silver crosses rs 75000 per kg mark after 8 years | आठ वर्षांनंतर चांदी झेप पुन्हा ७५ हजारांच्या पुढे!

आठ वर्षांनंतर चांदी झेप पुन्हा ७५ हजारांच्या पुढे!

- विजयकुमार सैतवाल 

जळगाव : जागतिक मंदी, युद्धजन्य स्थिती, डॉलरचे दर या सर्वांचा परिणाम होणाऱ्या सोने-चांदीच्या भावावर आठ वर्षांनंतर पुन्हा एकदा मोठा परिणाम झाल्याचे जागतिक पातळीवर चित्र आहे. सन २०१२ मध्ये ७५ हजार रुपये प्रति किलोवर पोहचून तीनच दिवसात अचानक २० हजार रुपयांची घसरण झालेल्या चांदीने आता आठ वर्षांनंतर पुन्हा ७५ हजार रुपये प्रति किलोचा टप्पा ओलांडला आहे. अशाच प्रकारे त्या वेळीदेखील उच्चांकीवर पोहचलेल्या सोन्याच्याही भावाने ५७ हजाराचा टप्पा ओलांडून आता पुन्हा एकदा नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. यात तुलना पाहता चांदी पुन्हा ७५ हजाराच्या पुढे गेली असली तरी सोन्याचे भाव २०१२च्या तुलनेत आता अडीच पटीने वाढले आहेत.

२०१२ मध्येही अमेरिकेच्या धोरणामुळे तसेच इंधनाच्या बाबतीत अरब राष्ट्रांनी घेतलेला निर्णय, शेअर बाजाराची स्थिती यामुळे सोने-चांदीत गुंतवणूक वाढली होती. परिणामी भाव वाढले होते. आताही कोरोनाच्या संकटात सुरक्षित गुंंतवणूक म्हणून सोने-चांदीकडे कल वाढला आहे.त्यामुळे आताही भाव वाढले आहेत.
- अजयकुमार ललवाणी, अध्यक्ष, जळगाव शहर सराफ बाजार असोसिएशन

अशी मिळाली झळाली
दिनांक               सोने          चांदी
७ जुलै             ४९,२००    ५०,५००
१४ जुलै           ५०,०००     ५४,०००
२१ जुलै           ५१,०००     ६०, ५००
२८ जुलै          ५३, ५००    ६७,५००
२९ जुलै          ५४, ९००    ६६,२००
३१ जुलै           ५४,०००     ६५,०००
१ ऑगस्ट        ५४,७००     ६६,०००
५ ऑगस्ट       ५५,८००     ७१,०००
६ ऑगस्ट       ५६,४००     ७३,५००
७ ऑगस्ट       ५७,२००     ७७,५००

जागतिक घटनांचा परिणाम
सोने-चांदीच्या भावावर जागतिक घडामोडींचा मोठा परिणाम होत असतो. कोरोनाच्या संकटात सर्वच क्षेत्राला झळ बसत असल्याने सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोने-चांदीच्या खरेदीकडे सध्या मोठा कल वाढला आहे.
कोरोनामुळे जागतिक शेअर बाजार असो की, रिअल इस्टेट क्षेत्र असो, या सर्वच ठिकाणी बिकट स्थिती उद्धभवली आहे. त्यात कोरोनामुळे कोलमडलेल्या अर्थव्यवस्थेत व्याज देणे शक्य नसल्याने जागतिक पातळीवर बँकांनी व्याजदर शून्य टक्के केले आहे.
कोरोनाचा संसर्ग ज्या चीनमधून झाला त्याच चीनकडून होणाºया कुरापतींमुळे भारत-चीन सीमेवर उद््भवलेल्या युद्धजन्य स्थितीमुळेही सोने-चांदीच्या दरामध्ये भाववाढ होण्यास मदत होत गेली. यात भर पडली होती ती सट्टा बाजाराची. त्यामुळे सोने २३ हजार रुपये प्रति तोळा तर चांदी थेट ७५ हजार रुपये प्रति किलोवर पोहचली होती.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: silver crosses rs 75000 per kg mark after 8 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.