UPI Cashback : डिजिटल पेमेंट आल्यामुळे प्रमाणापेक्षा जास्त पैसे खर्च होत असल्याचा तुमचाही अनुभव असेल. पण, काही स्मार्ट ट्रीक वापरुन तुम्ही फक्त पैसे वाचवणेच नाही तर कमाईही करू शकता. तुम्हाला रोजच्या व्यवहारावर तुम्हाला थोडे पैसे परत मिळाले तर किती छान वाटेल! हेच काम UPI कॅशबॅक ऑफर्स तुमच्यासाठी करतात. या ऑफर्स तुमचे डिजिटल व्यवहार अधिक फायदेशीर बनवतात, ज्यामुळे तुम्ही तुमच्या मेहनतीच्या कमाईचा काही भाग वाचवू शकता.
UPI कॅशबॅक मिळवण्याचे सोपे मार्ग
- विविध UPI ॲप्स वेगवेगळ्या पद्धतीने कॅशबॅक देतात. हे कसे काम करते, हे सोप्या भाषेत समजून घ्या.
- Google Pay आणि PhonePe सारखी ॲप्स तुम्हाला डिजिटल स्क्रॅच कार्ड्स देतात. पेमेंट केल्यानंतर तुम्ही ते 'स्क्रॅच' करता आणि नशीब असल्यास तुम्हाला ठराविक रकमेचा कॅशबॅक मिळतो. हा अनुभव थोडा गेम खेळल्यासारखा मजेदार असतो.
- Paytm आणि Amazon Pay सारखी ॲप्स कॅशबॅक थेट ॲपच्या वॉलेटमध्ये जमा करतात. या पैशांचा वापर तुम्ही मोबाईल रिचार्ज, शॉपिंग किंवा बिल पेमेंटसाठी करू शकता.
- BHIM सारखी काही ॲप्स कॅशबॅकची रक्कम थेट तुमच्या बँक खात्यात जमा करतात. यामुळे तुम्हाला तो पैसा कुठेही खर्च करण्याचे स्वातंत्र्य मिळते.
जास्त फायदा कसा कमवायचा?
- ऑफर्स तपासा: कोणतीही मोठी खरेदी करण्यापूर्वी ॲप्सवर उपलब्ध असलेल्या ऑफर्स आणि कॅशबॅकची माहिती तपासा. योग्य वेळी पेमेंट केल्यास जास्त फायदा होऊ शकतो.
- रेफरल प्रोग्राम: जवळजवळ प्रत्येक UPI ॲपमध्ये रेफर करा आणि कमवा हे फीचर असते. यामध्ये तुम्ही तुमच्या मित्र-मैत्रिणींना ॲप वापरण्यासाठी आमंत्रित करून बोनस कमावू शकता.
- नियम व अटी वाचा: ऑफरचा फायदा घेण्यासाठी किमान व्यवहार रक्कम, जास्तीत जास्त कॅशबॅक मर्यादा, ऑफरची अंतिम तारीख आणि कोणत्या दुकानांवर ऑफर लागू आहे, याकडे लक्ष द्या.
- डबल बेनिफिट: शक्य असल्यास, एखादे कॅशबॅक प्लॅटफॉर्म किंवा रिवॉर्ड ॲप वापरून UPI पेमेंट करा. यामुळे एकाच व्यवहारावर तुम्हाला दोन्ही बाजूंनी कॅशबॅक किंवा रिवॉर्ड मिळू शकतात.
वाचा - रशियात भारतीय १०० रुपयांचे मूल्य किती! व्यापारावर याचा थेट कसा परिणाम होतो?
