Lokmat Money >गुंतवणूक > जिओ, एअरटेल आणि VI चे एका वर्षासाठी सर्वात स्वस्त प्लॅन! कोण देतंय बंपर ऑफर?

जिओ, एअरटेल आणि VI चे एका वर्षासाठी सर्वात स्वस्त प्लॅन! कोण देतंय बंपर ऑफर?

Unlimited Calling Plans : आज आम्ही तुम्हाला जिओ, एअरटेल आणि VI च्या अशा रिचार्ज प्लॅनबद्दल सांगणार आहोत, जे सेकंडरी सिम वापरकर्त्यांसाठी सर्वोत्तम आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2025 13:26 IST2025-08-29T13:22:52+5:302025-08-29T13:26:17+5:30

Unlimited Calling Plans : आज आम्ही तुम्हाला जिओ, एअरटेल आणि VI च्या अशा रिचार्ज प्लॅनबद्दल सांगणार आहोत, जे सेकंडरी सिम वापरकर्त्यांसाठी सर्वोत्तम आहेत.

Need a Secondary SIM? Check Out These Unlimited Calling Plans with 365-Day Validity | जिओ, एअरटेल आणि VI चे एका वर्षासाठी सर्वात स्वस्त प्लॅन! कोण देतंय बंपर ऑफर?

जिओ, एअरटेल आणि VI चे एका वर्षासाठी सर्वात स्वस्त प्लॅन! कोण देतंय बंपर ऑफर?

Unlimited Calling Plans : जियो, एअरटेल आणि व्हीआय या भारतातील तीन प्रमुख टेलिकॉम कंपन्या आहेत. देशात सर्वाधिक मोबाइल वापरकर्ते जिओचे आहेत, तर एअरटेल दुसऱ्या आणि व्हीआय तिसऱ्या क्रमांकावर आहे. या तिन्ही कंपन्या आपल्या ग्राहकांना वेगवेगळ्या गरजांनुसार अनेक उत्तम रिचार्ज प्लॅन ऑफर करतात. यामध्ये जास्त डेटा आणि कमी डेटा तसेच जास्त आणि कमी व्हॅलिडिटी असलेल्या प्लॅनचा समावेश आहे.

आज आम्ही तुम्हाला जिओ, एअरटेल आणि व्हीआयच्या अशा रिचार्ज प्लॅनबद्दल सांगणार आहोत, जे डेटाशिवाय येतात. त्यामुळे हे प्लॅन अशा लोकांसाठी सर्वोत्तम आहेत, जे वायफायचा वापर करतात किंवा फक्त कॉलिंगसाठी सेकंडरी वापरत आहेत.

जिओचा १७४८ रुपयांचा प्लॅन
जिओचा हा प्लॅन १७४८ रुपयांमध्ये येतो आणि याची व्हॅलिडिटी तब्बल ३३६ दिवस आहे. ३३६ दिवसांच्या व्हॅलिडिटीसह या प्लॅनमध्ये ग्राहकांना अनलिमिटेड फ्री कॉलिंग आणि ३६०० मोफत एसएमएसचा लाभ मिळतो.

एअरटेलचा १८४९ रुपयांचा प्लॅन
एअरटेलचा हा खास प्लॅन १८४९ रुपयांचा असून, याची व्हॅलिडिटी जिओच्या प्लॅनपेक्षा जास्त, म्हणजेच पूर्ण ३६५ दिवसांची आहे. या प्लॅनमध्ये ग्राहकांना अनलिमिटेड फ्री कॉलिंग आणि ३६०० मोफत एसएमएसचा लाभ मिळतो.

व्हीआयचा १८४९ रुपयांचा प्लॅन
व्हीआयचा हा प्लॅन देखील एअरटेलच्या प्लॅनसारखाच आहे. याची किंमत १८४९ रुपये असून, यात पूर्ण ३६५ दिवसांची व्हॅलिडिटी मिळते. या प्लॅनमध्ये ग्राहकांना अनलिमिटेड फ्री कॉलिंग आणि ३६०० मोफत एसएमएस मिळतात.

वाचा - दलाल स्ट्रीटच्या इतिहासातील सर्वात मोठी घोषणा? मुकेश अंबानी आज काय बोलणार?

तुमच्यासाठी कोणता प्लॅन बेस्ट?
जर तुम्ही वर्षभर फक्त कॉलिंगसाठी एक नंबर वापरत असाल तर तुमच्यासाठी हे तिन्ही प्लॅन उत्तम आहेत. जर तुम्हाला कमी किमतीत जास्त व्हॅलिडिटी हवी असेल तर एअरटेल आणि व्हीआयचे प्लॅन जिओच्या प्लॅनपेक्षा अधिक फायदेशीर आहेत.

Web Title: Need a Secondary SIM? Check Out These Unlimited Calling Plans with 365-Day Validity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.