Gold Silver Todays Rate: आज, मंगळवार, २५ नोव्हेंबर रोजी, लग्नसराईच्या काळात सोन्या-चांदीच्या भावात मोठा बदल दिसून येत आहे. सराफा बाजारात २४ कॅरेट सोन्याचा भाव आज २०३४ रुपयांनी वाढून १,२५,३४२ रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचला आहे. जीएसटीसह १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा भाव आता १,२९,१०२ रुपये प्रति १० ग्रॅम आहे.
चांदीचा भाव जीएसटीसह १,६१,७२९ रुपये प्रति किलो झाला आहे. जीएसटी वगळता चांदी ३३६९ रुपयांनी उसळी घेऊन १,५७,०१९ रुपये प्रति किलो दरानं उघडली. काल, सोमवारी, चांदी जीएसटी वगळता १,५३,६५० रुपये प्रति किलो आणि सोनं जीएसटी वगळता १,२३,३०८ रुपये प्रति १० ग्रॅमवर बंद झालं होतं.
सोन्याचा आजचा भाव १७ ऑक्टोबरच्या सार्वकालिक उच्चांकी भाव १,३०,८७४ रुपयांपेक्षा ५५३२ रुपये स्वस्त आहे. तर, चांदीचे भाव १४ ऑक्टोबरच्या सार्वकालिक उच्चांकी भाव १,७८,१०० रुपयांवरून २,१०,०८१ रुपये खाली आले आहेत. सोन्या-चांदीचे हे ताजे दर इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशननं (IBJA) जारी केले आहेत. तुमच्या शहरात यात १००० ते २००० रुपयांचा फरक असू शकतो. आयबीजेए दिवसातून दोनदा दर जारी करते. एकदा दुपारी १२ च्या सुमारास आणि दुसरे ५ वाजता दर जारी केले जातात.
कॅरेटनुसार सोन्याचे दर
२३ कॅरेट सोन्याचा भाव आज २०२६ रुपयांनी महाग होऊन १,२४,८४० रुपये प्रति १० ग्रॅमनं उघडला. जीएसटीसह याची किंमत आता १,२८,५८५ रुपये झाली आहे (यात मेकिंग चार्जेसचा समावेश नाही.)
२२ कॅरेट सोन्याची किंमत १८६३ रुपयांनी उसळी घेऊन १,१४,८१३ रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचली आहे. जीएसटीसह ही किंमत १,१८,२५७ रुपये आहे.
१८ कॅरेट सोने १५२६ रुपयांच्या तेजीसह ९४,००७ रुपये प्रति १० ग्रॅमवर आले आहे आणि जीएसटीसह याची किंमत ९६,८२७ रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचली आहे.
१४ कॅरेट सोन्याचा दर देखील ११९० रुपयांनी वधारलाय. आज हा ७३,३२५ रुपयांवर उघडला आणि जीएसटीसह तो ७५,५२४ रुपये झालाय.
या वर्षात सोन्याचा भाव ४९,६०२ रुपये प्रति १० ग्रॅमनं महाग झाला आहे, तर चांदी ७१००२ रुपये प्रति किलोनं वाढली आहे.
