Jio Financial Services News: मुकेश अंबानी यांची कंपनी जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड आणि ब्लॅकरॉकचा संयुक्त उपक्रम - जिओब्लॅकरॉक अॅसेट मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेडला सेबीनं आनंदाची बातमी दिलीये. जिओब्लॅकरॉकला भारतातील म्युच्युअल फंड व्यवसायासाठी सेबीची मान्यता मिळाली आहे. या मंजुरीनंतर कंपनी लवकरच भारतीय म्युच्युअल फंड बाजारात उतरणार आहे. दरम्यान, जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडचे शेअर्स खरेदी करण्यासाठी आज गुंतवणूकदारांची रांग लागली होती. आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी हा शेअर ३ टक्क्यांहून अधिक वधारला.
जिओब्लॅकरॉकचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) म्हणून सिड स्वामिनाथन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ब्लॅकरॉकचे आंतरराष्ट्रीय निर्देशांक इक्विटीचे माजी प्रमुख सिड स्वामिनाथन यांनी सव्वा लाख कोटी डॉलर्सचे असेट्स सांभाळले आहेत.
₹१०७ वरुन घसरुन ₹४ वर आला 'हा' शेअर, आता सातत्यानं १० टक्क्यांचं अपर सर्किट; 'या' वृत्ताचा परिणाम
काय म्हणाल्या ईशा अंबानी?
"ब्लॅकरॉककडे जागतिक गुंतवणुकीचे कौशल्य आहे, त्यामुळे ब्लॅकरॉक या डिजिटल-फर्स्ट इनोव्हेशनसोबत आमची भागीदारी जिओसोबत मजबूत भागीदारी आहे. प्रत्येक भारतीयासाठी गुंतवणूक सोपी, सुलभ आणि सर्वसमावेशक करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. जिओब्लॅकरॉक अॅसेट मॅनेजमेंट भारतातील आर्थिक सक्षमीकरणाचे भवितव्य घडविण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल, असा विश्वास असल्याची प्रतिक्रिया जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडच्या नॉन एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर ईशा अंबानी यांनी दिली.
शेअरची किंमत किती?
या बातमीदरम्यान जिओ फायनान्शियलच्या शेअरमध्ये मंगळवारी प्रचंड वाढ झाली आणि त्याची किंमत २९१ रुपयांच्या पुढे गेली. एका दिवसापूर्वीच्या तुलनेत हा शेअर ३.४६ टक्क्यांनी वधारला. ३ मार्च २०२५ रोजी हा शेअर १९८ रुपयांवर होता. शेअरचा हा ५२ आठवड्यांचा नीचांकी स्तर आहे. गेल्या वर्षी हा शेअर ३६८.७५ रुपयांवर होता. शेअरचा हा ५२ आठवड्यांचा उच्चांक आहे.
(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)