Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money >शेअर बाजार > अदानींनी खरेदी केली आणखी एक कंपनी, किती कोटींना झाली डील? शेअर्स सुस्साट...

अदानींनी खरेदी केली आणखी एक कंपनी, किती कोटींना झाली डील? शेअर्स सुस्साट...

Gautam Adani News: अदानी समूहानं आणखी एक कंपनी विकत घेतली आहे. समूहानं शुक्रवारी यासंदर्भातील घोषणा केली. पाहूया कोणती आहे कंपनी.

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2025 13:06 IST2025-06-27T13:04:45+5:302025-06-27T13:06:30+5:30

Gautam Adani News: अदानी समूहानं आणखी एक कंपनी विकत घेतली आहे. समूहानं शुक्रवारी यासंदर्भातील घोषणा केली. पाहूया कोणती आहे कंपनी.

Adani buys another company realty sector how many crores was the deal stocks rocket | अदानींनी खरेदी केली आणखी एक कंपनी, किती कोटींना झाली डील? शेअर्स सुस्साट...

अदानींनी खरेदी केली आणखी एक कंपनी, किती कोटींना झाली डील? शेअर्स सुस्साट...

Gautam Adani News:  अदानी समूहाची कंपनी अदानी एंटरप्रायजेस लिमिटेडनं (एईएल) मोठी घोषणा केली आहे. एईएलची अदानीकॉनेक्स प्रायव्हेट लिमिटेड नावाचा जॉईंट व्हेन्चर आहे. अदानी कॉनेक्सनं ग्रांथिक रियल्टर्स प्रायव्हेट लिमिटेड (Granthik Realtors Pvt Ltd) नावाची कंपनी विकत घेतली आहे. हा करार ८५.९९ कोटी रुपयांचा आहे. कंपनीने शुक्रवारी शेअर बाजाराला ही माहिती दिली.

अदानी कॉनेक्सनं विंडसन प्रोजेक्ट्स एलएलपी आणि त्याच्या नामांकित कंपन्यांशी करार केला होता. याअंतर्गत ग्रांथिकचे सर्व शेअर्स २६ जून २०२५ रोजी खरेदी करण्यात आले होतं. एईएलनं दिलेल्या माहितीनुसार या करारामुळे पायाभूत सुविधांच्या विकासात अदानी कॉनेक्सला मदत होईल. ग्रांथिक रियल्टर्स प्रायव्हेट लिमिटेड यांनी अद्याप काम सुरू केलेले नाही, परंतु त्यांच्याकडे जमीन आणि आवश्यक परवाने आहेत. यामुळे अदानी कॉनेक्सला हा प्रकल्प सुरू करणं सोपं जाणार आहे. अदानी समूहानं यापूर्वीच अनेक कंपन्यांचे अधिग्रहण केलंय.

₹२ च्या मजुरीपासून ते ₹२००० कोटींच्या मालक; पद्मश्री मिळवणाऱ्या अकोल्याच्या कल्पना सरोज यांचा कसा होता प्रवास

कंपनी काय करते?

ग्रांथिक रियल्टर्सची नोंदणी मे २०२३ मध्ये मुंबईत झाली होती. ही कंपनी पायाभूत सुविधांच्या विकासाच्या क्षेत्रात काम करते. हा करार रिलेटेड पार्टी नॉर्म्समध्ये समाविष्ट नाही, असं कंपनीनं सांगितलं. याचाच अर्थ हा करार समूहातील अन्य कोणत्याही कंपनीशी झालेला नाही. ही डील कॅशमध्ये झाली. "हे अधिग्रहण आमच्या पायाभूत सुविधांच्या क्षमतेत वाढ करण्याच्या आमच्या उद्दिष्टाच्या अनुषंगानं आहे," अशी प्रतिक्रिया कंपनीनं दिली. म्हणजेच कंपनीला पायाभूत सुविधा अधिक बळकट करायची आहे.

शेअर्स सुस्साट

या करारानंतर, शुक्रवारी अदानी एंटरप्रायझेस लिमिटेडचा शेअर वधारला. शुक्रवारी सकाळी १०:३० वाजता हा शेअर १.८४% वाढीसह २६३३.६५ रुपयांवर व्यवहार करत होता. गेल्या काही काळापासून या शेअरमध्ये खूप चढ-उतार होत आहेत. एका महिन्यात त्याचा परतावा सुमारे ३.५० टक्के आहे. त्याच वेळी, एका वर्षात त्यात लक्षणीय घट झालीये. एका वर्षात हा शेअर सुमारे १७ टक्क्यांनी घसरलाय.

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title: Adani buys another company realty sector how many crores was the deal stocks rocket