Lokmat Money > बिझनेस न्यूज > विक्रीच्या माऱ्यामुळे शेअर बाजारामध्ये घसरण, सेन्सेक्स ६०० अंशांनी घसरला

विक्रीच्या माऱ्यामुळे शेअर बाजारामध्ये घसरण, सेन्सेक्स ६०० अंशांनी घसरला

Mumbai Stock Market : मुंबई शेअर बाजारामध्ये बुधवारी सकाळपासूनच मोठी विक्री सुरू झाल्याने निर्देशांक खाली आले होते. त्यानंतर संवेदनशील निर्देशांक ३९,७७४.६० अंशांपर्यंत खाली आला होता.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2020 03:31 AM2020-10-29T03:31:06+5:302020-10-29T03:32:14+5:30

Mumbai Stock Market : मुंबई शेअर बाजारामध्ये बुधवारी सकाळपासूनच मोठी विक्री सुरू झाल्याने निर्देशांक खाली आले होते. त्यानंतर संवेदनशील निर्देशांक ३९,७७४.६० अंशांपर्यंत खाली आला होता.

The Sensex fell by 600 points on the back of a sell-off | विक्रीच्या माऱ्यामुळे शेअर बाजारामध्ये घसरण, सेन्सेक्स ६०० अंशांनी घसरला

विक्रीच्या माऱ्यामुळे शेअर बाजारामध्ये घसरण, सेन्सेक्स ६०० अंशांनी घसरला

मुंबई - युरोप आणि अमेरिकेमध्ये कोरोनाची दुसरी लाट येण्याच्या भीतीमुळे झालेल्या मोठ्या विक्रीचा परिणाम भारतातील शेअर बाजारावर झाला. येथेही मोठ्या प्रमाणात विक्री झाल्याने संवेदनशील निर्देशांक ६०० अंशांनी खाली आला.

मुंबई शेअर बाजारामध्ये बुधवारी सकाळपासूनच मोठी विक्री सुरू झाल्याने निर्देशांक खाली आले होते. त्यानंतर संवेदनशील निर्देशांक ३९,७७४.६० अंशांपर्यंत खाली आला होता. त्यानंतर त्यामध्ये काहीशी सुधारणा झाली. दिवसअखेर हा निर्देशांक ३९,९२२.४६ अंशांवर बंद झाला. मागील बंद निर्देशांकापेक्षा त्यामध्ये ५९९.६४ अंशांची घट झाली. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक (निफ्टी) १५९.८० अंश म्हणजे १.३४ टक्क्यांनी खाली आला. हा निर्देशांक ११,७२९.६० अंशांवर बंद झाला. 

क्षेत्रीय निर्देशांकांमध्येही घसरण झालेली दिसून आली. टेलिकॉम आणि कॅपिटल गुड‌्स‌ या दोनच क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये वाढ झाली. 
मिडकॅप आणि स्मॉलकॅप या निर्देशांकांमध्ये ०.९३ टक्क्यांनी घट झाली आहे.  

घसरणीची कारणे
युरोप आणि अमेरिकेमध्ये कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता असून, त्यामुळे पुन्हा लॉकडाऊनची भीती
देशांमधील आर्थिक परिस्थिती सुधारत असली तरी या वर्षात अर्थव्यवस्थेत वाढ न होण्याच्या अर्थमंत्र्यांच्या विधानाचे पडसाद
कंपन्यांचे अपेक्षेपेक्षा काहीसे कमी आलेले निकाल 
अमेरिकेकडून आर्थिक प्रोत्साहन पॅकेज न मिळण्याची वाटत असलेली शक्यता
युरोप व अमेरिकेमध्ये कोरोनाच्या भीतीमुळे शेअरबाजारात झालेल्या मोठ्या विक्रीचे पडसाद आशियातही उमटले.

Web Title: The Sensex fell by 600 points on the back of a sell-off

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.