Sukanya Samriddhi Yojana Benefits: मुलीच्या जन्मासोबतच तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी पालक विविध योजना आखू लागतात. चांगले शिक्षण, स्वावलंबी आयुष्य आणि पुढे जाऊन लग्न...यांसारख्या जबाबदाऱ्यांसाठी आर्थिक नियोजन करणेही तितकेच महत्त्वाचे ठरते. लहान वयापासून योग्य ठिकाणी गुंतवणूक सुरू केल्यास कालांतराने मोठा निधी तयार होऊ शकतो.
यासाठीच केंद्र सरकारने Sukanya Samriddhi Yojana ही विशेष योजना सुरू केली आहे. ही योजना मुलींच्या भविष्यासाठी सुरक्षित बचत निर्माण करण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आली आहे. या योजनेत मिळणारे उत्पन्न पूर्णपणे करमुक्त असल्याने गुंतवणुकीचा फायदा थेट मुलींच्या भविष्यासाठी मिळतो.
छोट्या बचतीतून मोठा निधी
सुकन्या समृद्धी योजनेत नियमितपणे थोडी-थोडी रक्कम गुंतवली, तर दीर्घकाळात मोठा फंड तयार होऊ शकतो. उदाहरणार्थ, दररोज सुमारे ₹२०० बचत करून ती गुंतवणुकीत टाकल्यास महिन्याला जवळपास ₹६,००० जमा होतात.
सध्या या योजनेवर सरकार सुमारे ८.२% वार्षिक व्याजदर देत आहे. दीर्घकाळ सातत्याने गुंतवणूक केल्यास ही छोटी रक्कम पुढे मोठ्या निधीत रूपांतरित होऊ शकते. त्यामुळे मुलींचे उच्च शिक्षण किंवा विवाह खर्च सहज भागवता येऊ शकतो.
२१ वर्षांत ४० लाखांपेक्षा जास्त रक्कम
जर एखाद्या गुंतवणूकदाराने दरमहा ₹६,००० अशी गुंतवणूक २१ वर्षे सतत केली, तर एकूण गुंतवलेली रक्कम सुमारे ₹१५१२,००० होते. सध्याच्या ८.२% व्याजदरानुसार या रकमेवर सुमारे ₹२५,२१,९४२ इतके व्याज मिळू शकते. त्यामुळे योजना पूर्ण झाल्यावर एकूण रक्कम सुमारे ₹४०.३३ लाखांपर्यंत पोहोचू शकते.
वर्षभरात किती गुंतवणूक करता येते?
सुकन्या समृद्धी योजनेत गुंतवणुकीची मर्यादा पुढीलप्रमाणे आहे:
किमान गुंतवणूक: ₹२५० प्रतिवर्ष
कमाल गुंतवणूक: ₹१,५०,००० प्रतिवर्ष
या योजनेद्वारे सरकार सर्व स्तरातील कुटुंबांना आपल्या मुलींच्या भविष्यासाठी सुरक्षित बचत तयार करण्याची संधी देत आहे.
