Lokmat Money >गुंतवणूक > एका झटक्यात सोनं १८०० रुपयांनी वाढलं, १ लाखांच्या जवळ पोहोचणार? काय आहेत नवे दर, खरेदीपूर्वी जाणून घ्या

एका झटक्यात सोनं १८०० रुपयांनी वाढलं, १ लाखांच्या जवळ पोहोचणार? काय आहेत नवे दर, खरेदीपूर्वी जाणून घ्या

Gold Silver Price 1 April: फेब्रुवारी आणि मार्चनंतर एप्रिलमध्येही सोन्याची तेजी कायम आहे. नव्या आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी १ एप्रिल रोजी सराफा बाजारात सोन्याच्या किंमतीत जोरदार वाढ झाली.

By जयदीप दाभोळकर | Updated: April 1, 2025 14:25 IST2025-04-01T14:23:11+5:302025-04-01T14:25:29+5:30

Gold Silver Price 1 April: फेब्रुवारी आणि मार्चनंतर एप्रिलमध्येही सोन्याची तेजी कायम आहे. नव्या आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी १ एप्रिल रोजी सराफा बाजारात सोन्याच्या किंमतीत जोरदार वाढ झाली.

Gold rose by Rs 1800 in a single moment will it reach close to Rs 1 lakh What are the new rates know before buying | एका झटक्यात सोनं १८०० रुपयांनी वाढलं, १ लाखांच्या जवळ पोहोचणार? काय आहेत नवे दर, खरेदीपूर्वी जाणून घ्या

एका झटक्यात सोनं १८०० रुपयांनी वाढलं, १ लाखांच्या जवळ पोहोचणार? काय आहेत नवे दर, खरेदीपूर्वी जाणून घ्या

Gold Silver Price 1 April: फेब्रुवारी आणि मार्चनंतर एप्रिलमध्येही सोन्याची तेजी कायम आहे. नव्या आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी १ एप्रिल रोजी सराफा बाजारात २४ कॅरेट सोनं जीएसटीशिवाय १८०२ रुपयांनी महागलं. सोन्यानं आज नव्या आर्थिक वर्षाची सुरुवात ९०,९६६ रुपये प्रति ग्रॅम या नव्या उच्चांकी दरानं केली. तर चांदीत १०६० रुपयांची घसरण झाली. सोन्याचे दर आता वेगाने वाढून एक लाख रुपये प्रति दहा ग्रॅम जवळ पोहोचताना दिसत आहेत.

आज चांदीचा भाव ९९,८३२ रुपये प्रति किलो ग्रॅम वर खुला झाला. हे दर जीएसटीशिवाय आहेत. जर आपण ३% जीएसटी जोडला तर आज सोन्याचा भाव ९३,६९४ रुपये प्रति १० ग्रॅम आणि चांदीचा दर १०२८२६ रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचलाय. या वर्षी आतापर्यंत सोन्याच्या दरात १५,२२६ रुपये आणि चांदीच्या दरात १३,८१५ रुपयांची वाढ झाली.

SBI च्या ग्राहकांना डिजिटल पेमेंट करण्यात समस्या, सर्व्हर ठप्प की आणखी काही; केव्हा होणार सेवा सुरू?

इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशननं (IBJA) सराफा बाजाराचे दर जाहीर केले आहेत. यामध्ये जीएसटीचा समावेश नाही. कदाचित तुमच्या शहरात १००० ते २००० रुपयांचा फरक असू शकतो. आयबीजेए दिवसातून दोनदा दर जारी करते. एकदा दुपारी १२ च्या सुमारास, तर दुसऱ्याला सायंकाळी ५ च्या सुमारास दर जारी केले जातात.

२२ कॅरेट सोनंही आवाक्याबाहेर

आयबीजेएच्या दरानुसार आज २३ कॅरेट सोन्याचा भाव १७९५ रुपयांनी वाढून ९०,६०२ रुपये प्रति १० ग्रॅम झाला. तर २२ कॅरेट सोन्याचा सरासरी स्पॉट भाव दुपारी १ वाजण्याच्या सुमारास १६५१ रुपयांनी वाढून ८३,३५ रुपये झाला. १८ कॅरेट सोन्याचा भाव १३५२ रुपयांनी वाढला असून आता तो ६८,२२५ रुपये झाला. तर १४ कॅरेट सोन्याचा भाव १०५४ रुपयांनी वाढून ५३,२१५ रुपये झालाय.

सोन्याच्या दरात वाढ होण्याची ३ प्रमुख कारणं

१. भूराजकीय तणाव (चीन-अमेरिका वाद, युक्रेन युद्ध असे मुद्दे)

२. फेडच्या व्याजदरात कपातीची अपेक्षा (व्याजदर कमी असल्यास सोनं चमकेल)

३. मध्यवर्ती बँका सोनं खरेदी करत आहेत (आरबीआयनं आर्थिक वर्ष २०२५ मध्येच ३२ टन सोनं खरेदी केलंय)

Web Title: Gold rose by Rs 1800 in a single moment will it reach close to Rs 1 lakh What are the new rates know before buying

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.