Gold Silver Price Today 6 October: सोन्याचे आणि चांदीचे भाव आज विक्रमी उच्चांकावर पोहोचले आहेत. शुक्रवारच्या तुलनेत आज, सोमवारी सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली.
इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या (IBJA) वेबसाइटनुसार आज, सोमवारी, २४ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम ₹१,१९,०५९ वर पोहोचला. शुक्रवारच्या तुलनेत सोन्याच्या दरात ₹ २,१०५ चा मोठी वाढ झाली आहे. शुक्रवारी २४ कॅरेट सोन्याचा भाव ₹ १,१६,९५४ प्रति १० ग्रॅम होता.
यापूर्वी शुक्रवारी सोन्याच्या दरात माफक ₹ ४९९ ची घट झाली होती. शेअर बाजारातील अस्थिरता आणि जागतिक बाजारातील अनिश्चितता यामुळे सोन्याच्या दरात ही वाढ झाली आहे.
चांदीच्या दरातही मोठी वाढ
आज चांदीच्या किमतीतही मोठी वाढ झाली आहे. चांदीचा भाव ₹१,४८,५५० प्रति किलोग्राम या पातळीवर पोहोचला. यापूर्वी शुक्रवारी चांदीचा भाव ₹१,४४,३८७ प्रति किलोग्राम होता. शुक्रवारच्या तुलनेत आज चांदीच्या किमतीत प्रति किलोग्राम ₹४,१६३ ची मोठी वाढ झाली आहे.
इतर कॅरेटचे दर काय?
कॅरेटनुसार सोन्याचे आजचे दर खालीलप्रमाणे आहेत:
२३ कॅरेट सोन्याचा दर आज ₹१,१८,५८२ प्रति १० ग्रॅम झाला आहे.
- २२ कॅरेट सोन्याचा भाव ₹१,०९,०५८ प्रति १० ग्रॅम झाला.
- १८ कॅरेट सोन्याचा भाव आज ₹८९,२९४ प्रति १० ग्रॅमवर पोहोचलाय.
- १४ कॅरेट सोन्याचा भाव ₹६९,६५० प्रति १० ग्रॅमवर पोहोचला आहे.
IBJA दररोज दोनदा सोन्या-चांदीचे दर जारी करते. एक दर साधारणपणे दुपारी १२ वाजता, तर दुसरा दर सायंकाळी ५ वाजताच्या आसपास जारी केला जातो.