Lokmat Money >गुंतवणूक > Post Office ची जबरदस्त स्कीम... केवळ एकदा गुंतवणूक, नंतर व्याजातूनच होईल महिन्याला ₹५५०० ची कमाई

Post Office ची जबरदस्त स्कीम... केवळ एकदा गुंतवणूक, नंतर व्याजातूनच होईल महिन्याला ₹५५०० ची कमाई

Post Office Investment: प्रत्येकजण आपल्या कमाईतून काही ना काही बचत करतो आणि अशा ठिकाणी गुंतवणूक करू इच्छितो जिथे आपले पैसे सुरक्षित असतील आणि परतावादेखील मजबूत असेल.

By जयदीप दाभोळकर | Updated: July 3, 2025 15:08 IST2025-07-03T15:02:22+5:302025-07-03T15:08:40+5:30

Post Office Investment: प्रत्येकजण आपल्या कमाईतून काही ना काही बचत करतो आणि अशा ठिकाणी गुंतवणूक करू इच्छितो जिथे आपले पैसे सुरक्षित असतील आणि परतावादेखील मजबूत असेल.

Post Office s amazing scheme Invest only once then earn rs 5500 per month from interest alone | Post Office ची जबरदस्त स्कीम... केवळ एकदा गुंतवणूक, नंतर व्याजातूनच होईल महिन्याला ₹५५०० ची कमाई

Post Office ची जबरदस्त स्कीम... केवळ एकदा गुंतवणूक, नंतर व्याजातूनच होईल महिन्याला ₹५५०० ची कमाई

Post Office Investment: प्रत्येकजण आपल्या कमाईतून काही ना काही बचत करतो आणि अशा ठिकाणी गुंतवणूक करू इच्छितो जिथे आपले पैसे सुरक्षित असतील आणि परतावादेखील मजबूत असेल. पण निवृत्तीनंतर नियमित उत्पन्नाची समस्या सर्वात मोठी असते आणि नोकरीत योग्य पेन्शन न मिळाल्यास तुम्हाला आर्थिक अडचणींना सामोरं जावं लागू शकतं. अशा वेळी निवृत्तीनंतरचं नियोजन अगोदरच करणं गरजेचं आहे. यासाठी पोस्ट ऑफिस मंथली इनकम स्कीम (एमआयएस) तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकते, ज्यामुळे तुम्हाला दरमहा ठराविक रक्कम कमावण्याची संधी मिळते. जाणून घेऊया याच्या फायद्यांविषयी सविस्तर...

१००० रुपयांत खातं उघडू शकता

तुम्ही १००० रुपयांत एमआयएस खाते उघडू शकता. पोस्ट ऑफिसमध्ये प्रत्येक वयोगटासाठी आणि प्रत्येक वर्गासाठी बचत योजना राबविल्या जात आहेत, ज्यामध्ये परतावा तर जोरदार आहेच, पण सरकार स्वत: गुंतवणुकीवर सुरक्षिततेची हमी देतं. म्हणजेच हा पूर्णपणे टेन्शन फ्री गुंतवणुकीचा पर्याय ठरतो. पोस्ट ऑफिस मंथली इनकम स्कीमबद्दल बोलायचं झाल तर जी दर महिन्याला फिक्स्ड इन्कम देते, त्यामुळे तुम्ही फक्त १००० रुपयांमध्ये तुमचं खातं उघडू शकता.

सोन्याच्या दरात पुन्हा मोठी तेजी, चांदीही १००० रुपयांपेक्षा अधिक महागली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट

किती मिळतंय व्याज?

पोस्ट ऑफिसची ही योजना त्याच्या फायद्यांसाठी खूप लोकप्रिय असून त्यात मिळणारं व्याजही दमदार आहे. सरकार पीओएमआयएसमध्ये केलेल्या गुंतवणुकीवर ७.४ टक्के दराने व्याज देत आहे. हे व्याज १ एप्रिल २०२३ पासून दिलं जात आहे. या सरकारी योजनेचा मॅच्युरिटी पीरियड ५ वर्षांचा असून खातं उघडल्यानंतर एक वर्षापर्यंत त्यातून पैसे काढता येत नाहीत. या योजनेची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही यात गुंतवणूक करता तेव्हा दर महिन्याला तुमच्या उत्पन्नाचे टेन्शन संपते. यामध्ये गुंतवणूकदार सिंगल आणि जॉइंट अकाऊंट उघडू शकतात.

आता पोस्ट ऑफिसच्या या योजनेत एकरकमी गुंतवणूक करून गुंतवणूकदार केवळ व्याजातून दरमहा ५५०० रुपयांचे मासिक उत्पन्न कसं मिळवू शकता याबद्दल बोलूया. याचं गणित अतिशय सोपे आहे, सिंगल खातेदारांनी आपल्या खात्यात जास्तीत जास्त निश्चित केलेली रक्कम म्हणजेच ९ लाख रुपये गुंतवल्यास त्यांना या योजनेत मिळणाऱ्या ७.४ टक्के व्याजानुसार दरमहा ५५०० रुपये व्याज मिळेल. त्याचबरोबर जॉइंट अकाउंटमध्ये जास्तीत जास्त १५ लाख रुपयांच्या गुंतवणुकीतून मासिक कमाई ९,२५० रुपये होईल.



कुठे उघडता येईल खातं?

पोस्ट ऑफिसच्या या योजनेत मिळणारं व्याज आपल्या आवडीनुसार त्रैमासिक, सहामाही किंवा वार्षिक आधारावर घेता येतं. या सरकारी योजनेत खातं उघडण्याच्या प्रक्रियेबद्दल बोलायचं झालं तर आपण आपल्या जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन आवश्यक कागदपत्रांसह अर्ज करू शकता. पोस्ट ऑफिसमधून खातं उघडण्यासाठी फॉर्म घेऊन केवायसी फॉर्म आणि पॅन कार्डसह सबमिट करू शकता.

Web Title: Post Office s amazing scheme Invest only once then earn rs 5500 per month from interest alone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.