MS Dhoni E-Motorad : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने 2020 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. मात्र आजही कमाईच्या बाबतीत भारतातील अव्वल क्रिकेटपटूंमध्ये त्याचा समावेश होतो. क्रिकेटशिवाय धोनीचे उत्पन्न ब्रँड एंडोर्समेंट आणि विविध कंपन्यातील गुंतवणुकीतून येते. धोनीने इलेक्ट्रिक सायकल बनवणाऱ्या कंपनीतही गुंतवणूक केली आहे. आता ही कंपनी युरोपमध्ये 2000 हून अधिक ई-बाईक विकण्याच्या तयारीत आहे. या कंपनीचे नाव E-Motorad असून, धोनी त्यात भागीदार आहे.
धोनीची कंपनी युरोपमध्ये सायकली विकणार
महेंद्रसिंग धोनीने या सायकल उत्पादक कंपनीत केवळ गुंतवणूक केलेली नाही, तर तो तिचा ब्रँड ॲम्बेसेडरही आहे. आता ही कंपनी परदेशात आपल्या ई-बाईक विकणार आहे. ई-मोटरॅड कंपनीचे सीईओ कुणाल गुप्ता यांनी यासंदर्भात महत्त्वाची माहिती शेअर केली. एक्स पोस्टवर एक फोटो शेअर करताना त्यांनी लिहिले की, '2000 हून अधिक ई-बाईकची बॅच तयार आहे. लवकरच या युरोपला पाठवल्या जातील. आमच्या टीमच्या प्रयत्नांचे चांगले परिणाम पाहून खूप आनंद झाला. युरोप आणि अमेरिकेतील काही सर्वात मोठे ई-बाईक ब्रँड आता त्यांच्या ई-बाईक आमच्याकडून बनवत आहेत. 45 पेक्षा जास्त गुणवत्ता तपासणीसह, आम्हाला विश्वास आहे की, आम्ही आता गुणवत्ता, प्रमाण आणि किंमतीच्या बाबतीत जगाच्या मागण्या पूर्ण करण्यास तयार आहोत.'
A Batch of 2000+ Made in India E-bikes 🇮🇳
— Kunal Gupta (@kunal_gupta01) February 3, 2025
On their way to Europe
So happy to see teams efforts churning results.
Some of the biggest e-bike brands in Europe and US are now getting their e-bikes made from us.
With 45+ Quality checks
We believe are now ready to meet the… pic.twitter.com/LDQNDGz18v
धोनीच्या येण्याने खूप आनंद झाला
जेव्हा महेंद्रसिंग धोनी ई मोटरराड कंपनीचे सीईओ कुणाल गुप्ता यांच्याशी जोडला गेला, तेव्हा त्यांनी स्वप्न साकार झाल्याचे वर्णन केले होते. त्यांनी एप्रिल 2024 मध्ये एका एक्स-पोस्टवर लिहिले होते, 'स्वप्न खरे होतात. माझा आयडल आता आमचा बिझनेस पार्टनर बनला आहे. माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा दिवस. माझ्या भावना शब्दात व्यक्त करता येणार नाही.'
चालू आर्थिक 270 कोटी रुपये कमाईचा अंदाज
धोनीसोबत भागीदारी केलेल्या या कंपनीचे देशभरात 350 हून अधिक डीलर्स आहेत. 2023-24 मध्ये त्याची विक्री 140 कोटी रुपयांची होती. याआधी ई-मोटारॅडची विक्री सुमारे 115 कोटी रुपये होती. चालू आर्थिक वर्षासाठी कंपनीचे लक्ष्य 270 कोटी रुपयांच्या विक्रीचे आहे.