fixed Deposite : जर तुम्ही तुमचे पैसे सुरक्षितपणे गुंतवण्याचा विचार करत असाल, तर फिक्स्ड डिपॉझिट हा एक चांगला आणि सुरक्षित पर्याय आहे. FD मध्ये गुंतवणूक केल्यास तुम्हाला निश्चित व्याज मिळते आणि तुमचे पैसेही सुरक्षित राहतात. पण FD घेण्यापूर्वी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, कोणत्या बँका किती व्याज देत आहेत, याची तुलना करणे. कारण, जास्त व्याज देणाऱ्या बँकेत FD ठेवल्यास तुम्हाला अधिक फायदा होतो. विशेषतः, ज्येष्ठ नागरिकांना बँका नेहमीच नियमित नागरिकांपेक्षा जास्त व्याज देतात, हा फरक साधारणपणे ०.५०% (५० बेसिस पॉइंट्स) असतो.
३ वर्षांच्या FD वर सर्वाधिक व्याज देणाऱ्या बँका
तुम्ही जर ३ वर्षांच्या FD मध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर 'या' बँका तुम्हाला सध्या चांगले व्याजदर देत आहेत:
- HDFC बँक: ही देशातील सर्वात मोठी खाजगी बँक असून, नियमित ग्राहकांना ६.४५% आणि ज्येष्ठ नागरिकांना ६.९५% व्याज देत आहे.
- ICICI बँक: ही आणखी एक प्रमुख खाजगी बँक असून, नियमित ग्राहकांना ६.६०% आणि ज्येष्ठ नागरिकांना ७.१०% व्याजदर देत आहे.
- कोटक महिंद्रा बँक: सामान्य नागरिकांना ६.४०% आणि ज्येष्ठ नागरिकांना ६.९०% व्याजदर मुदत ठेवींवर देत आहे. हे दर १८ जूनपासून लागू आहेत.
- फेडरल बँक: या बँकेने १७ जुलैपासून नवीन दर लागू केले आहेत. यामध्ये सामान्य नागरिकांना ६.६०% आणि ज्येष्ठ नागरिकांना ७.१०% व्याजदर मिळत आहे.
- युनियन बँक ऑफ इंडिया: सरकारी बँक असलेल्या युनियन बँक ऑफ इंडिया ७ जुलै २०२५ पासून सामान्य नागरिकांना ६.६०% आणि ज्येष्ठ नागरिकांना ७.१०% व्याज देत आहे.
- पंजाब नॅशनल बँक (PNB): ही सरकारी बँक सामान्य नागरिकांना ६.४०% आणि ज्येष्ठ नागरिकांना ६.९०% व्याज देते.
वाचा - तुमचा iPhone धोक्यात? ॲपल युजर्ससाठी भारत सरकारचा 'रेड अलर्ट', लगेच 'हे' काम करा!
रेपो दर स्थिर, तरी FD व्याजदर का कमी होत आहेत?
भारतीय रिझर्व्ह बँकेने अलीकडील तीन चलनविषयक धोरण समिती बैठकींमध्ये रेपो दरात १०० बेसिस पॉइंट्स (१%) कपात केली होती. रेपो दर म्हणजे बँका रिझर्व्ह बँकेकडून कर्ज घेतात तो दर. जेव्हा हा दर कमी होतो, तेव्हा बँकाही त्यांच्या ग्राहकांना कमी व्याज देऊ लागतात. यामुळेच काही काळापासून FD व्याजदरही कमी होत आहेत. मात्र, आजच्या धोरणात रेपो दर स्थिर ठेवण्यात आला आहे, ज्यामुळे FD च्या सध्याच्या व्याजदरांमध्ये फारसा बदल झालेला नाही. तरीही, गुंतवणूक करण्यापूर्वी नेहमी वेगवेगळ्या बँकांच्या व्याजदरांची तुलना करणे शहाणपणाचे ठरते.