Lokmat Money >गुंतवणूक > अल्पवयीन मुलांचे पॅनकार्ड काढणे का आहे आवश्यक? घरबसल्या मोबाईलवरुन करू शकता अर्ज

अल्पवयीन मुलांचे पॅनकार्ड काढणे का आहे आवश्यक? घरबसल्या मोबाईलवरुन करू शकता अर्ज

PAN Card for Minors: तुम्हाला तुमच्या मुलांचे आर्थिक भविष्य सुरक्षित करायचे असेल तर त्यांचे पॅनकार्ड असणे आवश्यक आहे. यासाठी तुम्ही मोबाईलवरुन अर्ज करू शकता.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2024 15:48 IST2024-12-06T15:47:16+5:302024-12-06T15:48:28+5:30

PAN Card for Minors: तुम्हाला तुमच्या मुलांचे आर्थिक भविष्य सुरक्षित करायचे असेल तर त्यांचे पॅनकार्ड असणे आवश्यक आहे. यासाठी तुम्ही मोबाईलवरुन अर्ज करू शकता.

pan card is mandatory for people below 18 for major various reasons | अल्पवयीन मुलांचे पॅनकार्ड काढणे का आहे आवश्यक? घरबसल्या मोबाईलवरुन करू शकता अर्ज

अल्पवयीन मुलांचे पॅनकार्ड काढणे का आहे आवश्यक? घरबसल्या मोबाईलवरुन करू शकता अर्ज

PAN Card for Minors : देशात आधार कार्डनंतर पॅनकार्डही खूप आवश्यक डॉक्युमेंट आहे. बँकिंग क्षेत्रातील एकही व्यवहार पॅनकार्डशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. पॅनकार्ड (Permanent Account Number) आता केवळ प्रौढांसाठी नाही तर लहान मुलांसाठीही बनवले जाणार आहे. आयकर कायद्याच्या कलम १६० मध्ये पॅन कार्ड बनवण्यासाठी वयोमर्यादा निर्धारित केलेली नाही. म्हणजेच आता १८ वर्षांपेक्षा कमी वयाच्या अल्पवयीन मुलांसाठीही पॅनकार्ड बनवले जाऊ शकते. आपल्या पाल्याचं आर्थिक भविष्य सुरक्षित करायचं असेल तर  पॅन कार्ड असणे आवश्यक आहे. तुम्हाला तुमच्या मुलांना शेअर्स, म्युच्युअल फंड किंवा इतर कोणत्याही गुंतवणुकीत नॉमिनी बनवायचे असेल तर त्यासाठी पॅन कार्ड महत्त्वाचे डॉक्युमेंट आहे.

पॅन कार्ड का आवश्यक आहे?
करातूनच सूट मिळवण्यासाठी अनेकजण अल्पवयीन मुलांचे उत्पन्न पालकांच्या उत्पन्नाशी जोडतात. परंतु, जर १८ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांनी नोकरी किंवा व्यवसाय किंवा इतर कोणत्याही व्यावसायिक मार्गाने उत्पन्न मिळवले तर ते करदात्याच्या श्रेणीत येते. यासाठी पॅन कार्ड असणे आवश्यक आहे. आर्थिक सुरक्षेसोबतच शिष्यवृत्ती किंवा सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठीही पॅन कार्ड आवश्यक आहे.

पॅन कार्डसाठी अर्ज कसा करावा

  • Google वर जा आणि NSDL PAN अर्जाची वेबसाइट शोधा. यानंतर, पहिल्या लिंकवर क्लिक करा (official NSDL portal). 
  • 'नवीन पॅन-भारतीय नागरिक (फॉर्म 49A)' हा पर्याय निवडा.
  • यानंतर 'Individual' श्रेणी निवडा.
  • येथे अल्पवयीन मुलाचे पूर्ण नाव, वय, मोबाईल नंबर, ईमेल आयडी भरा. कॅप्चा प्रविष्ट करा आणि सबमिट बटणावर क्लिक करा.
  • आता तुम्हाला एक टोकन क्रमांक मिळेल, तो काळजीपूर्वक लिहून ठेवा आणि 'continue with PAN application form.' वर क्लिक करा.
  • यानंतर डॉक्युमेंट मोडवर जा आणि आधार कार्ड लिंक करा. यानंतर पालकांनी उत्पन्नासह संपूर्ण तपशील भरून कागदपत्रे जमा करावीत. अर्ज पूर्ण करण्यासाठी फी भरावी लागेल.
  • पडताळणीनंतर, तुमचे पॅन कार्ड सुमारे १५ दिवसांत तयार होईल. तुम्ही ते ऑनलाइन देखील डाउनलोड करू शकता.

Web Title: pan card is mandatory for people below 18 for major various reasons

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.