Lokmat Money >गुंतवणूक > PF मधून पैसे काढताय? थांबा! 'या' एका चुकीमुळे तुमचं पेन्शनचं स्वप्न भंग होईल, जाणून घ्या महत्त्वाचे नियम!

PF मधून पैसे काढताय? थांबा! 'या' एका चुकीमुळे तुमचं पेन्शनचं स्वप्न भंग होईल, जाणून घ्या महत्त्वाचे नियम!

EPFO Pension : जर तुम्ही १० वर्षे PF मध्ये योगदान दिल्यास आणि EPS सुरक्षित ठेवल्यास ५० वर्षांच्या वयानंतर पेन्शन मिळते. EPFO ने १ जानेवारी २०२५ पासून कोणत्याही बँकेतून पेन्शन काढण्याची सुविधा सुरू केली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2025 10:45 IST2025-07-21T10:15:43+5:302025-07-21T10:45:57+5:30

EPFO Pension : जर तुम्ही १० वर्षे PF मध्ये योगदान दिल्यास आणि EPS सुरक्षित ठेवल्यास ५० वर्षांच्या वयानंतर पेन्शन मिळते. EPFO ने १ जानेवारी २०२५ पासून कोणत्याही बँकेतून पेन्शन काढण्याची सुविधा सुरू केली आहे.

Don't Lose Your Pension How PF Withdrawal Mistakes Can Impact Your EPS | PF मधून पैसे काढताय? थांबा! 'या' एका चुकीमुळे तुमचं पेन्शनचं स्वप्न भंग होईल, जाणून घ्या महत्त्वाचे नियम!

PF मधून पैसे काढताय? थांबा! 'या' एका चुकीमुळे तुमचं पेन्शनचं स्वप्न भंग होईल, जाणून घ्या महत्त्वाचे नियम!

EPFO Pension : खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या लाखो कर्मचाऱ्यांसाठी निवृत्तीनंतर पेन्शन मिळवण्याचा सर्वात महत्त्वाचा मार्ग म्हणजे पीएफ अर्थात भविष्य निर्वाह निधी. दरमहा तुमच्या पगाराचा काही भाग पीएफ खात्यात जमा होतो, जो तुमच्या भविष्यासाठी एक सुरक्षित गुंतवणूक असते. पण, अनेकदा नकळतपणे होणाऱ्या एका चुकीमुळे तुमचे हे पेन्शनचे स्वप्न भंग होऊ शकते. जर तुम्ही चुकीने संपूर्ण पीएफ रक्कम काढली, तर निवृत्तीनंतर तुम्हाला पेन्शन मिळणार नाही!


पीएफमध्ये किती पैसे जमा होतात आणि पेन्शन कशातून मिळते?
प्रत्येक महिन्याला तुमच्या मूळ पगाराच्या १२% रक्कम तुमच्या पीएफ खात्यात जमा होते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, तुमची कंपनी देखील तेवढीच रक्कम तुमच्या पीएफमध्ये जमा करते. पण, हे सर्व पैसे एकाच ठिकाणी जात नाहीत.
कंपनीच्या १२% रकमेपैकी ८.३३% रक्कम ईपीएस म्हणजेच कर्मचारी पेन्शन योजनेत जाते.
उर्वरित ३.६७% रक्कम ईपीएफ म्हणजेच कर्मचारी भविष्य निर्वाह निधीत जमा होते.
ही ईपीएसची रक्कमच तुम्हाला निवृत्तीनंतर पेन्शन देते. त्यामुळे, तुमचे पेन्शन मिळण्याचे स्वप्न या ईपीएस फंडावर अवलंबून असते.

ईपीएस काढल्यास पेन्शन मिळणार नाही!
समजा, तुम्ही १० वर्षे कठोर परिश्रम करून पीएफमध्ये पैसे जमा केले आणि वयाच्या ५० व्या वर्षी पेन्शन मिळण्याची अपेक्षा करत आहात. पण, जर तुम्ही नोकरी सोडताना किंवा त्यादरम्यान तुमचे सर्व पीएफ पैसे काढले आणि त्यात तुमचा ईपीएस हिस्साही काढला, तर तुम्हाला निवृत्तीनंतर एकही रुपया पेन्शन म्हणून मिळणार नाही. ईपीएसचे पैसे काढणे म्हणजे तुमच्या पेन्शनची 'किल्ली' हरवल्यासारखे आहे.

नोकरी बदलताना किंवा अचानक पैशांची गरज पडल्यास, बरेच लोक घाईघाईत त्यांचा संपूर्ण पीएफ काढतात आणि इथेच मोठी चूक होते. म्हणून, पुढच्या वेळी तुमचा पीएफ काढण्यापूर्वी, तुम्ही खूप काळजीपूर्वक विचार करणे महत्त्वाचे आहे.

पेन्शन सुरक्षित कसे ठेवावे?
तर, आता प्रश्न असा आहे की आपले निवृत्तीनंतरचे पेन्शन सुरक्षित कसे ठेवायचे? याचे उत्तर खूप सोपे आहे. ईपीएस फंडाला अजिबात हात लावू नका! जर तुम्हाला पीएफमधून पैसे काढायचे असतील, तर फक्त तुमच्या ईपीएफचा भाग काढा. ईपीएस फंड तसाच ठेवा. असे केल्याने, तुम्ही ५० वर्षांच्या वयानंतरही पेन्शनसाठी पात्र राहाल.

ईपीएफओच्या नियमांनुसार, जर तुम्ही १० वर्षे किंवा त्याहून अधिक काळ पीएफमध्ये नियमित योगदान दिले असेल आणि ईपीएस फंडाला स्पर्श केला नसेल, तर तुम्ही वयाच्या ५० वर्षांनंतर पेन्शनचा दावा करू शकता. हे पेन्शन तुमच्या निवृत्तीचे दिवस सोपे करेल, जेणेकरून तुम्ही कोणत्याही चिंतेशिवाय आयुष्याचे सोनेरी दिवस जगू शकाल.

वाचा - तुमच्या कराचा पैसा जातोय कुठे? GST मध्ये १५ हजार कोटींचा महाघोटाळा, वाचा काय आहे हे प्रकरण!

आता कोणत्याही बँकेतून पेन्शन मिळणार!
ईपीएफओने १ जानेवारी २०२५ पासून एक उत्तम सुविधा सुरू केली आहे, ज्यामुळे पेन्शन मिळण्याची प्रक्रिया आणखी सोपी झाली आहे. आता तुम्ही तुमचे पेन्शन कोणत्याही बँकेतून काढू शकता. पूर्वी ही सुविधा फक्त एकाच बँकेपुरती मर्यादित होती, परंतु आता डिजिटल पडताळणीद्वारे तुम्ही तुमचे पेन्शन कुठूनही मिळवू शकता. विशेषतः नोकरी सोडल्यानंतर त्यांच्या गावात किंवा इतर कोणत्याही शहरात स्थायिक झालेल्या लोकांसाठी ही एक मोठी दिलासा आहे.

Web Title: Don't Lose Your Pension How PF Withdrawal Mistakes Can Impact Your EPS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.