Gold Silver Price 2 Dec : आज, मंगळवार, २ डिसेंबर रोजी सराफा बाजारात सोनं आणि चांदीच्या भावात थोडी घसरण दिसून येत आहे. आज २४ कॅरेट सोन्याचा भाव जीएसटीशिवाय ६५९ रुपयांनी स्वस्त होऊन १,२८,१४१ रुपये प्रति १० ग्रॅम वर उघडला. जीएसटीसह याची किंमत आता १,३१,९८५ रुपये प्रति १० ग्रॅम झाली. तर, २२ कॅरेट सोन्याचा भाव आज जीएसटीसह १,२०,८९८ रुपये आणि १८ कॅरेट सोन्याचा भाव ९८,९८९ रुपये प्रति १० ग्रॅम वर आला आहे.
चांदीची किंमत काय?
दुसरीकडे, चांदी आज जीएसटीशिवाय १,७४,९६३ रुपये प्रति किलो दराने उघडली आणि जीएसटीसह १,८०,२११ रुपये प्रति किलो वर आली. सोमवारी चांदी जीएसटीशिवाय १,७५,१८० रुपये प्रति किलो आणि सोनं जीएसटीशिवाय १,२८,८०० रुपये प्रति १० ग्रॅम वर बंद झाले होतं. आज चांदीच्या दरात २१७ रुपयांची घसरण झाली.
जानेवारीपासून बँक खात्यात येणार का वाढलेली सॅलरी? ८ व्या वेतन आयोगाशी निगडीत कनफ्युजन करा दूर
ऑल टाईम हायच्या तुलनेत सोन्याची किंमत?
सोनं आता १७ ऑक्टोबरच्या ऑल टाइम हाय ₹१,३०,८७४ पेक्षा फक्त ₹२,७३३ स्वस्त राहिलं आहे. तर, चांदीचे भाव १४ ऑक्टोबरच्या ऑल टाइम हाय ₹१,७८,१०० पासून आता फक्त ₹३,१३७ ने कमी आहेत. IBJA दिवसातून दोनदा दर जारी करते. एकदा दुपारी १२ वाजता आणि दुसऱ्यांदा संध्याकाळी ५ च्या आसपास दर जाहीर केले जातात.
कॅरेटनुसार आजचे सोन्याचे भाव
- आज २३ कॅरेट सोन्याचा भाव देखील ६५६ रुपयांनी स्वस्त होऊन १,२७,६२८ रुपये प्रति १० ग्रॅम दरानं उघडला. जीएसटीसह त्याची किंमत आता १,३१,४५६ रुपये झाली आहे. यामध्ये मेकिंग चार्ज अजून जोडलेला नाही.
- २२ कॅरेट सोन्याची किंमत ६०४ रुपयांनी घसरून १,१७,३७७ रुपये प्रति १० ग्रॅम वर पोहोचली आहे आणि जीएसटीसह हा दर १,२०,८९८ रुपये आहे.
- १८ कॅरेट सोन्यानं ४९४ रुपयांची घसरण नोंदवत ९६,१०६ रुपये प्रति १० ग्रॅमचा टप्पा गाठला असून जीएसटीसह त्याची किंमत ९८,९८९ रुपये प्रति १० ग्रॅम वर आली आहे.
- १४ कॅरेट सोन्याचा दर देखील ३८५ रुपयांनी तुटला आहे. आज तो ७४,९६३ रुपये वर उघडला आणि जीएसटीसह तो ७७,२११ रुपयांवर आलाय.
