Gold Silver Price Today: सराफा बाजारात आज, गुरुवार, २७ नोव्हेंबर रोजी सोन्याच्या दरात घसरण दिसून येत आहे, तर चांदीच्या भावानं मोठी झेप घेतली आहे. एकाच झटक्यात चांदीचा भाव २७५८ रुपयांनी वाढला, तर सोन्याचा भाव २२४ रुपयांनी कमी झाला.
आजचे सोन्या-चांदीचे दर
आज २४ कॅरेट सोन्याचा भाव जीएसटी वगळता २२४ रुपयांनी स्वस्त होऊन १,२५,८५७ रुपये प्रति १० ग्रॅम वर आला आहे. जीएसटीसह १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा भाव आता १२९६३२ रुपये प्रति १० ग्रॅम झाला आहे.
तर, चांदीचा भाव जीएसटीसह १,६६,६३६ रुपये प्रति किलो वर पोहोचला आहे. चांदीचा भाव जीएसटी वगळता २७५८ रुपयांनी उसळी घेऊन १,६१,७८३ रुपये प्रति किलो दरानं उघडला. बुधवारी, चांदी जीएसटी वगळता १,५९,०२५ रुपये प्रति किलो आणि सोनं जीएसटी वगळता १,२६,०८१ रुपये प्रति १० ग्रॅमवर बंद झाले होते.
दीपिका पादुकोण कोणत्या कंपनीची आहे मालक; अचानक का चर्चेत आलंय तिचं नाव?
कॅरेटनुसार सोन्याचे दर
आज २३ कॅरेट सोन्याचा भाव २२३ रुपयांनी स्वस्त होऊन १,२५,३५३ रुपये प्रति १० ग्रॅम दरानं उघडला. जीएसटीसह याची किंमत आता १,२९,११३ रुपये झाली आहे (यात मेकिंग चार्जेसचा समावेश नाही).
२२ कॅरेट सोन्याची किंमत २०५ रुपयांनी कमी होऊन १,१५,२८५ रुपये प्रति १० ग्रॅम वर पोहोचली. जीएसटीसह हा दर १,१८,७४३ रुपये झालाय.
१८ कॅरेट सोने १६८ रुपयांच्या घसरणीसह ९४,३९३ रुपये प्रति १० ग्रॅम वर आले आहे आणि जीएसटीसह याची किंमत ९७,२२४ रुपये प्रति १० ग्रॅम वर पोहोचली.
१४ कॅरेट सोन्याचा दर देखील १३१ रुपयांनी कमी झाला आहे. आज हा ७३,६२६ रुपये वर उघडला आणि जीएसटीसह तो ७५,८३४ रुपये झालाय.
उच्चांकापासूनची स्थिती काय?
सोन्याचा आजचा भाव १७ ऑक्टोबरच्या सार्वकालिक उच्चांकी भाव १,३०,८७४ रुपयांपेक्षा ५०१७ रुपये स्वस्त आहे. तर, चांदीचे भाव १४ ऑक्टोबरच्या सार्वकालिक उच्चांकी भाव १,७८,१०० रुपयांवरून १६,३१७ रुपयांनी कमी झाला आहे. हे दर इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशननं (IBJA) जारी केले आहेत. हे दर दिवसातून दोनदा एकदा दुपारी १२ च्या सुमारास आणि दुसऱ्यांदा ५ वाजताच्या सुमारास जारी केले जातात.
