Lokmat Money > बिझनेस न्यूज > शेअर बाजारात तेजी कायम; गुंतवणूकदारांमध्ये उत्साह, निर्देशांक नव्या उच्चांकांवर बंद

शेअर बाजारात तेजी कायम; गुंतवणूकदारांमध्ये उत्साह, निर्देशांक नव्या उच्चांकांवर बंद

मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक ०.५४ टक्के म्हणजेच २६० अंकांच्या वाढीसह ४८ हजार ४३७ अंकांवर बंद झाला. तर, ६६.६० अंकांच्या तेजीसह निफ्टी निर्देशांक १४ हजार १९९ अंकांवर बंद झाला. 

By देवेश फडके | Published: January 5, 2021 05:16 PM2021-01-05T17:16:47+5:302021-01-05T17:20:02+5:30

मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक ०.५४ टक्के म्हणजेच २६० अंकांच्या वाढीसह ४८ हजार ४३७ अंकांवर बंद झाला. तर, ६६.६० अंकांच्या तेजीसह निफ्टी निर्देशांक १४ हजार १९९ अंकांवर बंद झाला. 

share market sensex nifty and closing at indian benchmark | शेअर बाजारात तेजी कायम; गुंतवणूकदारांमध्ये उत्साह, निर्देशांक नव्या उच्चांकांवर बंद

शेअर बाजारात तेजी कायम; गुंतवणूकदारांमध्ये उत्साह, निर्देशांक नव्या उच्चांकांवर बंद

Highlightsआठवड्याच्या दुसऱ्या दिवशीही शेअर बाजारात तेजीमुंबई शेअर बाजार आणि निफ्टी निर्देशांक नव्या उच्चांकासह बंदगुंतवणूकदारांमध्ये उत्साह; अनेक कंपन्यांच्या समभागांनी गाठली सर्वोच्च पातळी

मुंबई :शेअर बाजाराची सुरुवात घसरणीने झाली असली तरीही तिमाहीचा अनुकूल आढावा आणि कोरोना लसीसंदर्भात येणाऱ्या सकारात्मक बातम्यांमुळे गुंतवणूकदारांमधील उत्साह वाढत गेला. याचा परिणाम म्हणजे मुंबई शेअर बाजाराचानिर्देशांक ०.५४ टक्के म्हणजेच २६० अंकांच्या वाढीसह ४८ हजार ४३७ अंकांवर बंद झाला. तर, ६६.६० अंकांच्या तेजीसह निफ्टीनिर्देशांक १४ हजार १९९ अंकांवर बंद झाला. 

अमेरिकी आणि आशियातील बाजारात घसरण पाहायला मिळत असली, तरी त्याचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर झालेला नाही. या आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी शेअर बाजार वाढीसह बंद झाला. बाजारात जवळपास सर्वच क्षेत्रात खरेदीचा उत्साह पाहायला मिळाला. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचे समभागांनी उच्चांक नोंदवला. 'टीसीएस'सह रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीचे समभागही सर्वोच्च पातळीवर होते. 

नवीन वर्षाची सुरुवात झाल्यापासून शेअर बाजारात तेजी पाहायला मिळत आहे. गेल्या आठवड्याभरात मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक ८९५.४४ अंकांनी वधारला. शेअर बाजारात तेजी असली, तरी गुंतवणूकदारांना सावधगिरी बाळगून व्यवहार करावे. शेअर बाजारात चढ-उतार सुरू असतात, असे तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे. 

शेअर बाजाराचा आजचा (मंगळवार) आढावा घेतल्यास एचएचडीएफसी, एचडीएफसी लाइफ, इंडसइंड बँक आणि विप्रो या कंपनींचे समभाग वधारले. तर दुसरीकडे ओएनजीसी, हिंडाल्को, टाटा स्टील, बजाज फायनान्स आणि जेएसडब्ल्यू स्टील या कंपन्यांच्या समभागात घसरण नोंदवली गेली. तसेच रियल्टी, वाहन, धातू, बँक, पीएसयू बँक, फायनान्स सर्व्हिसेस, एफएमसीजी, आयटी, फार्मा आणि मीडिया या सेक्टरचे समभाग वधारल्याचे पाहायला मिळाले.

दरम्यान, नवीन वर्षाच्या दुसऱ्या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजार सर्वोच्च पातळी गाठून बंद झाला होता. सोमवारी शेअर बाजाराच्या निर्देशांकाने ४८ हजारांचा टप्पा पार केला होता. तसेच निफ्टीही १४ हजारांचा टप्पा पार करून तेजीसह बंद झाला होता. 

Web Title: share market sensex nifty and closing at indian benchmark

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.