Lokmat Money >गुंतवणूक > सोन्याच्या दरात तेजी, चांदीचाही भाव एका झटक्यात ₹२,१७८ नं वाढला; पाहा सोन्या-चांदीचे लेटेस्ट दर

सोन्याच्या दरात तेजी, चांदीचाही भाव एका झटक्यात ₹२,१७८ नं वाढला; पाहा सोन्या-चांदीचे लेटेस्ट दर

Gold Silver Price 3 June: सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा मोठा बदल पाहायला मिळत आहे. पाहा काय आहेत आजचे लेटेस्ट दर

By जयदीप दाभोळकर | Updated: June 3, 2025 15:53 IST2025-06-03T15:52:03+5:302025-06-03T15:53:52+5:30

Gold Silver Price 3 June: सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा मोठा बदल पाहायला मिळत आहे. पाहा काय आहेत आजचे लेटेस्ट दर

Gold prices rise 3rd june 2025 silver prices also increase by rs 2178 in one go See the latest gold and silver rates | सोन्याच्या दरात तेजी, चांदीचाही भाव एका झटक्यात ₹२,१७८ नं वाढला; पाहा सोन्या-चांदीचे लेटेस्ट दर

सोन्याच्या दरात तेजी, चांदीचाही भाव एका झटक्यात ₹२,१७८ नं वाढला; पाहा सोन्या-चांदीचे लेटेस्ट दर

Gold Silver Price 3 June: सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा मोठा बदल पाहायला मिळत आहे. आज २४ कॅरेट सोन्याच्या दरात प्रति १० ग्रॅम २८२ रुपयांची वाढ झाली, तर चांदीच्या दरात प्रति किलो २१७८ रुपयांची वाढ झाली आहे. आज २४ कॅरेट सोने जीएसटीशिवाय ९६,९६२ रुपये दरानं उघडलं. तर चांदीचा भाव ९९,९३९ रुपयांवर पोहोचला आहे. ३ टक्के जीएसटीसह सोनं ९९,८७० रुपये प्रति १० ग्रॅम आणि चांदी १०२९३७ रुपये प्रति किलो दरानं विकली जात आहे.

इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशननं (IBJA) सोन्या-चांदीचे स्पॉट दर जाहीर केले आहेत. त्यात जीएसटीचा समावेश नाही. कदाचित तुमच्या शहरात १००० ते २००० रुपयांचा फरक पडत असेल. आयबीजेए दिवसातून दोनदा दर जारी करते. एकदा दुपारी १२ च्या सुमारास, तर दुसऱ्याला सायंकाळी ५ च्या सुमारास दर जारी केले जातात.

आयबीजेएच्या दरानुसार आज २३ कॅरेट सोन्याचा भाव २८१ रुपयांनी वाढून ९६,५७४ रुपये प्रति १० ग्रॅम झाला. तर २२ कॅरेट सोन्याचा सरासरी स्पॉट भाव २५८ रुपयांनी वाढून ८८,८१७ रुपये प्रति १० ग्रॅम झाला. १० कॅरेट सोन्याचा भाव ६६,९६० रुपये प्रति १० ग्रॅम आहे. तर १४ कॅरेट सोन्याचा भाव १६५ रुपयांनी वाढून ५६,९२३ रुपये झालाय.

एसबीआय, पीएनबी, बीओबीसब ५ सरकारी बँका बनवणार एकत्रित कंपनी, काय आहे प्लान?

उच्चांकी स्तरापासून सोनं स्वस्त

सराफा बाजारात सोनं आतापर्यंतच्या उच्चांकी पातळीपेक्षा २१३८ रुपयांनी स्वस्त झालं आहे. २२ एप्रिल २०२५ रोजी सोन्याचा भाव ९९,१०० रुपये प्रति १० ग्रॅमच्या उच्चांकी पातळीवर होता. यंदा सोनं जवळपास २६,५४४ रुपयांनी तर चांदी १३,९२२ रुपयांनी महागली आहे. ३१ डिसेंबर २०२४ रोजी सोन्याचा भाव ७६,०४५ रुपये प्रति १० ग्रॅम आणि चांदीचा दर ८५,६८० रुपये प्रति किलो होता. या दिवशी सोनं ७५,७४० रुपयांवर बंद झालं. चांदीही ८६,०१७ रुपये प्रति किलोग्रॅमवर बंद झाली होती.

Web Title: Gold prices rise 3rd june 2025 silver prices also increase by rs 2178 in one go See the latest gold and silver rates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.