Lokmat Money >गुंतवणूक > पोस्ट ऑफिस खातेधारकांसाठी गुड न्यूज! आता ऑनलाईन होणार 'हे' काम

पोस्ट ऑफिस खातेधारकांसाठी गुड न्यूज! आता ऑनलाईन होणार 'हे' काम

Post Offce Accounts KYC : आता केवायसी करण्यासाठी तुम्हाला पोस्ट ऑफिसमध्ये जाण्याची गरज नाही. ही संपूर्ण प्रक्रिया घरी बसून ऑनलाइन पूर्ण केली जाईल.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2025 15:26 IST2025-01-03T15:26:10+5:302025-01-03T15:26:38+5:30

Post Offce Accounts KYC : आता केवायसी करण्यासाठी तुम्हाला पोस्ट ऑफिसमध्ये जाण्याची गरज नाही. ही संपूर्ण प्रक्रिया घरी बसून ऑनलाइन पूर्ण केली जाईल.

ekyc for india post account holders soon no need of physical verification with original documents | पोस्ट ऑफिस खातेधारकांसाठी गुड न्यूज! आता ऑनलाईन होणार 'हे' काम

पोस्ट ऑफिस खातेधारकांसाठी गुड न्यूज! आता ऑनलाईन होणार 'हे' काम

Post Offce Accounts KYC : पोस्ट ऑफिस आता पत्र किंवा पार्सल पोहोचण्यासाठी ओळखलं जात नाही. तर गुंतवणुकीतील अनेक आकर्षक योजना त्यांच्याकडून चालवल्या जातात. सरकारी हमी असल्यामुळे असंख्य लोक यात गुंतवणूक करीत आहेत. तुमचं पोस्ट ऑफिसमध्ये बचत खाते असल्यास, तुम्हाला दर ३ वर्षांनी तुमचे केवायसी करण्यासाठी पोस्ट ऑफिसमध्ये जावे लागते. तुम्हाला तिथे जाऊन तुमची ओळख आणि पत्त्याशी संबंधित कागदपत्रे जमा करावी लागतील. पण इंडिया पोस्टने यातून सर्व खातेधारकांची सुटका केली आहे. आता केवायसी करण्यासाठी तुम्हाला पोस्ट ऑफिसमध्ये जाण्याची गरज नाही. ही संपूर्ण प्रक्रिया घरी बसून ऑनलाइन पूर्ण करता येईल.

याची सुरुवात कर्नाटकातून करणार आहे. याचा फायदा कर्नाटकातील १ कोटी ९० लाख पोस्टल खातेधारकांना होणार आहे. कर्नाटकचे मुख्य पोस्टमास्टर जनरल राजेंद्र एस कुमार म्हणाले की, रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, दर तीन वर्षांनी केवायसी संबंधित कागदपत्रे सादर करण्यासाठी मूळ कागदपत्रांसह पोस्ट ऑफिसमध्ये जाण्याची आवश्यकता नाही. हे घरबसल्या ऑनलाइन आधार प्रमाणीकरणाद्वारे केले जाईल.

फिजिकली बायोमेट्रिक फिंगर प्रिंट पडताळणी बंद होणार 
पोस्ट ऑफिसमधील बचत बँक खातेधारकांना दर ३ वर्षांनी त्यांचे केवायसी करून घेण्यासाठी आणि बायोमेट्रिक फिंगरप्रिंटद्वारे त्यांची पडताळणी करण्यासाठी प्रत्यक्ष पोस्ट ऑफिसमध्ये जावे लागत होते. कर्नाटकचे मुख्य पीएमजी म्हणाले की आम्ही आमच्या मोबाईल ॲपमध्ये ही प्रक्रिया समाविष्ट करणार आहोत. कोणीही आपल्या मोबाईलवर हे ॲप डाउनलोड करून घरी बसून ही प्रक्रिया पूर्ण करू शकतो.

वेबसाइटवर कागदपत्रे अपलोड केली जातील
मोबाईल ॲपवर फिंगर प्रिंट व्हेरिफिकेशन करण्यापूर्वी खातेधारकांना इंडिया पोस्ट वेबसाइट indiapost.gov.in वर ई-बँकिंग पर्यायावर लॉग इन करावे लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमचे KYC संबंधित सर्व कागदपत्रे तेथे अपलोड करावी लागतील. या सुविधेचा सर्वात मोठा फायदा म्हणजे तुम्ही मूळ कागदपत्रे न बाळगताही पोस्ट ऑफिसमध्ये खाते उघडू शकता. टपाल विभाग आधार प्रमाणीकरणाद्वारे तुमच्या ओळखीची पुष्टी करेल. यानंतर तुम्ही खात्यांशी संबंधित कोणत्याही प्रकारचे ऑपरेशन करू शकता. लवकरच ही सुविधा इतर राज्यातही मिळणार असल्याचे सुत्रांनी सांगितले.

Web Title: ekyc for india post account holders soon no need of physical verification with original documents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.