LIC Investment Scheme: गुंतवणुकीच्या अनेक स्कीम्स आहेत, पण भारतीय आयुर्विमा महामंडळाकडे (LIC) पर्यायांची कमतरता नाही. एलआयसीची एक स्कीम आहे ज्यामध्ये आपण दररोज थोडी रक्कम जमा करून मोठा फंड तयार करू शकता. हा फंड तुम्ही कोणत्याही महत्त्वाच्या कामासाठी वापरू शकता. तसंच या योजनेचे इतरही अनेक फायदे आहेत.
एलआयसीच्या या योजनेचं नाव जीवन आनंद पॉलिसी असं आहे. यामध्ये तुम्ही दररोज २०० रुपयांपेक्षा कमी रक्कम जमा करून २० लाख रुपयांचा फंड तयार करू शकता. दुसरीकडे, जर तुम्हाला मोठा फंड तयार करायचा असेल तर तुम्हाला जास्त पैसे गुंतवावे लागतील. या योजनेत किमान एक लाख रुपयांची विमा रक्कम मिळते. कमाल मर्यादा नसते. तुम्ही कोणताही मोठा फंड तयार करू शकता.
मोठा निधी कसा तयार होणार?
या योजनेत वय आणि कालमर्यादा महत्त्वाची आहे. समजा तुम्ही २१ वर्षांचे आहात. २० लाख रुपयांचा फंड तयार करण्यासाठी तुम्हाला ३० वर्षांसाठी दरमहा ५९२२ रुपये म्हणजेच दररोज सुमारे १९७ रुपये गुंतवावे लागतील. हा प्रीमियम पहिल्या वर्षासाठी असेल. दुसऱ्या वर्षापासून तुम्हाला दरमहा ५७९५ रुपये म्हणजेच जवळपास १९३ रुपये प्रीमियम भरावा लागणार आहे.
काय आहे ही योजना?
हा टर्म मॅच्युरिटी प्लॅन आहे. जितक्या वर्षांसाठी तुम्हाला हा प्लॅन घ्यायचा आहे, तेवढा प्रीमियम भरावा लागेल. जसं आपण ३० वर्षांच्या प्लॅनबद्दल सांगितलं आहे. या कालावधीत पॉलिसीधारकाला प्रीमियम जमा करावा लागणारे. या कालावधीत पॉलिसीधारकाचा मृत्यू झाल्यास नॉमिनीला मूळ विमा रकमेच्या १२५ टक्के किंवा मृत्यूपर्यंत भरलेल्या प्रीमियमच्या १०५ टक्के रक्कम मिळते.
हे फायदेही उपलब्ध आहेत
या प्लॅनमध्ये बोनसचा ही फायदा मिळतो. जर तुम्ही ३० वर्षांसाठी दररोज सुमारे २०० रुपये जमा केले तर तुम्हाला जवळपास ३० लाखांचा बोनस मिळू शकतो. मात्र, याविषयी अधिक माहिती एलआयसीच्या जवळच्या शाखेत जाऊन घेऊ शकता. या पॉलिसीवर तुम्ही लोनही घेऊ शकता.
ही स्कीम कोण घेऊ शकेल?
१८ ते ५० वयोगटातील कोणीही ही पॉलिसी घेऊ शकतो. पॉलिसीची मुदत १५ ते ३५ वर्षे असते. यामध्ये मासिक, त्रैमासिक, सहामाही किंवा वार्षिक आधारावर प्रीमियम भरता येतो.