Lokmat Money >गुंतवणूक > दररोज ४५ रुपये गुंतवून लखपती व्हा; LIC च्या 'या' योजनेत तुम्हाला विमा आणि बोनसही मिळतो

दररोज ४५ रुपये गुंतवून लखपती व्हा; LIC च्या 'या' योजनेत तुम्हाला विमा आणि बोनसही मिळतो

lic jeevan anand policy : एलआयसी जीवन आनंद पॉलिसीमध्ये दररोज ४५ रुपये गुंतवून तुम्ही ३५ वर्षांत २५ लाखांचा निधी तयार करू शकता. ही योजना विमा आणि बोनस देखील प्रदान करते.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2025 16:58 IST2025-04-20T16:44:52+5:302025-04-20T16:58:51+5:30

lic jeevan anand policy : एलआयसी जीवन आनंद पॉलिसीमध्ये दररोज ४५ रुपये गुंतवून तुम्ही ३५ वर्षांत २५ लाखांचा निधी तयार करू शकता. ही योजना विमा आणि बोनस देखील प्रदान करते.

lic jeevan anand policy save rs 45 daily become lakhpati get rs 25 lakh fund | दररोज ४५ रुपये गुंतवून लखपती व्हा; LIC च्या 'या' योजनेत तुम्हाला विमा आणि बोनसही मिळतो

दररोज ४५ रुपये गुंतवून लखपती व्हा; LIC च्या 'या' योजनेत तुम्हाला विमा आणि बोनसही मिळतो

lic jeevan anand policy : खरी संपत्ती ही दीर्घकालीन गुंतवणुकीतूनच येते, असं दिग्गज अर्थतज्ज्ञांचे मत आहे. प्रत्यक्षात अनेकजण अल्पावधीत पैसे कमावण्याच्या नादात अभ्यास न करता कुठेही गुंतवणूक करतात. तर दुसरीकडे कमी उत्पन्नामुळे अनेक लोक दरमहा जास्त बचत करू शकत नाहीत. या लोकांना त्यांच्या छोट्या बचती योग्य ठिकाणी गुंतवण्याचे टेन्शन असते. जर तुम्हालाही या समस्येचा सामना करावा लागत असेल तर ही बातमी तुमच्यासाठी उपयुक्त आहे. दररोज फक्त ४५ रुपये वाचवून तुम्ही लखपती होऊ शकता. भारतीय जीवन विमा महामंडळच्या विशेष योजनेद्वारे, एलआयसी जीवन आनंद पॉलिसीद्वारे हे शक्य होईल. ही पॉलिसी तुमच्या छोट्या गुंतवणुकीने तुम्हाला कोट्यधीश बनवेल.

एलआयसी जीवन आनंद योजना ही एक टर्म प्लॅन आहे, जी कमी प्रीमियमवर चांगले परतावा देते. यातील खास गोष्ट म्हणजे दररोज फक्त ४५ रुपये गुंतवून तुम्ही भविष्यात २५ लाखांपर्यंतचा निधी तयार करू शकता. एलआयसी ही कंपनी गुंतवणुकीसाठी सर्वात विश्वासार्ह मानली जाते. या योजनेत सुधारित आणि अंतिम बोनस देखील मिळतो. ज्यामुळे परिपक्वतेवर मिळणारी रक्कम लक्षणीयरीत्या वाढते. तुम्ही एलआयसी जीवन आनंद पॉलिसीमध्ये १५ वर्ष ते ३५ वर्षांपर्यंत गुंतवणूक करू शकता.

दररोज ४५ रुपये गुंतवणूक २५ लाखांचा निधी कसा होईल?
तुम्ही एलआयसी जीवन आनंद पॉलिसीचा प्रीमियम वार्षिक, सहामाही, तिमाही आणि मासिक आधारावर भरू शकता. एलआयसी जीवन आनंद योजनेचा मासिक प्रीमियम १,३५८ रुपये आहे. म्हणजेच तुम्हाला दररोज फक्त ४५ रुपये वाचवावे लागतील. समजा तुम्ही ३५ वर्षे दररोज ४५ रुपये वाचवले. याचा अर्थ असा की तुम्ही दरवर्षी एलआयसीमध्ये सुमारे १६,३०० रुपयांची गुंतवणूक केली. तर ३५ वर्षांमध्ये तुमची एकूण गुंतवणूक रक्कम ५,७०,५०० रुपये असेल. यासोबतच, तुम्हाला या पॉलिसीमध्ये बोनसचा लाभ देखील मिळेल. तुम्हाला ८.६० लाखांचा सुधारित बोनस आणि ११.५० लाखांचा अंतिम बोनस मिळेल. अशा प्रकारे, तुम्हाला एकूण २५ लाख रुपयांचा निधी मिळू शकतो. बोनस मिळविण्यासाठी, ही पॉलिसी किमान १५ वर्षे सुरू ठेवणे आवश्यक आहे.

वाचा - इकडून सोने टाका अन् तिकडून पैसे काढा.. सोने खरेदी-विक्रीसाठी बाजारात आलंय ATM

पॉलिसीसोबत अधिकचे फायदे
एलआयसी जीवन आनंदची खास गोष्ट म्हणजे ते केवळ हमी विमा रक्कम प्रदान करत नाही तर अपघाती मृत्यू आणि अपंगत्व रायडर, अपघात लाभ रायडर, नवीन टर्म इन्शुरन्स रायडर आणि नवीन क्रिटिकल बेनिफिट रायडर सारखे फायदे देखील प्रदान करते. जर पॉलिसीधारकाचा अपघाती मृत्यू झाला तर, विमा रकमेच्या १२५% रक्कम नॉमिनी व्यक्तीला मृत्यू लाभ म्हणून दिले जातात.

Web Title: lic jeevan anand policy save rs 45 daily become lakhpati get rs 25 lakh fund

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.