आरबीआयनं एप्रिल २०२५ मध्ये रेपो दर ६.२५ वरून ६ टक्क्यांवर आणला होता. आरबीआयनं रेपो दरात कपात केल्यानंतर एकीकडे सर्वच बँकांनी कर्जाच्या व्याजदरात कपात केली होती, तर दुसरीकडे बँकांनीही एफडीच्या व्याजदरात कपात केली होती. मात्र, ही वजावट असूनही एफडीवर आकर्षक व्याज मिळत आहे. आज आम्ही तुम्हाला पंजाब नॅशनल बँकेच्या (PNB) एका योजनेबद्दल सांगणार आहोत, ज्यामध्ये केवळ १ लाख रुपये जमा करून १६,२५० रुपयांपर्यंत फिक्स्ड व्याज मिळू शकतं. होय, आम्ही सांगत आहोत पंजाब नॅशनल बँकेच्या एफडी स्कीमबद्दल.
एफडीवर ७.९० टक्क्यांपर्यंत व्याज
पंजाब नॅशनल बँक (PNB) ७ दिवस ते १० वर्षांच्या एफडीवर ३.५० टक्के ते ७.९० टक्क्यांपर्यंत व्याज देत आहे. देशातील तिसरी सर्वात मोठी सरकारी बँक आपल्या ग्राहकांना दोन वर्षांच्या एफडीवर ६.८० टक्क्यांपासून ७.६० टक्क्यांपर्यंत व्याज देत आहे. पीएनबी २ वर्षांच्या एफडीवर सर्वसामान्यांना ६.८० टक्के, ज्येष्ठ नागरिकांना ७.३० टक्के आणि अतिज्येष्ठ नागरिकांना ७.६० टक्के व्याज देत आहे. एफडीवर ठराविक कालावधीसाठी फिक्स्ड आणि गॅरंटीड व्याज मिळतं.
१६,२५० रुपयांचा निश्चित परतावा
जर तुम्ही सामान्य नागरिक असाल आणि पीएनबीच्या २ वर्षांच्या एफडीमध्ये १ लाख रुपये जमा करत असाल तर तुम्हाला मॅच्युरिटीवर एकूण १,१४,४३७ रुपये मिळतील, ज्यात १४,४३७ रुपयांच्या फिक्स्ड इंटरेस्टचा समावेश आहे. जर तुम्ही ज्येष्ठ नागरिक असाल आणि पीएनबीमध्ये २ वर्षांच्या एफडीमध्ये १ लाख रुपये जमा करत असाल तर तुम्हाला मॅच्युरिटीवर एकूण १,१५,५६७ रुपये मिळतील, ज्यात १५,५६७ रुपयांच्या फिक्स्ड इंटरेस्टचा समावेश आहे. त्याचप्रमाणे जर तुम्ही सुपर सीनियर नागरिक असाल आणि पीएनबीच्या २ वर्षांच्या एफडीमध्ये १ लाख रुपये जमा करत असाल तर तुम्हाला मॅच्युरिटीवर एकूण १,१६,२५० रुपये मिळतील, ज्यात १६,२५० रुपयांच्या फिक्स्ड इंटरेस्टचा समावेश आहे.
(टीप : हे वृत्त सामान्य माहितीवर आधारित आहे. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)