Lokmat Money >गुंतवणूक > जुन्या गाड्या महागणार? GST १८ टक्क्यांपर्यंत वाढवण्याची तयारी, या वाहनांवर होणार लागू

जुन्या गाड्या महागणार? GST १८ टक्क्यांपर्यंत वाढवण्याची तयारी, या वाहनांवर होणार लागू

GST May Increase On Old Vehicle : तुम्ही वापरेली किंवा जुनी गाडी घेण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण, सरकार १ जानेवारीपासून नियम बदलण्याची शक्यता आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2024 11:26 IST2024-12-16T11:22:56+5:302024-12-16T11:26:25+5:30

GST May Increase On Old Vehicle : तुम्ही वापरेली किंवा जुनी गाडी घेण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण, सरकार १ जानेवारीपासून नियम बदलण्याची शक्यता आहे.

gst council may increase tax on old and used vehicles including evs to 18 percent full details | जुन्या गाड्या महागणार? GST १८ टक्क्यांपर्यंत वाढवण्याची तयारी, या वाहनांवर होणार लागू

जुन्या गाड्या महागणार? GST १८ टक्क्यांपर्यंत वाढवण्याची तयारी, या वाहनांवर होणार लागू

GST May Increase On Old Vehicle : नवीकोरी गाडी घ्यावी असं प्रत्येकाचं स्वप्न असते. मात्र, प्रत्येकाची आर्थिक स्थिती नवीन गाडी घेण्याची नसते. अशा परिस्थिती अनेजण दुधाची भूक ताकावर भागवत जुनी गाडी खरेदी करण्याचा विचार करतात. वास्तविक, अर्थनियोजनाच्या दृष्टीने हा निर्णय चांगला मानला जातो. कारण, यामध्ये तुम्हाला अतिशय कमी पैशात चांगले वाहन मिळते. तुम्हीही जुनी गाडी घेण्याचा विचार करत असाल तर घाई करा. कारण, नवीन वर्षापासून जुन्या गाड्या महाग होण्याची शक्यता आहे.

जुन्या आणि वापरलेल्या वाहनांच्या बाजारपेठेत लक्षणीय वाढ झाली आहे. अनेक कंपन्या आपली जुनी वाहने कमी किमतीत विकत आहेत, मात्र ही जुनी वाहने खरेदी करणाऱ्यांना मोठा धक्का बसू शकतो. वास्तविक, जीएसटी परिषद ईव्हीसह जुन्या आणि वापरलेल्या वाहनांवरील जीएसटी १८% पर्यंत वाढवू शकते. जो सध्या १२% आहे. असे झाले तर जुनी व वापरलेली वाहने महाग होऊ शकतात.

इलेक्ट्रिक वाहने (EV) देखील या कक्षेत येणार
बिझनेस टुडे वर प्रकाशित झालेल्या अहवालानुसार, जीएसटी कौन्सिलच्या फिटमेंट कमिटीने जुन्या आणि वापरलेल्या वाहनांवरील वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) दर १२% वरून १८% पर्यंत वाढवण्याची शिफारस केली आहे, ज्यामुळे जुन्या आणि वापरलेल्या वाहनांवरील कर देखील वाढेल. इलेक्ट्रिक वाहनांवरही हे लागू होऊ शकते. सध्या, या वाहनांवर पुरवठादाराच्या मार्जिनवर आधारित कर लागू केला जातो, ज्यामुळे कराचा बोजा तुलनेने कमी होतो. येथे विशेष बाब म्हणजे सध्या नवीन ईव्ही वाहनांवर ५% जीएसटी लावण्यात आला आहे, ज्यामुळे या क्षेत्रात वाढ करता येईल. परंतु, पुनर्विक्रीवर १८% जीएसटी लावला जातो, त्यामुळे ग्राहकांमध्ये सेकंड-हँड ईव्ही खरेदी करण्याचा कल कमी होईल.

मागणीत होऊ शकते घट 
सेकंड हँड वाहनांच्या दुरुस्ती आणि देखरेखीसाठी वापरल्या जाणाऱ्या इनपुट पार्ट्स आणि सेवांवर १८% चा GST दर आधीच लागू आहे, ज्यामुळे या वापरलेल्या कार मार्केटमधील ऑपरेटिंग खर्च वाढतो. जीएसटी दरात वाढ लागू केल्यास, सेकंड हँड वाहनांच्या विक्रीवर या क्षेत्राला एकूणच अधिक कर भरावा लागेल. यामुळे या वाहनांच्या मागणीत घट होऊ शकते, विशेषतः ईव्ही ग्राहकांची.

इंजिन आणि लांबीनुसार कर रचना
जर आपण सध्या लागू असलेल्या GST दरांबद्दल बोललो, तर पेट्रोल, LPG किंवा CNG वर चालणाऱ्या वाहनांसाठी १२००CC किंवा त्याहून अधिक क्षमतेच्या आणि ४०००MM किंवा त्याहून अधिक लांबीच्या वाहनांसाठी १८%, १५०० सीसी किंवा त्याहून अधिक इंजिन क्षमता आणि ४००० मिमी किंवा त्याहून अधिक लांबीच्या डिझेल वाहनांसाठी १८%, १५०० सीसी पेक्षा जास्त इंजिन क्षमता असलेल्या स्पोर्ट्स युटिलिटी वाहनांसाठी (SUV) १८% जीएसटी लागतो. अशा परिस्थितीत, या श्रेणीतील जुन्या आणि वापरलेल्या वाहनांसाठी GST दर १८% पर्यंत वाढवण्याची फिटमेंट समितीची शिफारस मोठी वाहने आणि SUV साठी सध्याच्या कर रचनेशी सुसंगत आहे. परंतु, हे सेकंडहँड ईव्ही मार्केटचे आकर्षण कमी करू शकते.

२१ डिसेंबरला जैसलमेरमध्ये होणार बैठक 
जीएसटी कौन्सिलची ५५ वी बैठक २१ डिसेंबर २०२४ रोजी राजस्थानमधील जैसलमेर येथे होणार आहे. या बैठकीत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यासह राज्यांचे अर्थमंत्रीही सहभागी होणार आहेत. या बैठकीत मुदतीच्या जीवन विमा पॉलिसींवरील जीएसटीमधील बदल, आरोग्य विम्याच्या प्रीमियमवर सूट, जीएसटी स्लॅबचा आढावा तसेच जुन्या आणि वापरलेल्या वाहनांवरील जीएसटीमध्ये वाढ यावरही परिषद चर्चा करू शकते अशी अपेक्षा आहे.

Web Title: gst council may increase tax on old and used vehicles including evs to 18 percent full details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.