Gold Silver Price 30 Oct.: आज गुरुवार, ३० ऑक्टोबरला, सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या भावात मोठी घसरण दिसून आली आहे. सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम १,३७५ रुपयांनी खाली आला आहे, तर चांदीच्या दरात प्रति किलो १,०३३ रुपयांची मोठी घट झाली. लग्नसराईच्या हंगामापूर्वी सोन्या-चांदीचे दागिने खरेदी करणाऱ्यांसाठी ही थोडी दिलासादायक बातमी आहे.
सध्या सोन्याचा भाव १७ ऑक्टोबरच्या आपल्या सर्वकालीन उच्चांकापासून ११,६२१ रुपये प्रति १० ग्रॅम स्वस्त झाला आहे. तर, चांदीचा भाव १४ ऑक्टोबरच्या सर्वकालीन उच्चांकापासून ३२,५०० रुपये प्रति किलोनं खाली आला आहे. आजच्या घसरणीनंतर, जीएसटीसह २४ कॅरेट सोन्याचा भाव १,२२,८३० रुपये प्रति १० ग्रॅम झालाय, तर जीएसटीसह चांदीचा दर १,४९,९६८ रुपये प्रति किलोवर पोहोचलाय.
डिजिटल इनव्हेस्टमेंट प्लॅटफॉर्म Groww चा आयपीओ येणार; कधीपासून आणि किती करावी लागणार गुंतवणूक?
आयबीजेए (IBJA) नुसार, २९ ऑक्टोबरला २४ कॅरेट सोनं जीएसटीशिवाय १,२०,६२८ रुपये प्रति १० ग्रॅमवर बंद झालं होते. त्याचप्रमाणे चांदीचा भावही जीएसटीशिवाय १,४६,६३३ रुपये प्रति किलोवर बंद झाला होता. आज सकाळी सोनं जीएसटीशिवाय १,१९,२५३ रुपये प्रति १० ग्रॅमच्या दराने, तर चांदी १,४५,६०० रुपये प्रति किलो दरानं उघडली. आयबीजेए (IBJA) दिवसातून साधारणपणे दोनदा, एकदा दुपारी १२ वाजता आणि दुसऱ्यांदा संध्याकाळी ५ वाजण्याच्या सुमारास, दर जाहीर करते.
कॅरेटनुसार सोन्याचे दर काय?
कॅरेटनुसार सोन्याच्या दरातही घट झाली आहे. आज २३ कॅरेट सोनं १,३७० रुपये स्वस्त होऊन १,१८,७७५ रुपये प्रति १० ग्रॅमच्या भावानं उघडलं. जीएसटीसह याची किंमत आता १,२२,३३८ रुपये झाली आहे. यामध्ये मेकिंग चार्ज जोडलेला नाही. २२ कॅरेट सोन्याची किंमत १,२५९ रुपये तुटून १,०९,२३६ रुपये प्रति १० ग्रॅमवर आली आहे. जीएसटीसह हा दर १,१२,५१३ रुपये आहे. मात्र, १८ कॅरेट सोन्याचा दर ८९,४४० रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचला आहे आणि जीएसटीसह याची किंमत ९२,१२३ रुपये प्रति १० ग्रॅम झाली आहे.
या वर्षीचा विचार केल्यास, या घसरणीनंतरही सोने ४३,५१३ रुपये प्रति १० ग्रॅम महाग राहिलं आहे, तर चांदी ५९,५८३ रुपये प्रति किलोनं उसळली आहे. केवळ ऑक्टोबर महिन्याच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास, या घसरणीनंतरही सोनं ३,९०४ रुपयांनी वाढलंय.
