Upcoming IPO: गुंतवणूकदारांसाठी एक मोठी बातमी आली आहे. ओरिक्ला इंडियाचा (Orkla India) आयपीओ (IPO) येत आहे, जी एमटीआर फूड्सची (MTR Foods) मूळ कंपनी आहे. ही १०१ वर्ष जुनी कंपनी आहे. ओरिक्ला इंडियाने त्यांच्या १६६७ कोटी रुपयांच्या आयपीओचा प्राइस बँड निश्चित केला आहे.
हा आयपीओ २९ ऑक्टोबरला उघडेल आणि ३१ ऑक्टोबरपर्यंत सबस्क्रिप्शनसाठी बंद होईल. याचा प्राइस बँड ६९५ ते ७३० रुपये प्रति शेअर दरम्यान आहे आणि लॉट साइज २० शेअर्सचा आहे. आयपीओचा ५० टक्के भाग क्वालिफाईड इन्स्टिट्यूशनल बायर्स (QIB), १५ टक्के नॉन-इन्स्टिट्यूशनल इनव्हेस्टर्स (NII) आणि ३५ टक्के रिटेल गुंतवणूकदारांसाठी राखीव आहे.
टाटा ट्रस्टमधील वाद लवकरच संपणार? मेहली मिस्त्रींसाठी नवी ऑफर, समूहात वर्चस्व वाढणार
२.०५ कोटी शेअर्स विकण्याची तयारी
हा आयपीओ पूर्णपणे 'ऑफर फॉर सेल' (OFS) आहे, म्हणजेच कोणताही नवीन शेअर जारी केला जाणार नाही. सर्व पैसा विद्यमान भागधारकांना मिळेल. ओरिक्ला एशिया पॅसिफिक २.०५ कोटी शेअर्स विकेल, जे त्यांना प्रति शेअर १११ रुपयांना मिळाले होते. याव्यतिरिक्त, आवास मीरान आणि मीरा आवास देखील ११.४१ लाख शेअर्स विकतील, हे शेअर्स त्यांना ४५८.७ रुपयांच्या सरासरी भावानं मिळाले होते.
मनीकंट्रोलच्या अहवालानुसार, सध्या ग्रे मार्केटमध्ये जास्त हालचाल नाहीये, परंतु तज्ज्ञांचे म्हणणं आहे की गुंतवणूक कंपनीचे फंडामेंटल्स आणि फायनान्शियल्स पाहून करावी, ग्रे मार्केटच्या संकेतांवर गुंतवणूक केली जाऊ नये.
कंपनीची सुरुवात कधी झाली?
एमटीआर फूड्सची सुरुवात १९२४ मध्ये बंगळूरुमध्ये मैया कुटुंबाने एका रेस्टॉरंटमधून केली होती. हळूहळू ही पॅकेज्ड फूडची मोठी कंपनी बनली. २००७ मध्ये नॉर्वेच्या ओरिक्लानं ती विकत घेतली, ज्यामुळे तिच्या वाढीला गती मिळाली. आज ओरिक्ला इंडिया, नॉर्वेच्या ओस्लो स्टॉक एक्स्चेंजवर लिस्टेड असलेल्या ओरिक्ला एएसएच्या (Orkla ASA) टॉप-१० कंपन्यांमध्ये समाविष्ट आहे. याचा पोर्टफोलिओ मसाले, रेडी-टू-ईट मिठाया, ब्रेकफास्ट मिक्स आणि ३-मिनिट रेंजसारख्या प्रोडक्ट्सनी भरलेला आहे. ही उत्पादनं प्रत्येक भारतीयाच्या स्वयंपाकघरात स्थान मिळवून आहेत. कंपनीचा फोकस गुणवत्ता आणि पारंपरिक चवीवर आहे, ज्यामुळे ती खास ठरते.
हा आयपीओ गुंतवणूकदारांसाठी एक चांगली संधी असू शकतो, विशेषतः ज्यांना पॅकेज्ड फूड क्षेत्रात रस असलेल्यांसाठी ही संधी ठरू शकते. बाजारात एसएमई आयपीओनं लिस्टिंगवर चांगले रिटर्न दिले आहेत, परंतु दीर्घकाळात कामगिरी बदलती राहिली आहे.
(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. यातील तज्ज्ञांची मतं त्यांची वैयक्तिक मतं आहेत. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)
