Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money >गुंतवणूक > वेदांता समूहाला सुप्रीम कोर्टाचा झटका; अखेर गौतम अदानींच्या झोळीत आली 'ही' कंपनी

वेदांता समूहाला सुप्रीम कोर्टाचा झटका; अखेर गौतम अदानींच्या झोळीत आली 'ही' कंपनी

इन्फ्रा क्षेत्रात अदानींचा विस्तार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2026 16:01 IST2026-04-10T15:59:32+5:302026-04-10T16:01:16+5:30

इन्फ्रा क्षेत्रात अदानींचा विस्तार!

Supreme Court gives Vedanta Group a setback, Adani Group to Take Over Jaiprakash Associates Limited | वेदांता समूहाला सुप्रीम कोर्टाचा झटका; अखेर गौतम अदानींच्या झोळीत आली 'ही' कंपनी

वेदांता समूहाला सुप्रीम कोर्टाचा झटका; अखेर गौतम अदानींच्या झोळीत आली 'ही' कंपनी

Adani Group: देशातील इन्फ्रास्ट्रक्चर आणि रिअल इस्टेट क्षेत्रात मोठा बदल घडताना दिसतोय. आर्थिक अडचणीत सापडलेल्या Jaiprakash Associates Limited (जेपी असोसिएट्स) या कंपनीची सूत्रे आता Adani समूहाकडे जाणार आहेत. विशेष म्हणजे, कंपनीचे संस्थापक जयप्रकाश गौड यांनी या निर्णयाला पाठिंबा दर्शवत नव्या व्यवस्थापनावर विश्वास व्यक्त केला आहे.

गौड यांचा अदानी समूहावर विश्वास

जयप्रकाश गौड यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गौतम अदानी यांच्या नेतृत्वाखाली कंपनीची परंपरा नव्या उर्जेसह आणि जबाबदारीने पुढे जाईल. तसेच, या बदलामुळे होमबायर्स, कर्मचारी आणि गुंतवणूकदारांच्या अपेक्षा पूर्ण होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

कर्जदात्यांचा निर्णय

कंपनीच्या कर्जदात्यांच्या समितीने (CoC) अदानी समूहाला ‘सक्सेसफुल रिझोल्यूशन अप्लिकंट’ म्हणून निवडले आहे. या निर्णयाबाबत गौड यांनी समाधान व्यक्त करत, संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक आणि निष्पक्ष असल्याचे सांगितले.

कायदेशीर वादातही अदानींची बाजू मजबूत

या प्रक्रियेदरम्यान Vedanta Group ने आपल्या बोलीला अधिक मूल्य असल्याचा दावा करत आक्षेप घेतला होता. मात्र, कर्जदात्यांनी अदानी समूहाचा प्रस्ताव अधिक व्यवहार्य मानला. या प्रस्तावात जास्त रोख रक्कम, जलद पेमेंट आणि प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याची क्षमता असल्याचे नमूद करण्यात आले. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयानेही अदानी समूहाच्या टेकओव्हरला स्थगिती देण्यास नकार दिल्याने या व्यवहाराला अधिक बळ मिळाले आहे.

जेपी असोसिएट्सचा इतिहास

1979 मध्ये स्थापन झालेल्या जेपी असोसिएट्सने देशात अनेक महत्त्वाचे प्रकल्प उभारले आहेत. यात बुद्ध इंटरनॅशनल सर्किट, जलविद्युत प्रकल्प, सिमेंट प्लांट्स आणि मोठ्या टाउनशिप्सचा समावेश आहे.

रिअल इस्टेट क्षेत्रातील कंपनीचे काही प्रमुख प्रकल्प:

जेपी विश टाउन
जेपी ग्रीन्स
जेपी स्पोर्ट्स सिटी

आर्थिक संकटातून नव्या सुरुवातीकडे

गेल्या काही वर्षांत वाढत्या कर्जामुळे कंपनीला दिवाळखोरी प्रक्रियेत जावे लागले. या रिझोल्यूशन प्रक्रियेचा उद्देश कर्जाचा ताण कमी करून कंपनीचे कामकाज नव्या व्यवस्थापनाखाली सुरळीतपणे सुरू ठेवणे हा आहे. आता अदानी समूहाच्या हाती जेपी असोसिएट्सची धुरा गेल्याने कंपनीच्या पुनरुज्जीवनाला गती मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यामुळे इन्फ्रास्ट्रक्चर आणि रिअल इस्टेट क्षेत्रातही सकारात्मक परिणाम दिसू शकतो.

Web Title : वेदांता को झटका, गौतम अडानी को मिली जयप्रकाश एसोसिएट्स कंपनी।

Web Summary : वेदांता की बोली विफल होने पर अडानी समूह ने जयप्रकाश एसोसिएट्स का अधिग्रहण किया। संस्थापक जयप्रकाश गौड़ ने नए नेतृत्व में विश्वास जताया। ऋणदाताओं ने अडानी के प्रस्ताव को बेहतर माना। अदालत ने वेदांता की याचिका खारिज कर दी, जिससे अडानी को ऋणग्रस्त कंपनी को पुनर्जीवित करने का मार्ग प्रशस्त हुआ।

Web Title : Adani acquires Jaiprakash Associates after Vedanta's bid fails in court.

Web Summary : Adani Group acquires Jaiprakash Associates after overcoming Vedanta's challenge, with founder Jayprakash Gaur expressing confidence in the new leadership. Creditors favored Adani's viable proposal. Court rejected Vedanta's plea, paving way for Adani to revitalize the debt-ridden company.