Lokmat Money > बिझनेस न्यूज >  शेअर बाजाराचा सेन्सेक्स 600 अंकांनी कोसळला, निफ्टीसुद्धा 11 हजारांच्या खाली

 शेअर बाजाराचा सेन्सेक्स 600 अंकांनी कोसळला, निफ्टीसुद्धा 11 हजारांच्या खाली

एचडीएफसी, एचडीएफसी बँक, इन्फोसिस आणि आयटीसी सारख्या बड्या कंपन्यांचे शेअर कोसळले आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2019 05:25 PM2019-08-13T17:25:24+5:302019-08-13T17:25:44+5:30

एचडीएफसी, एचडीएफसी बँक, इन्फोसिस आणि आयटीसी सारख्या बड्या कंपन्यांचे शेअर कोसळले आहेत.

Sensex fell 600 points, down Nifty 11 thousand points |  शेअर बाजाराचा सेन्सेक्स 600 अंकांनी कोसळला, निफ्टीसुद्धा 11 हजारांच्या खाली

 शेअर बाजाराचा सेन्सेक्स 600 अंकांनी कोसळला, निफ्टीसुद्धा 11 हजारांच्या खाली

मुंबईः जागतिक कारणास्तव मंगळवारी शेअर बाजारात मोठी घसरण झाली आहे. एचडीएफसी, एचडीएफसी बँक, इन्फोसिस आणि आयटीसी सारख्या बड्या कंपन्यांचे शेअर कोसळले आहेत. दुपारी तीन वाजेपर्यंत सेन्सेक्स 600 अंकांनी खाली आला असून, 37,000च्या नीचांकी स्तरावर आहे. निफ्टीही 176 अंकांनी पडून 10,933वर स्थिरावला आहे.

बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा 30 शेअर्सचा सेन्सेक्स 173.25 अंकांनी उसळी घेऊन 37,755.16वर उघडला होता. सेन्सेक्समध्ये एचडीएफसी, एचडीएफसी बँक, इन्फोसिस, मारुती, टेक महिंद्रा, एलअँडटी आणि आयटीसी या मोठ्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आहे. यस बँकेचे शेअर्स 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर आहेत.

दुसरीकडे रिलायन्स इंडस्ट्रिजचे शेअर्सनं सर्वात मोठी उसळी घेतली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजनं 18 महिन्यांत स्वतःला कर्जमुक्त करण्यासह तेल आणि पेट्रो केमिकलच्या व्यवसायाची भागीदारी सौदी अरेबियातल्या अरामको कंपनीला विकण्याची केलेली घोषणा आणि जिओ फायबरची करण्यात आलेल्या सुरुवातीमुळे रिलायन्सच्या शेअर्सनं उच्चांकी पातळी गाठली आहे. देशातले प्रमुख शेअर बाजार बकरी ईदमुळे बंद ठेवण्यात आले होते. 

Web Title: Sensex fell 600 points, down Nifty 11 thousand points

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.