Bank of Baroda Investment: बँक ऑफ बडोदा ही केंद्र सरकारच्या अंतर्गत सेवा देणारी एक सरकारी बँक आहे. ही सरकारी बँक आपल्या ग्राहकांना मुदत ठेवींवर (FD) आकर्षक व्याज देत आहे. बँक ऑफ बडोदामध्ये किमान ७ दिवसांपासून ते जास्तीत जास्त १० वर्षांसाठी एफडी खाती उघडता येतात. बँक ऑफ बडोदा एफडीवर ३.५० टक्के ते ७.२० टक्के व्याज देत आहे. बँक ऑफ बडोदाच्या एफडी योजनेअंतर्गत, तुम्ही फक्त १ लाख रुपये जमा करून त्यावर २३,५०८ रुपयांचं निश्चित व्याज मिळवू शकता.
७.१० टक्क्यांपर्यंत व्याज
एफडी खात्यांवर, ग्राहकांना निश्चित कालावधीनंतर संपूर्ण मूळ रक्कम निश्चित व्याजासह परत मिळते. सार्वजनिक क्षेत्रातील बँक ऑफ बडोदा आपल्या ग्राहकांना ४४४ दिवसांच्या एफडीवर सर्वाधिक व्याज देत आहे. ही सरकारी बँक ४४४ दिवसांच्या एफडीवर सामान्य नागरिकांना ६.६० टक्के, ज्येष्ठ नागरिकांना ७.१० टक्के आणि अति ज्येष्ठ नागरिकांना (८० वर्षांवरील लोक) ७.२० टक्के व्याज देत आहे. बँक ऑफ बडोदा ३ वर्षांच्या एफडीवर सामान्य नागरिकांना ६.५० टक्के, ज्येष्ठ नागरिकांना ७.०० टक्के आणि अति ज्येष्ठ नागरिकांना ७.१० टक्के व्याज देत आहे.
Post Office च्या 'या' स्कीममध्ये वर्षाला ₹५०,००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळतील १३ लाख, व्हाल मालामाल
२३,५०८ रुपयांचं फिक्स व्याज
जर तुम्ही सामान्य नागरिक असाल म्हणजेच तुमचं वय ६० वर्षांपेक्षा कमी असेल आणि तुम्ही बँक ऑफ बडोदामध्ये ३ वर्षांच्या एफडी योजनेत १,००,००० रुपये जमा केले तर तुम्हाला मॅच्युरिटीवर एकूण १,२१,३४१ रुपये मिळतील, ज्यामध्ये २१,३४१ रुपयांचं निश्चित व्याज समाविष्ट आहे. त्याचप्रमाणे, जर तुम्ही ज्येष्ठ नागरिक असाल म्हणजेच तुमचे वय ६० वर्षांपेक्षा जास्त असेल आणि तुम्ही बँक ऑफ बडोदामध्ये १,००,००० रुपये जमा केले तर तुम्हाला मॅच्युरिटीवर एकूण १,२३,१४४ रुपये मिळतील, ज्यामध्ये २३,१४४ रुपयांचं निश्चित व्याज समाविष्ट आहे.
तसंच जर तुम्ही अति ज्येष्ठ नागरिक असाल आणि तुम्ही बँक ऑफ बडोदामध्ये ३ वर्षांच्या एफडी योजनेत १,००,००० रुपये जमा केले तर तुम्हाला मॅच्युरिटीवर एकूण १,२३,५०८ रुपये मिळतील, ज्यामध्ये २३,५०८ रुपयांचं