lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > वृद्धापकाळात आधार ठरू शकते सरकारची ही योजना, दहमहा 10 हजारांपर्यंत मिळू शकते पेन्शन 

वृद्धापकाळात आधार ठरू शकते सरकारची ही योजना, दहमहा 10 हजारांपर्यंत मिळू शकते पेन्शन 

अनेक जण कमावत्या वयात विविध योजनांमध्ये गुंतवणूक करून आपल्या जीवनाच्या उत्तरार्धासाठी आर्थित तरतूद करत असतात.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2019 06:01 PM2019-12-27T18:01:22+5:302019-12-27T18:03:55+5:30

अनेक जण कमावत्या वयात विविध योजनांमध्ये गुंतवणूक करून आपल्या जीवनाच्या उत्तरार्धासाठी आर्थित तरतूद करत असतात.

This scheme of government can support up to 10 thousand pension per month | वृद्धापकाळात आधार ठरू शकते सरकारची ही योजना, दहमहा 10 हजारांपर्यंत मिळू शकते पेन्शन 

वृद्धापकाळात आधार ठरू शकते सरकारची ही योजना, दहमहा 10 हजारांपर्यंत मिळू शकते पेन्शन 

मुंबई  -  तरुण वयात नोकरी व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवणाऱ्या अनेक जणांना आपल्या वृद्धापकाळाची चिंता सतावत असते. त्यामुळे अनेक जण आपल्या कमावत्या वयात विविध योजनांमध्ये गुंतवणूक करून आपल्या जीवनाच्या उत्तरार्धासाठी आर्थित तरतूद करत असतात. दरम्यान, सरकारनेही अशी एक योजना आणली आहे. ज्यामधये गुंतवणूक केल्यावर तुम्हाला दरमहा 10 हजार रुपयांपर्यंत पेन्शन मिळू शकते. जाणून घेऊयात या योजनेविषयी. 

सरकारी विमा कंपनी असलेल्या एलआयसीकडून संचालित होणाऱ्या ''प्रधानमंत्री वय वंदन योजने''च्या माध्यमातून  केंद्र सरकारने वयोवृद्धांसाठी पेन्शन योजनेची व्यवस्था केली आहे. या योजनेसाठी किमान पात्रता वय  60 वर्षे इतके आहे. त्यामुळे वयाच्या 60 व्या वर्षानंतर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता. या योजनेंतर्गत 10 वर्षांपर्यंत एका विशिष्ट्य दराने पेन्शन मिळते. जर तुम्हाला 10 वर्षांनंतर पुन्हा पेन्शन सुरू करायची असेल तर पुन्हा एकदा या योजनेत गुंतवणूक करावी लागेल. 

कशी मिळेल ही पेन्शन
प्रधानमंत्री वय वंदन योजनेंतर्गत पेंशन मिळवण्यासाठी गुंतवणूकदारास एक विशिष्ट्य तारीख, बँक खाते आणि वेळेची निवड करावी लागते. जर तुम्हाला पेन्शन 30 तारखेला हवी असेल तर ती तारीख निवडावी लागेल. त्याचबरोबर गुंतवणूकदाराला मासिक, तिमाही, सहामाही आणि वार्षिक पर्यायांसह पेन्शनच्या क्रेडिटसाठी वेळेचा पर्याय निवडावा लागेल. या योजनेत एक व्यक्ती किमान दीड लाख आणि कमाल 15 लाख रुपयांपर्यंतची रक्कम गुंतवू शकते. तसेच पॉलिसी खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदाराने जमा केलेली रक्कम 10 वर्षांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर परत मिळू शकेल. 

जर तुम्ही मासिक पेन्शनचा पर्याय निवडला तर तुम्हाला दरमहा पेन्शन मिळेल. तर तिमाही पेन्शनचा पर्याय निवडल्यास तुम्हाला दर तीन महिन्यांनी एकरकमी पेन्शन मिळेल. त्याचप्रमाणे  सहामाही किंवा वार्षिक असे पर्याच निवडल्यास दर सहा महिन्यांनी किंवा वर्षभराने पेंशन मिळेल.  
या योजनेसाठी गुंतवणूक केल्यावर तुम्हाला गुंतवणुकीला एक वर्ष झाल्यानंतर पेन्शनचा पहिला हप्ता मिळेल. तसेच मासिक पेन्शन ही किमान एक हजार रुपये आणि कमाल 10 हजार रुपयांपर्यंत मिळू शकेल. 

पेन्शनसोबत मिळतील या सुविधा 
या पेन्शन योजनेमध्ये डेथ बेनिफिटसुद्धा मिळते. त्यानुसार संबंधित  पॉलिसीधारकाच्या वारसाला योजनेत गुंतववलेल्या रकमेचा परतावा मिळतो. या योजनेत एक व्यक्ती किमान दीड लाख आणि कमाल 15 लाख रुपयांपर्यंतची रक्कम गुंतवू शकते. तसेच पॉलिसी खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदाराने जमा केलेली रक्कम 10 वर्षांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर परत मिळू शकेल. 

Web Title: This scheme of government can support up to 10 thousand pension per month

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.