Share Market Knowledge: IPO म्हणजे काय रे भाऊ?; 'लिस्टिंग'च्या वेळची किंमत कशी ठरते?.. वाचा! 

By पुष्कर कुलकर्णी | Published: December 4, 2021 05:03 PM2021-12-04T17:03:30+5:302021-12-04T17:10:33+5:30

कोणत्याही कंपनीस जर आयपीओद्वारे भाग भांडवल उभे करायचे असेल तर सेबीने घालून दिलेल्या नियम, अटी, शर्ती या सर्वांची पूर्तता करूनच खुल्या बाजारात आयपीओ लॉन्च केला जातो.

Share Market Knowledge: What is an IPO?; How IPO Listing Price Is Decided? | Share Market Knowledge: IPO म्हणजे काय रे भाऊ?; 'लिस्टिंग'च्या वेळची किंमत कशी ठरते?.. वाचा! 

Share Market Knowledge: IPO म्हणजे काय रे भाऊ?; 'लिस्टिंग'च्या वेळची किंमत कशी ठरते?.. वाचा! 

Next

>> डॉ. पुष्कर कुलकर्णी

मागील भागात आपण बुल आणि बेअर म्हणजे नेमके काय  हे जाणून घेतले. या भागात फेस व्हॅल्यू आणि आयपीओ, लिस्टिंग आणि लिस्टिंग गेन म्हणजे नेमके काय, हे जाणून घेऊ. 

फेस व्हॅल्यू म्हणजे काय? 

शेअरचे मूळ मूल्य यालाच फेस व्हॅल्यू असे म्हणतात. हे  मूल्य शेअर सर्टिफिकेटवर नमूद असते. म्हणजेच 10 रुपये हे जर शेअरचे मूळ मूल्य असेल तर त्या शेअरची फेस व्हॅल्यू दहा रुपये असे म्हणावे. बाजारात जी किंमत खरेदी आणि विक्रीसाठी असते त्या किमतीस मार्केट व्हॅल्यू असे म्हणतात. मार्केट व्हॅल्यू फेस व्हॅल्यू पेक्षा कमी किंवा जास्त असू शकते. 

आयपीओ म्हणजे काय? 

कंपनीला विस्तार योजना आणि व्यवसाय वृद्धी यासाठी अतिरिक्त भागभांडवल आवश्यक असते. अशी अतिरिक्त आवश्यक रक्कम खुल्या बाजारातून शेअर विक्री करून जमा केली जाते. अशी रक्कम जमा करण्याच्या पद्धतीला इनिशियल पब्लिक ऑफर म्हणजेच आयपीओ असे म्हणतात. 

हेही वाचाः शेअर बाजारातील 'बुल' आणि 'बेअर' म्हणजे काय?... जाणून घ्या 

हेही वाचाः शेअर बाजारात 'ट्रेडिंग' करायचं असेल Stop Loss माहीत हवाच

आयपीओद्वारे शेअरची विक्री करून रक्कम जमा केली जाते तेव्हा त्या शेअरची फेस व्हॅल्यू (मूळ किंमत) ठरविण्यात येते.  हे मूल्य शक्यतो दहा रुपये याप्रमाणे असते. परंतु एक रुपये, दोन रुपये अशा फेस व्हॅल्यूने सुद्धा आयपीओ लॉन्च केला जाऊ शकतो. फेस व्हॅल्यूवर प्रीमियम आकारून प्रती शेअरची  रक्कम ठरवली जाते. कंपनीचा व्यवसाय एकूण नफा याचा विचार करता त्यावर अतिरिक्त प्रीमियम आकारला जातो. मूळ मूल्य दहा रुपये या किमतीचा एक शेअर आयपीओद्वारे जास्त किंमत लावून विकला जातो. उदाः २१० - २१२ रुपये  जास्त असल्यास हा प्रीमियम समजावा आणि दहा रुपये मूळ  मूल्य असे एकूण प्रति शेअर रुपये २२०-२२२ ही इशू प्राईस ठरवली (प्राईस बँड) जाते. 

आयपीओ हा लॉट पद्धतीने ऑफर केला जातो. कोणत्याही कंपनीस जर आयपीओद्वारे भाग भांडवल उभे करायचे असेल तर सेबीने घालून दिलेल्या नियम, अटी, शर्ती या सर्वांची पूर्तता करूनच खुल्या बाजारात आयपीओ लॉन्च केला जातो. यात रिटेल इन्व्हेस्टर म्हणजेच सर्व सामान्य गुंतवणूकदार रक्कम गुंतवू शकतात. तसेच मोठे गुंतवणूकदार ज्यांना इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स असे म्हणतात ते ही आयपीओमध्ये गुंतवणूक करू शकतात. रिटेल इन्व्हेस्टर्स कमीत कमी पंधरा हजार रुपये आणि जास्तीत जास्त दोन लाख रुपये गुंतवू शकतात. एक लॉट हा पंधरा हजार रुपये किमतीचा असून मूळ मूल्य आणि त्यावरील प्रीमियम लक्षात घेता पंधरा हजार रुपयांमध्ये जितके शेअर येतील त्याचा एक लॉट समजला जातो. उदाः २२२ रुपये प्राईस बँड असेल तर १५ हजार रुपयांच्या एका लॉटमध्ये एकूण ६७ शेअर्स बसतात. यानुसार एका लॉटची ऑफर किंमत रुपये १४,८७४ येते. 

शेअर ब्रोकरद्वारे आपल्या डिमॅट अकाउंटमार्फत आयपीओला अर्ज केला जाऊ शकतो. यात आपले बँक अकाउंट संलग्न असते अशा अकाउंट मधून रक्कम डेबिट मॅण्डेट द्वारे आरक्षित केली जाते आणि जर आयपीओ लागला तर अशी रक्कम  खात्यातून नंतर वळती केली जाते. आयपीओ जर ओव्हर सबस्क्राईब म्हणजेच गुंतवणूकदारांकडून प्रचंड प्रतिसाद मिळतो तेव्हा लॉटरी पद्धतीने अलॉटमेंट केली जाते. जर आपल्याला आयपीएलची अलॉटमेंट झाली तर ते मेल आणि मेसेजद्वारे कळविले जाते. तसेच, विविध वेबसाईटवरही  आपल्याला पाहताही येते. 

शेअर लिस्टिंग आणि लिस्टिंग गेन

आयपीओ ऑफर आणि शेअर अलॉटमेंट प्रोसेस झाल्यानंतर कंपनीचा शेअर मुंबई स्टॉक एक्सचेंज आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज यापैकी एक किंवा दोन्ही एक्स्चेन्जवर लिस्ट केला जातो. लिस्टिंगच्या दिवशी सकाळी ९.१५ वाजता शेअर लिस्ट होतो. आयपीओस मिळालेला प्रतिसाद लक्षात घेता लिस्ट होतेवेळी शेअरचा भाव ठरला जातो. जर आयपीओस अल्प प्रतिसाद मिळाला किंवा ऑफर किंमत कंपनी व्हॅल्युएशनपेक्षा अधिक असेल तर शेअर लिस्ट होताना इश्यू प्राईस इतका किंवा त्यापेक्षाही कमी भावातही होऊ शकतो (उदाः पेटीएमचा शेअर इश्यू ऑफरपेक्षा कमी भावात लिस्ट झाला, हे नजीकचे उदाहरण आपण पाहिलेच आहे.) आणि आयपीओस जर उदंड प्रतिसाद मिळाला असेल आणि ऑफर किंमत रास्त भावात असेल तर लिस्ट होतेवेळेस इशू प्राईसपेक्षा अधिक भावाने शेअर लिस्ट होतो. (उदा. नायका या कंपनीचा शेअर दुपटीने लिस्ट झाला). 

शेअर लिस्ट झाल्याझाल्या जर भाव वाढलेला असेल तर त्याची विक्री काही गुंतवणूकदार त्याच दिवशी करतात आणि नफा कमवितात. अशा कमवलेल्या नफ्यास 'लिस्टिंग गेन' असेही म्हणतात. काही काही गुंतवणूकदार लिस्टिंग गेनसाठी आयपीओमध्ये गुंतवणूक करतात. बाजारातून आयपीओद्वारे 'लिस्टिंग गेन'च्या माध्यमातून नफा कामविणारे अनेक गुंतवणूकदार सक्रिय आहेत. 

पुढील भागात अप्पर आणि लोवर सर्किट म्हणजे काय हे जाणून घेऊ. (क्रमशः)

Web Title: Share Market Knowledge: What is an IPO?; How IPO Listing Price Is Decided?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app