LIC Jeevan Akshay Policy : काम करताना पैशांची गरज भासत नाही. कारण दर महिन्याच्या एक तारखेला तुमच्या बँक खात्यात पगार येणार असतो. मात्र, निवृत्तीनंतर पगार मिळणे बंद होतो. अशा परिस्थितीत आर्थिक चणचण भासते. त्यामुळेच आतापासूनच निवृत्तीचे नियोजन करणे काळाची गरज आहे. निवृत्तीनंतरच्या खर्चाचे व्यवस्थापन करण्याची चिंता सर्वांनाच असते. जर तुम्हाला निवृत्तीनंतरच्या खर्चासाठी निश्चित पेन्शन हवे असेल तर तुम्ही एलआयसीच्या जीवन अक्षय पॉलिसीमध्ये गुंतवणूक करू शकता. तुम्हाला या पॉलिसीमध्ये एकदा गुंतवणूक करावी लागेल आणि त्यानंतर तुम्हाला मासिक पेन्शन मिळत राहील.
कोण करू शकतो गुंतवणूक?
एलआयसी जीवन अक्षय पॉलिसीमध्ये गुंतवणुकीसाठी वयोमर्यादा ३० वर्षे ते ८५ वर्षे आहे. म्हणजेच या वयातील कोणतीही व्यक्ती गुंतवणूक करू शकते. ही पॉलिसी एक सिंगल प्रीमियम नॉन-लिंक्ड नॉन-पार्टिसिपेटिंग आणि वैयक्तिक वार्षिकी योजना आहे. याचा अर्थ असा की एकदा तुम्ही पैसे जमा केले की, तुमचे उत्पन्न आयुष्यभर निश्चित असते. यामध्ये पेन्शनची रक्कम तुम्ही केलेल्या गुंतवणुकीवर अवलंबून असते. तुम्ही ही पॉलिसी एकट्याने किंवा संयुक्तपणे खरेदी करू शकता. तुमच्या गुंतवणुकीवर तुम्हाला मासिक, त्रैमासिक, सहामाही किंवा वार्षिक आधारावर पेन्शन मिळू शकते.
१ लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर १२ हजार रुपये पेन्शन
एलआयसीच्या जीवन अक्षय पॉलिसीमध्ये किमान १ लाख रुपयांची गुंतवणूक करता येते. यामध्ये गुंतवणुकीची कमाल मर्यादा नाही. म्हणजे, गुंतवणूक जितकी जास्त तितकी मासिक पेन्शन जास्त. पॉलिसी पर्यायांनुसार, त्यात १ लाख रुपये गुंतवून तुम्हाला १२ हजार रुपयांपर्यंत वार्षिक पेन्शन मिळू शकते. दुसरीकडे, जर तुम्हाला दरमहा २०,००० रुपये आणि वार्षिक २.४० लाख रुपये मिळवायचे असतील, तर तुम्हाला ४० लाख ७२ हजार रुपयांपर्यंत एकरकमी रक्कम गुंतवावी लागेल.
वाचा - शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
पॉलिसी खरेदी करणे का फायदेशीर आहे?
एकदा प्रीमियम भरला की, तुम्हाला दरमहा पैसे मिळू लागतात. निवृत्त झालेल्या आणि नियमित उत्पन्नाची गरज असलेल्यांसाठी हे चांगले आहे. यामध्ये, तुम्ही कितीही जगलात तरी तुम्हाला आयुष्यभर उत्पन्न मिळत राहते. यामुळे तुमची बचत संपणार नाही आणि तुम्हाला नेहमीच पैसे मिळत राहतील याची खात्री होते. तुमच्या गुंतवणुकीवर बाजारातील चढउतारांचा परिणाम होत नाही. तुमच्या गरजेनुसार तुम्ही वेगवेगळे पेमेंट पर्याय निवडू शकता, जसे की आयुष्यभरासाठी किंवा दोन्ही जोडीदारांसाठी उत्पन्न.