Lokmat Money >गुंतवणूक > Post Office च्या 'या' स्कीममध्ये मिळतंय सर्वाधिक व्याज; गॅरंटीड रिटर्न सोबत बनेल पैसाच पैसा

Post Office च्या 'या' स्कीममध्ये मिळतंय सर्वाधिक व्याज; गॅरंटीड रिटर्न सोबत बनेल पैसाच पैसा

Post Office Investment: जोखीममुक्त गुंतवणुकीवर विश्वास ठेवणाऱ्यांसाठी, पोस्ट ऑफिसच्या दोन बचत योजना उत्तम ठरू शकतात. कोणत्या आहेत या योजना आणि किती मिळतंय व्याज जाणून घेऊ.

By जयदीप दाभोळकर | Updated: July 23, 2025 12:09 IST2025-07-23T12:05:07+5:302025-07-23T12:09:43+5:30

Post Office Investment: जोखीममुक्त गुंतवणुकीवर विश्वास ठेवणाऱ्यांसाठी, पोस्ट ऑफिसच्या दोन बचत योजना उत्तम ठरू शकतात. कोणत्या आहेत या योजना आणि किती मिळतंय व्याज जाणून घेऊ.

Post Office senior citizen sukanya samriddhi scheme offers the highest interest With guaranteed returns investors will get more money | Post Office च्या 'या' स्कीममध्ये मिळतंय सर्वाधिक व्याज; गॅरंटीड रिटर्न सोबत बनेल पैसाच पैसा

Post Office च्या 'या' स्कीममध्ये मिळतंय सर्वाधिक व्याज; गॅरंटीड रिटर्न सोबत बनेल पैसाच पैसा

Post Office Investment: जोखीममुक्त गुंतवणुकीवर विश्वास ठेवणाऱ्यांसाठी, पोस्ट ऑफिसच्या दोन बचत योजना उत्तम ठरू शकतात. त्या म्हणजे ज्येष्ठ नागरिक बचत योजना आणि सुकन्या समृद्धी योजना, ज्या सर्वाधिक व्याजदर देतात. पोस्ट ऑफिस ज्येष्ठ नागरिक बचत योजनेतील गुंतवणुकीवर ८.२० टक्के व्याज मिळतं जे तिमाहीमध्ये मोजलं जातं आणि दिलं जातं. याशिवाय, पोस्ट ऑफिस सुकन्या समृद्धी खाते योजना आहे ज्यामध्ये ८.२०% व्याज दिलं जातं.
कोण उघडू शकतं खातं?

ज्येष्ठ नागरिक बचत खातं योजनेअंतर्गत, ६० वर्षांवरील व्यक्ती खातं उघडू शकतात. तसंच, ५५ वर्षांपेक्षा जास्त वयाचे परंतु ६० वर्षांपेक्षा कमी वयाचे निवृत्त नागरी कर्मचारी देखील या योजनेत गुंतवणूक करू शकतात. जर निवृत्ती लाभ मिळाल्यापासून १ महिन्याच्या आत गुंतवणूक केली असेल तरच त्यांना गुंतवणूक करता येते. ५० वर्षांपेक्षा जास्त वयाचे परंतु ६० वर्षांपेक्षा कमी वयाचे निवृत्त संरक्षण कर्मचारी देखील पात्र आहेत.

शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; Sensex मध्ये २०० अंकांपेक्षा अधिक उसळी, कोणते शेअर्स चमकले?

पोस्ट ऑफिस सुकन्या समृद्धी खातं: पालक हे खातं त्यांच्या १० वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलीच्या नावानं उघडू शकतात. भारतात कोणत्याही एकाच ठिकाणी मुलीच्या नावानं फक्त एकच खातं उघडता येतं - पोस्ट ऑफिस किंवा बँक. एका कुटुंबात जास्तीत जास्त दोन मुलींसाठी हे खातं उघडता येतं.
दोघांचे परतावे समजून घ्या

इंडिया पोस्टच्या अधिकृत वेबसाइटनुसार, पोस्ट ऑफिस ज्येष्ठ नागरिक बचत योजनेत गुंतवलेल्या प्रत्येक ₹ १०,००० साठी, तुम्हाला दर तिमाहीत ₹ २०५ व्याज म्हणून दिलं जाईल. त्याच रकमेवर (पाच वर्षांनंतर) मॅच्युरिटीनंतर, तुम्हाला एकूण ₹ ४,१०० व्याज मिळेल. याशिवाय, समजा तुम्ही या योजनेत एकरकमी १ लाख रुपये गुंतवले तर मॅच्युरिटीवर तुम्हाला ४१,००० रुपये परतावा मिळेल.

पोस्ट ऑफिस सुकन्या समृद्धी योजनेतील गुंतवणुकीवरील परतावा एका उदाहरणाने समजू शकतो. जर मुलीचं वय आज १० वर्षे असेल म्हणजे २०२५ मध्ये आणि तुम्ही दरवर्षी १ लाख रुपये गुंतवले तर गणनेनुसार, तुम्हाला मॅच्युरिटीवर म्हणजेच २०४६ मध्ये एकूण ४७,८८,०७९ रुपये मिळतील. याचा अर्थ तुम्ही त्यात १५,००,००० रुपये गुंतवाल आणि परतावा म्हणून ३२,८८,०७९ रुपये मिळतील.

(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title: Post Office senior citizen sukanya samriddhi scheme offers the highest interest With guaranteed returns investors will get more money

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.