष लागलेले असणार आहे.

अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने व्याजदरामध्ये केलेल्या कपातीमुळे गुंतवणूकदारांमध्ये समाधानाचे वातावरण असतानाच शुक्रवारी (दि. १९) रात्री ट्रम्प प्रशासनाने अमेरिकेच्या एच १बी व्हिसाच्या शुल्कामध्ये मोठी वाढ केली आहे. त्यामुळे माहिती तंत्रज्ञान क्षेत्राला मोठा फटका बसणार आहे. 
गेल्या काही दिवसांपासून ट्रम्प यांनी लावलेल्या टॅरिफमुळे माहिती तंत्रज्ञान क्षेत्र अडचणीत आले आहे. त्यातच व्हिसाचे शुल्क वाढल्याने भर पडली आहे. त्यामुळे हा सप्ताह बाजार यावर काय प्रतिक्रिया देतो, ते बघावे लागणार आहे.

जीएसटीचे दर कमी करण्याबाबत सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे बाजारात काही प्रमाणात चैतन्य आले आहे. त्याचवेळी बाजारावर व्हिसाचा बॉम्ब आदळल्याने कोण प्रभावी ठरणार यावरच बाजाराचे भवितव्य अवलंबून राहणार आहे. त्यामुळे जर जीएसटी कपात वरचढ ठरली तर बाजारात तेजी येण्यास मदत हाेणार आहे. 

नक्की काय होणार याकडे लक्ष लागून आहे. दरम्यान गतसप्ताहामध्ये सेन्सेक्स ९५१.५३ अंशांनी वाढून ८२८२६.२३ अंशांवर बंद झाला, तर निफ्टीमध्ये २१३.०५ अंशांची वाढ झाली आहे. मिडकॅप व स्मॉलकॅप निर्देशांकही वाढीव पातळीवर बंद झाले.

सामान्य गुंतवणूकदार चिंतेत नेमके का आहेत?

भारतीय शेअर बाजारापासून परकीय वित्तसंस्थांकडून पैसे काढून घेण्याची प्रक्रिया सुरूच आहे. सप्टेंबर महिन्याच्या २० दिवसांमध्ये या संस्थांनी बाजारातून ७९४५ कोटी रुपये काढून घेतले आहेत.  याआधी जुलै आणि ऑगस्टमध्ये या संस्थांनी बाजारातून अनुक्रमे १७,७०० कोटी व ३१,९९० कोटी रुपये काढले आहेत. या धोरणामुळे सामान्य गुंतवणूकदार चिंतेत आहेत.

टीव्हीच्या दरांत घट

जीएसटी कपातीनंतर टीव्ही कंपन्या २,५०० ते ८५,००० रुपयांपर्यंत किंमतकपात करत आहेत. ३२ इंचांपेक्षा  मोठ्या स्क्रीन असलेल्या टीव्हींवरील करदर २८ %वरून १८ टक्क्यांवर आला. सोनी इंडियाने ४३ इंचांपासून ९८ इंचांपर्यंतच्या ब्राव्हिया मॉडेल्सवर ५,००० रुपयांपासून ७१,००० रुपयांपर्यंत कपात केली आहे. एलजी इलेक्ट्रॉनिक्स इंडियाने ४३ इंचांपासून १०० इंचांपर्यंतच्या मॉडेल्सवर २,५०० ते ८५,८०० रुपयांपर्यंत कपात केली आहे. पॅनासोनिकने ३,००० रुपयांपासून ३२,००० रुपयांपर्यंत कपात केली आहे.

Web Title: Concerns over US visa fees relief from GST how will share market react

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.