Lokmat Money >गुंतवणूक > म्युच्युअल फंडला लाेकांची पसंती; गेल्या २ वर्षातील सर्वाधिक गुंतवणूक

म्युच्युअल फंडला लाेकांची पसंती; गेल्या २ वर्षातील सर्वाधिक गुंतवणूक

एकाच महिन्यात २१ हजार काेटी ओतले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2024 06:02 IST2024-02-09T06:02:18+5:302024-02-09T06:02:56+5:30

एकाच महिन्यात २१ हजार काेटी ओतले

People's preference for mutual funds; Highest investment in last 2 years | म्युच्युअल फंडला लाेकांची पसंती; गेल्या २ वर्षातील सर्वाधिक गुंतवणूक

म्युच्युअल फंडला लाेकांची पसंती; गेल्या २ वर्षातील सर्वाधिक गुंतवणूक

लाेकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : गुंतवणुकीसाठी सुरक्षित आणि चांगला परतावा मिळण्याच्या दृष्टिकाेनातून गुंतवणूकदारांचा म्युच्युअल फंडकडे ओढा सतत वाढत आहे. इक्विीट म्युच्युअल फंडमध्ये जानेवारी २०२४ मध्ये २१ हजार ७८० काेटी रुपयांची निव्वळ गुंतवणूक झाली आहे. 

गेल्या दाेन वर्षांतील ही सर्वाधिक गुंतवणूक आहे. गुंतवणूकदारांनी स्माॅल कॅप फंडला प्राधान्य दिले आहे. असाेसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडियातर्फे ही माहिती देण्यात आली.

मार्च २०२२     २८,४६३ काेटी रुपये
डिसेंबर २०२३     १७,००० काेटी रुपये
जाने. २०२४     २१,७८० काेटी रुपये

Web Title: People's preference for mutual funds; Highest investment in last 2 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.