Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money >गुंतवणूक > ईपीएफ खातेदारांनो सावधान! पेन्शन आणि व्याजाबाबतचे 'हे' ५ गैरसमज दूर करा; अन्यथा होईल नुकसान

ईपीएफ खातेदारांनो सावधान! पेन्शन आणि व्याजाबाबतचे 'हे' ५ गैरसमज दूर करा; अन्यथा होईल नुकसान

EPF Myths vs Reality : भविष्य निर्वाह निधी हे निवृत्तीसाठी बचतीचे एक सुरक्षित माध्यम आहे. अनेक कर्मचाऱ्यांच्या मनात याविषयी अनेक गैरसमज घर करून असतात.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2026 16:53 IST2026-03-31T16:53:19+5:302026-03-31T16:53:19+5:30

EPF Myths vs Reality : भविष्य निर्वाह निधी हे निवृत्तीसाठी बचतीचे एक सुरक्षित माध्यम आहे. अनेक कर्मचाऱ्यांच्या मनात याविषयी अनेक गैरसमज घर करून असतात.

EPF Myths vs Reality: 5 Common Misconceptions About Retirement Age and Interest | ईपीएफ खातेदारांनो सावधान! पेन्शन आणि व्याजाबाबतचे 'हे' ५ गैरसमज दूर करा; अन्यथा होईल नुकसान

ईपीएफ खातेदारांनो सावधान! पेन्शन आणि व्याजाबाबतचे 'हे' ५ गैरसमज दूर करा; अन्यथा होईल नुकसान

EPF Myths vs Reality : पगारदार वर्गासाठी निवृत्तीनंतरचा सर्वात मोठा आर्थिक आधार म्हणजे 'ईपीएफ'. नोकरीदरम्यान जमा होणारी ही पुंजी वृद्धापकाळात मोठी सोबत देते. मात्र, ईपीएफच्या नियमांबाबत कर्मचाऱ्यांमध्ये अनेक चुकीच्या धारणा आहेत. या गैरसमजांमुळे अनेकदा कर्मचारी घाईघाईने चुकीचे निर्णय घेतात आणि स्वतःचे आर्थिक नुकसान करून घेतात. म्हणूनच, ईपीएफशी संबंधित ५ मोठे 'मिथक' आणि त्यामागील 'सत्य' काय आहे, हे समजून घेणे आवश्यक आहे.

१. गैरसमज: ईपीएफसाठी निवृत्तीचे वय ६० वर्षे आहे?
वास्तव: अनेक कर्मचाऱ्यांना वाटते की ईपीएफमध्ये निवृत्तीचे वय ६० वर्षे आहे. पण नियमानुसार, अधिकृत निवृत्तीचे वय ५८ वर्षे आहे. ५८ वर्षांनंतर तुमची ईपीएफमधील नवीन गुंतवणूक बंद होते, तुम्ही त्यानंतरही नोकरी सुरू ठेवली तरी ५८ हेच 'कट-ऑफ' वय मानले जाते.

२. गैरसमज: निवृत्तीनंतर लगेच व्याज मिळणे बंद होते?
वास्तव: अनेकांना वाटते की ५८ व्या वर्षी नोकरी सोडली की खात्यावर व्याज मिळणार नाही. मात्र, जर तुम्ही ५८ व्या वर्षी निवृत्त झालात, तर तुमच्या ईपीएफ शिल्लकीवर पुढील ३ वर्षे (म्हणजे वयाच्या ६१ व्या वर्षापर्यंत) व्याज मिळत राहते. निवृत्तीनंतरही मर्यादित काळासाठी तुमचे पैसे वाढत राहतात.

३. गैरसमज: लवकर निवृत्त झाल्यासही फक्त ३ वर्षेच व्याज मिळेल?
वास्तव: हे पूर्णपणे चुकीचे आहे. व्याजाचा कालावधी तुम्ही कोणत्या वयात नोकरी सोडता यावर अवलंबून असतो.
जर तुम्ही वयाच्या ४५ व्या वर्षी नोकरी सोडली, तर तुम्हाला वयाच्या ५८ व्या वर्षापर्यंत व्याज मिळू शकते.
जर ५७ व्या वर्षी नोकरी सोडली, तर ६० व्या वर्षापर्यंत व्याज मिळेल.
थोडक्यात, तुम्ही जितक्या लवकर निवृत्त व्हाल, तितक्या जास्त काळासाठी (५८ वर्षांपर्यंत) तुम्हाला व्याज मिळू शकते.

४. गैरसमज: नोकरीत गॅप पडल्यास खाते बंद किंवा इनअॅक्टिव्ह होते?
वास्तव: नोकरी बदलताना किंवा सुटल्यास खाते बंद होण्याची भीती बाळगू नका. सलग ३ वर्षे कोणतेही योगदान जमा झाले नाही, तर खाते 'इनऑपरेटिव्ह' मानले जाते, पण ते बंद होत नाही. तुम्ही आजही तुमचे पैसे ट्रान्सफर करू शकता किंवा काढू शकता. फक्त नोकरी बदलताना 'जॉइनिंग' आणि 'एक्झिट'ची तारीख अचूक नोंदवा, जेणेकरून तांत्रिक अडचणी येणार नाहीत.

वाचा - अमेरिकेत पेट्रोल ३०% तर यूएईमध्ये डिझेल ७२ टक्क्यांनी महागले; भारतातही इंधन दरवाढ होणार?

५. गैरसमज: पेन्शन फक्त पूर्ण निवृत्तीनंतरच मिळते?
वास्तव: ईपीएस अंतर्गत मिळणारी पेन्शन वयाच्या ५८ वर्षांनंतर सुरू होते, मग तुम्ही नोकरी करत असाल किंवा नसाल. ही आजीवन मासिक पेन्शन असते.
फॉर्म्युला: (पेन्शनेबल सॅलरी × पेन्शनेबल सर्व्हिस) ÷ ७०.
किमान पेन्शन: मार्च २०२६ पर्यंत किमान मासिक पेन्शन १,००० रुपये आहे. संसदीय समितीने ही रक्कम ७,५०० रुपये करण्याची शिफारस केली असली, तरी सरकारने अद्याप त्यावर अधिकृत शिक्कामोर्तब केलेले नाही.

Web Title : ईपीएफ खाताधारक: पेंशन और ब्याज के बारे में इन 5 भ्रमों को दूर करें!

Web Summary : ईपीएफ सेवानिवृत्ति के लिए वित्तीय सुरक्षा प्रदान करता है। ईपीएफ के बारे में मुख्य बातें समझें: सेवानिवृत्ति की आयु, ब्याज, निष्क्रिय खाता और पेंशन पात्रता। वित्तीय नुकसान से बचने के लिए अपने संदेहों को दूर करें!

Web Title : EPF Account Holders: Dispel These 5 Myths About Pension & Interest!

Web Summary : EPF provides retirement financial security. Understand key EPF facts: retirement age misconceptions, interest after retirement, account inactivity, and pension eligibility to avoid financial losses. Clear your doubts now!