Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money >गुंतवणूक > जगातील सर्वात तरुण अब्जाधीश, २२ वर्षीय सूर्याने मार्क झुकरबर्गला मागे टाकले; नेमकं काय करतो?

जगातील सर्वात तरुण अब्जाधीश, २२ वर्षीय सूर्याने मार्क झुकरबर्गला मागे टाकले; नेमकं काय करतो?

Youngest Billionaire of the world: भारतीय वंशाच्या सूर्या मिधाने मार्क झुकरबर्गचा १६ वर्षे जुना रेकॉर्ड मोडला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2026 17:59 IST2026-03-20T17:57:41+5:302026-03-20T17:59:30+5:30

Youngest Billionaire of the world: भारतीय वंशाच्या सूर्या मिधाने मार्क झुकरबर्गचा १६ वर्षे जुना रेकॉर्ड मोडला.

Youngest Billionaire of the world: 22-year-old Surya Midha surpassed Mark Zuckerberg; What does he do? | जगातील सर्वात तरुण अब्जाधीश, २२ वर्षीय सूर्याने मार्क झुकरबर्गला मागे टाकले; नेमकं काय करतो?

जगातील सर्वात तरुण अब्जाधीश, २२ वर्षीय सूर्याने मार्क झुकरबर्गला मागे टाकले; नेमकं काय करतो?

Youngest Billionaire of the world: गेल्या काही काळापासून तंत्रज्ञानात झपाट्याने वाढ होत आहे. याच वाढीमुळे तरुणांसाठी नवनवीन संधी निर्माण होत असून, अनेक तरुणांनी याचा फायदाहे घेतला आहे. अमेरिकेत राहणाऱ्या भारतीय वंशाचा सूर्या मिधा यानेही तंत्रज्ञानाच्या जोरावर अवघ्या २२व्या वर्षी तब्बल २.२ अब्ज डॉलर्स (सुमारे १८,००० कोटी रुपये) संपत्ती उभारली आहे. 

या कामगिरीसह सूर्याने फेसबुकचे संस्थापक मार्क झुकरबर्ग यांचा सर्वात तरुण सेल्फ-मेड अब्जाधीश होण्याचा १८ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडीत काढला आहे. झुकरबर्ग यांनी हा किताब २३ व्या वर्षी मिळवला होता.

AI स्टार्टअपने दिली मोठी झेप

सूर्या मिधाने २०२३ मध्ये आपल्या दोन मित्रांसोबत ‘Mercor’ ही AI आधारित स्टार्टअप कंपनी सुरू केली. या कंपनीचे सहसंस्थापक ब्रेंडन फूडी आणि आदर्श हिरेमथ आहेत. Mercor हे एक नाविन्यपूर्ण प्लॅटफॉर्म आहे, जिथे AI अवतारच्या माध्यमातून उमेदवारांची मुलाखत घेतली जाते. या तंत्रज्ञानामुळे कंपन्यांना योग्य उमेदवार निवडणे अधिक सोपे आणि जलद होते.

फंडिंगनंतर कंपनीची झपाट्याने वाढ

ऑक्टोबर २०२५ मध्ये Mercor ला ‘सीरीज C’ फंडिंगमध्ये ३५०मिलियन डॉलर्सची फंडिग मिळाली. यानंतर कंपनीचे मूल्य सुमारे १० अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचले. सध्या ब्रेंडन फूडी हे कंपनीचे CEO, आदर्श हिरेमथ CTO, तर सूर्या मिधा बोर्ड चेअरमन म्हणून कार्यरत आहे.

भारतीय मूळ, अमेरिकेत वाढ

सूर्या मिधाचा जन्म अमेरिकेतील माउंटन व्ह्यू येथे झाला असून, त्याचे बालपण कॅलिफोर्नियामध्ये गेले. त्याचे पालक मूळ दिल्लीचे असून, ते अमेरिकेत स्थायिक झाले आहेत. मिधाने जॉर्जटाउन विद्यापीठातून परराष्ट्र अभ्यास (Foreign Studies) विषयात शिक्षण घेतले आहे. त्याच्या सहसंस्थापकांपैकी हिरेमथने हार्वर्ड विद्यापीठात शिक्षण घेतले, तर फूडी हे जॉर्जटाउनमध्ये इकॉनॉमिक्सचा विद्यार्थी आहे.

जगातील सर्वात तरुण अब्जाधीश

फोर्ब्सच्या अहवालानुसार, सूर्या मिधा सध्या जगातील सर्वात कमी वयाचा अब्जाधीश झाला आहेत. त्याच्या यशामुळे तंत्रज्ञान क्षेत्रातील स्टार्टअप्ससाठी नवा आदर्श निर्माण झाला आहे.

Web Title : 22 वर्षीय सूर्या जुकरबर्ग को पछाड़कर बने सबसे युवा अरबपति: क्या करते हैं?

Web Summary : भारतीय मूल के अमेरिकी सूर्या मिधा, 22 वर्ष की आयु में, अपनी एआई स्टार्टअप मर्कॉर के साथ दुनिया के सबसे युवा स्व-निर्मित अरबपति बन गए। कंपनी के एआई-संचालित उम्मीदवार साक्षात्कार के कारण महत्वपूर्ण फंडिंग हुई, जिससे इसका मूल्य 10 बिलियन डॉलर हो गया। मिधा ने मार्क जुकरबर्ग का रिकॉर्ड तोड़ दिया, और तकनीकी उद्यमिता में एक नया बेंचमार्क स्थापित किया।

Web Title : 22-Year-Old Surpasses Zuckerberg as World's Youngest Billionaire: What He Does?

Web Summary : Surya Midha, 22, an Indian-origin American, became the world's youngest self-made billionaire with his AI startup, Mercor. The company's AI-driven candidate interviews led to significant funding, valuing it at $10 billion. Midha surpassed Mark Zuckerberg's record, setting a new benchmark in tech entrepreneurship.