SIP or LIC Policy: आर्थिक अनिश्चिततेच्या या काळात गुंतवणूक ही प्रत्येक व्यक्तीच्या आर्थिक नियोजनाचा अविभाज्य भाग झाली आहे. कारण अचानक पैशांची गरज निर्माण झाली, तर पूर्वी केलेली गुंतवणूकच आधार ठरते. पण, अनेकांसमोर प्रश्न असतो की, गुंतवणूक कुठे करावी? SIP मध्ये की LIC मध्ये? चला, या दोन पर्यायांचे गणित जाणून घेऊ...
SIP मध्ये वार्षिक ₹50,000 गुंतवणुकीचे फायदे
जर तुम्ही दरवर्षी ₹50,000 SIP (Systematic Investment Plan) मध्ये गुंतवले, तर दीर्घकालीन कालावधीत एक मोठी रक्कम होऊ शकते. सरासरी 12-15% वार्षिक परतावा गृहीत धरल्यास, 10 वर्षांत तुमचे ₹50,000 दरवर्षीचे गुंतवणूक जवळपास ₹10 लाखांपर्यंत वाढू शकते.
SIP चे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे ती बाजारातील चढ-उतार संतुलित करते आणि कंपाउंडिंगच्या ताकदीने तुमची कमाई वाढवते. त्यातच ELSS (Equity Linked Saving Scheme) सारखे टॅक्स सेव्हिंग पर्याय उपलब्ध असतात. गरज पडल्यास गुंतवलेले पैसे काढण्याची लवचिकताही यात मिळते.
त्यामुळेच ज्यांना बाजारातील वाढीचा फायदा घ्यायचा आहे आणि संपत्ती निर्माण करायची आहे, त्यांच्यासाठी SIP हा उत्तम आणि वेल्थ क्रिएशनसाठी प्रभावी पर्याय ठरतो.
₹50,000 ची LIC पॉलिसी
LIC म्हणजे भारतातील सर्वात विश्वासार्ह गुंतवणूक संस्था. येथे गुंतवणुकीचा उद्देश सुरक्षितता आणि हमीदार परतावा असतो. ₹50,000 वार्षिक पॉलिसी घेतल्यास तुम्हाला इन्शुरन्स कव्हरेज देखील मिळते. परतावा तुलनेने कमी (सुमारे 5-7%) असतो, पण त्यासोबत टॅक्स बेनिफिट आणि सरकारी हमीचा विश्वास मिळतो. बाजारातील जोखीम नको असलेल्या आणि स्थिर परतावा पसंत करणाऱ्यांसाठी हा पर्याय योग्य आहे.
तुमच्यासाठी कोणता पर्याय योग्य?
तुमचे उद्दिष्ट जास्त परतावा आणि संपत्ती वाढवणे असेल, तर SIP हा उत्तम पर्याय आहे. पण जर तुमचा फोकस सुरक्षितता, हमीदार परतावा आणि जोखमीपासून बचाव यावर असेल, तर LIC पॉलिसी योग्य ठरेल.
(टीप- कुठल्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी आर्थिक सल्लागाराची मदत घ्या.)